हिवाळ्यात ब्रॉयलर कोंबड्यांची ‘अशी’ घ्या काळजी मगच मिळेल कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा कुक्कुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. घटलेले दरही आता वाढले असून पोल्ट्रीधारकांच्या उत्पादनात वाढ होत आहे. सध्या हिवाळा सुरु आहे. यादरम्यान, ब्रॉयलर कोंबडीला संतुलित आहार देणे हे त्यांच्या खाद्यातील सर्वात महत्वाचे आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा कुक्कुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. घटलेले दरही आता वाढले असून पोल्ट्रीधारकांच्या उत्पादनात वाढ होत आहे. सध्या हिवाळा सुरु आहे. यादरम्यान, ब्रॉयलर कोंबडीला संतुलित आहार देणे हे त्यांच्या खाद्यातील सर्वात महत्वाचे आहे. खाद्यातील अधिक ऊर्जापुरवठा करणारे घटक जसे तेल व स्निग्ध घटकांचे प्रमाण वाढवावे. खाद्यामध्ये जास्त ऊर्जेची आवश्यकता असते.
बदलत्या वातावरणाचा कोंबड्यांच्या आरोग्यावर परिणाम
मांसल कोंबडी पालन करताना 40 ते 45 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न मिळते. त्यामुळे भांडवल खेळते राहते. शिवाय शेतीसाठी पोल्ट्री खत उपलब्ध होते. मांसल कोबड्यांना हिवाळ्यात मोठी मागणी असते. कोंबड्यांची उत्पादकता वातावरणातील तापमानावर अवलंबून असते. 28 अंशा सेल्सिअसपेक्षा अधिक किंवा 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाला त्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादकता कमी होते. परिणामी, कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते. साधारणपणे हिवाळ्यातील तापमान हो 10 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असते. कोंबड्यांच्या वाढीसाठी 18 ते 21 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. हिवाळा हा कोंबड्यांच्या वाढीच्या दृष्टीने चांगला ऋतू मानला जातो, कारण हिवाळ्यात कोंबड्या चांगल्याप्रकारे वाढतात.
पिलांसाठी कृत्रीम ऊर्जा व्यवस्थापन
लहान पिलांना आपण ज्या घरात वाढवतो त्यांच्या दोन्ही बाजूंनी पडदे टाकावेत. जेणेकरून बाहेरील थंड हवा सरळ आतमध्ये येणार नाही. आतमध्ये कृत्रीम ऊर्जा देण्याची व्यवस्था केलेली चांगलीच. जेणेकरून पिलांना ऊब मिळेल. हिवाळ्यामध्ये कृत्रीम उर्जा तीन आठवड्यापर्यंत करणे आवश्यक आहे. पक्षी ग्रहामध्ये जास्त उष्णता आहे असे जाणवल्यास दोन्ही बाजूंचे पडदे वरती घ्यावेत, जेणेकरून आतील उष्ण हवा बाहेर जाईल. बाहेरील ताजी हवा आत येईल.
कोंबड्यांना लागणारी जागा
कमी जाग असल्यास गर्दीमुळे कोंबड्यांची वाढ होत नाही. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. कोंबड्यांच्या वयानुसार त्यांच्या जागेमध्ये बदल करावा. हा बदल सहा आठवड्यापर्यंत करावा लागणर आहे. शिवाय पिलांच्या वाढीबरोबर त्यांच्या आहाराचे व्यवस्थापन योग्य केले तरच वाढ जोमात होऊन उत्पादनात वाढ होणार आहे.
हिवाळ्यातील व्यवस्थापन
* शेडचे छत उघडे किंवा फुटलेले असल्यास त्याची डागडुजी करून घ्यावी. यामळे थंड हवेच्या आजाराचा प्रादुर्भाव टाळता येईल. वातावरणातील तापमानानुसार पडदे उघडे व बंद करावेत. कोबड्यांना कृत्रीम ऊर्जेचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने करावे. * वीजपुरवठा खंडित झाल्यास कृत्रीम अर्जेसाठी पर्यायी व्यवस्था करावी. जागेनुसार शेडमधील कोंबड्याच्या संख्येत वाढ करावी. गादीचा थराची जाडी 3 ते 4 इंच वाढवून त्याला वेळोवेळी हलवून घ्यावे. पडदे बंद असताना एक्झॉस्ट पंख्याची व्यवस्था करवी. * खाद्यामध्ये तेल a स्निग्ध घटकांचे प्रमाण वाढवून खाद्यातील ऊर्जेचे प्रमाण वाढवावे. लहान पिलांना पिण्याचे पाणी कोमट करून द्यावे. थंडीमुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे औषध किंवा लस देण्यापूर्वी 4 ते 5 तास पाण्याची भांडी काढून ठेवावीत. शुद्ध व जंतुविरहित पाण्याचा पुरवठा करावा.