शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : योजनेचा लाभ घ्या अन् कृषीपंपाचे वीजबिल कोरे करा, आता उरले 22 दिवस

एकीकडे कृषीपंपाच्या थकबाकीवरुन रणकंदन सुरु असले तरी दुसरीकडे महावितरणच्या योजनेत सहभागी होऊन शेतकरी हे कृषीपंपाचे वीजबिल हे कोरे करु शकणार आहेत. वीजबिलात 50 टक्के माफीसाठी आता केवळ 22 दिवस उरलेले आहेत. शेतकऱ्यांनी थकीत बिलापैकी 50 टक्के रक्कम अदा केल्यास उर्वरीत 50 टक्के माफी ही होणारच आहे. राज्य सरकारने 'कृषी धोरण 2020' या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ही सुविधा देण्याचा निर्धार केला असून गेल्या अनेक दिवसांपासून योजना सुरु आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : योजनेचा लाभ घ्या अन् कृषीपंपाचे वीजबिल कोरे करा, आता उरले 22 दिवस
कृषीपंप
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 2:26 PM

पुणे : एकीकडे (Agricultural Pump) कृषीपंपाच्या थकबाकीवरुन रणकंदन सुरु असले तरी दुसरीकडे महावितरणच्या योजनेत सहभागी होऊन शेतकरी हे कृषीपंपाचे वीजबिल हे कोरे करु शकणार आहेत. (Electricity Bill) वीजबिलात 50 टक्के माफीसाठी आता केवळ 22 दिवस उरलेले आहेत. शेतकऱ्यांनी थकीत बिलापैकी 50 टक्के रक्कम अदा केल्यास उर्वरीत 50 टक्के माफी ही होणारच आहे. (State Government) राज्य सरकारने ‘कृषी धोरण 2020’ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ही सुविधा देण्याचा निर्धार केला असून गेल्या अनेक दिवसांपासून योजना सुरु आहे. असे असताना पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग हा झालेला नाही. त्यामुळे उर्वरीत काळात तरी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. शिवाय यामधून वसुली होणाऱ्या रकमेतून विद्युत पुरवठ्यासंदर्भातील विकास कामे केली जाणार आहेत हे विशेष.

कसे आहे योजनेचे स्वरुप ?

कृषीपंपासाठी ही योजना असली तरी फार पूर्वीची थकबाकी वसुल करुन शेतकऱ्यांना चालू बिलापर्यंत आणण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. यामध्ये सप्टेंबर 2020 अखेर असलेल्या थकबाकीतील दंड-व्याज माफ करून, व्याजाचे पुनर्रगठण करून, वीज बिलाची दुरुस्ती करून सुधारित थकबाकी निश्चित केली आहे. त्यानुसार सुधारित थकबाकीवर 50 टक्के माफी देऊन उर्वरीत 50 टक्के वसुल करुन थकबाकीमुक्त करण्याचे धोरण आहे. शिवाय वसुल झालेल्या रकमेपैकी 66 टक्के ही ‘कृषी आकस्मिक निधीतून’ वीज यंत्रणेतील विकास कामांवर खर्च केला जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांनी 50 टक्के रक्कम अदा करुन त्या रकमेचा वापर हा शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी होणार आहे.

अशा प्रकारची होणार कामे?

शेतकऱ्यांकडून झालेल्या वसुली रकमेतून महावितरण विविध सोई-सुविधा करुन देणार आहे. स्थानिक पातळीवर अनेक अडचणी असल्याने सोई-सुविधांकडे दुर्लक्ष होते पण शेतकऱ्यांनी योजनेचे गांभीर्य ओळखून रखडलेली कामे कसे करुन घेता येतील यावर भर द्यावा लागणार आहे. काही परिमंडळात अशा प्रकारची विकास कामे सुरु झाली आहेत. ज्यामध्ये 30 मीटरच्या आतील कृषीपंपाच्या जोडण्या सुरु केल्या जाणार आहे. सध्या 31 ते 100 मीटर अंतरावरील काम सुरु आहे.

तर आणि तरच विद्युत पुरवठा

सध्या अनेक भागांमध्ये काही अंदाजेच रक्कम घेऊन विद्युत पुरवठा केला जात आहे. असे केल्याने विद्युत पुरवठा सुरळीत होणार नाही उलट शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. मात्र, सप्टेंबर 2020 पासून आलेली शेतीची सर्व त्रैमासिक बिले भरणे सक्तीचे आहे. ही संपूर्ण चालू बिलाची रक्कम भरल्याशिवाय खंडीत केलेला वीजपुरवठा सुरू केला जाणार नाही. जर योजनेच्या कालावधीत काही रक्कम भरली असेल तर उर्वरित रक्कम भरणे आवश्यक आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी सप्टेंबर 2020 पासूनची सर्व चालू बिले भरावीत हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे.

संबंधित बातम्या :

पुनर्वसनातील राखीव जमिनीचे सोडा हक्काच्या शेतजमिनीवरही पीक घेणे मुश्किल, नांदेडचे शेतकरी रब्बीला मुकले

उत्पादकता हरभऱ्याची की शेतकऱ्यांच्या नुकसानीची, कृषी विभागाच्या अहवालामुळे शेतकरीही चक्रावले!

Photo Gallery : ‘ते’ दोन तास अन् शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चकणाचूर, कांदा नगरीत झालं तरी काय?

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.