आंबे बहरातील मोसंबी फळाची ‘अशी’ घ्या काळजी ; संशोधकांचा काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?
फळपिकांची योग्य वेळी काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे खतांचा डोस शिवाय आंबे बहरातील मोसंबीची तोडणी हे देखील महत्वाचे आहे. सध्या शेतकरी फळांना अधिकचा दर मिळावा म्हणून मोसंबी परिपक्व होऊनदेखील झाडालाच ठेवतात.
जालना : फळपिकांची योग्य वेळी काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे खतांचा डोस शिवाय आंबे बहरातील मोसंबीची तोडणी हे देखील महत्वाचे आहे. सध्या (researchers advise farmers) शेतकरी फळांना अधिकचा दर मिळावा म्हणून मोसंबी परिपक्व होऊनदेखील झाडालाच ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा नफा नाही तर अधिकचा तोटाच होणार असल्याचा सल्ला मोसंबी संशोधक डॅा. संजय पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे मोसंबीची वेळेत तोडणी केली तरच पुढचे फळ शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.
सध्या आंबे बहरातील मोसंबी लागवडीचा हंगाम सुरु झाला आहे. तोडणीसाठी पोषक वातावरणही आहे. मात्र, शेतकरी हे बाजारात मोसंबीला अधिकचा दर नसल्याने तोडणीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, मोसंबी फळे झाडावर अधिकचा काळ ठेवली तर त्याचे विपरीत परिणाम त्या झाडावर आणि पुढील बहरावर होणार असल्याचे डॅा. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत असलेल्या बदनापूर कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांमध्ये फळबागविषयी जनजागृती केली जात आहे. या दरम्या, डॅा. संजय पाटील यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला असून सध्या आंबे बहरातील मोसंबीची फळे ही तोडणीला आलेली आहेत. मात्र, दर नसल्याने तोडणीकडे दुर्लक्ष केले तर शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होणार आहे. वेळेत तोडणी केली नाही तर त्याचा पुढच्या बहरावर परिणाम होत असतो. कारण वातावरणानुसार बहर हा ठरत असतो तर झाडच्या वाढीवरही याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.
तोडणी करुन खताचा डोस महत्वाचा
मोसंबी फळाची योग्य तोडणी गरजेची आहे. त्यावरच पुढचा बहर हा अवलंबून असतो. मोसंबीला कमी दर मिळाला तरी त्याची भरपाई पुढील बहरात होईल पण तोडणी नाही केली तर फळबागाचेच नुकसान होणार आहे. शिवाय तोडणी करुन खताचा डोस देऊन पुढील बहर धरण्यासाठी पुर्वतयारी करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला आहे.
फळमाशीमुळे अगोदरच नुकसान
फळमाशीमुळे आगोदरच फळपिकांचे नुकसान झाले आहे. जर मोसंबीची वेळेत तोडणी केली नाही तर फळमाश्यांचे प्रमाण वाढणार आहे. शिवाय नैसर्गिक गळ होऊन मोसंबीचे नुकसानच होणार आहे. त्यामुळे वेळेत तोडणी हाच पर्याय शेतकऱ्यांकडे आहे.
सर्वाधिक विम्याचे कवच द्राक्ष फळपिकाला
आंबिया बहरातील सर्वाधिक विमा संरक्षित रक्कम ही द्राक्षासाठी देण्यात आली आहे. ही रक्कम 3 लाख 20 हजार असून या फळपिक उत्पादकाला याचा अधिकचा फायदा होणार आहे. फळनिहाय या विमा संरक्षित रक्कम व त्यामध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ही ठरविण्यात आली आहे. अंतिम मुदत ही पुढीलप्रमाणे द्राक्ष- 15 ऑक्टोंबर, मोसंबी 31 ऑक्टोंबर, केळी 31 ऑक्टोंबर, पपई 31 ऑक्टोंबर, संत्रा 30 नोव्हेंबर, काजू 30 नोव्हेंबर, कोकण आंबा 30 नोव्हेंबर, स्ट्रॅाबेरी 14 नोव्हेंबर अशी मुदत ठरवून देण्यात आली आहे. (Take care of mosambi fruit crop, researchers advise farmers)
संबंधित बातम्या :
जे तीन वर्षात घडंल नाही ते यंदाच्या खरीपात लातूर विभागात पाहायला मिळालं…!
हे ही माहिती असू द्या 7/12 उताऱ्यावर वारसाची नोंद करतात कशी? जाणून घ्या संपूर्ण माहिती
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या 10 दिवसांसाठी बंद मात्र, ‘या’ बाजार समित्यांचे व्यवहार सुरुच