पुढील पाच दिवस पावसाचे, अशी घ्या शेतीपिकाची काळजी

पुन्हा पाऊस हा सक्रीय होणार असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. याकरिता कृषी शास्त्रज्ञांनी काही सल्ला दिला असून त्याची अंमलबजाणी केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान हे टळणार आहे. चला तर मग पाहूया काय आहे पिकाच्या संरक्षणाबाबत कृषी सल्ला.

पुढील पाच दिवस पावसाचे, अशी घ्या शेतीपिकाची काळजी
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 8:35 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे. मात्र, पुन्हा पाऊस हा सक्रीय होणार असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. याकरिता कृषी शास्त्रज्ञांनी काही सल्ला दिला असून त्याची अंमलबजाणी केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान हे टळणार आहे. चला तर मग पाहूया काय आहे पिकाच्या संरक्षणाबाबत कृषी सल्ला.

पुढील पाच दिवसांत पावसाची शक्यता लक्षात घेऊन कृषी भौतिकशास्त्र विभागातील कृषी शास्त्रज्ञांनी सर्व भाज्या, डाळीची पिके, मका आणि नर्सरीमध्ये ड्रेनेजची योग्य व्यवस्था करण्यास सांगितले आहे. तसेच कोणत्याही पिकांची फवारणी करू नये. या काळात लवकर वटाण्याची पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचे प्रगत वाण-पुसा प्रगती आणि पुसा श्री हे सांगण्यात आले आहे. त्याचे बियाणे बुरशीनाशक कॅप्टन किंवा थायरम यामध्ये मिसळून वापर करावे. शिवाय पिकाच्या विशेष राइझोबियमचा डोस दिला पाहिजे. याकरिता गुळ पाण्यात उकळून थंड करायचा आणि बियांमध्ये रिझोबियम मिसळायचे. वाळण्यासाठी सावलीच्या ठिकाणीच ठेवावे लागणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पेरणी करता येणार आहे.

मोहरीच्या पेरणीबाबत सल्ला

मोहरीच्या पेरणीसाठी पुसा मोहरी-25, पुसा मोहरी-26, पुसा मोहरी 28, पुसा अगरणी, पुसा तारक, पुसा वास इत्यादी बिया व्यवस्थित करायच्या आहेत. त्यानंतर शेत तयार करायचे आहे. प्रगत वाण म्हणजे पुसा रक्त. एकरी 4.0 किलो बियाणे वापरायचे आहे. पेरणीपूर्वी बियाण्यामागे कॅप्टनच्या 2 ग्रॅम प्रति किलो दराने बियाणे मिश्रण करायचे आहे. शेतात देसी खत, पोटॅश आणि फॉस्फरस खत वापरल्यास पोषक राहणार आहे.

भाजीपाला पिकासाठी सल्ला

या दरम्यान पिके आणि भाज्यांमध्ये वाळवीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांवर लक्ष ठेवावे. आर्द्रता लक्षात घेता क्लोरपायरिफा 20 ई.सी 4.० मिली एका लिटर पाण्यामध्ये मितळून फवारायचे आहे. या हंगामात शेतकऱ्यांनी शेतावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पिकं आणि भाज्यांमध्ये पांढरी माशी किंवा शोषक कीटकांचा प्रादुर्भाव दिसून आला तर इमिडाक्लोपिड औषध 1.0 मिली हे ३ लिटर पाण्यात मिसळून कोरड्या वातादरणात फवारणी करायची आहे. या हंगामात धानाचे दाणे बारीक होण्याचा धोका आहे. त्यामुळे ब्लास्टॉक्सला 50 हे गरजेनुसार 500 ग्रॅम प्रति एकर आवश्यकतेनुसार पाण्यात मिसळावे आणि 10 दिवसांच्या अंतराने 2-3 वेळा फवारणी करावी. (take-care-of-the-agricultural-crop-for-the-next-five-days-of-rain)

संबंधित इतर बातम्या :

केळीचे उत्पादन घेताय मग ह्या ११ सर्वोत्तम प्रकाराची माहिती जाणूनच घ्या

आंब्याच्या 11 जाती : एकदा लागवड अन् दरवर्षी लाखोंची कमाई

शेतकऱ्यांनाच विकत घेता येणार आता कृषी विद्यापीठाचे बियाणे

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.