रब्बीचा ‘श्रीगणेशा’ केलाय, मग ‘ही’ काळजी घेतली तरच होईल पीकांचे उगवण..

राज्यातील सर्वच विभागात रब्बीच्या पेरणीला सुरवात झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने सर्वकाही अलबेल आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण बांधावरची स्थिती ही वेगळी असून प्रत्यक्ष रब्बीच्या पेरणीला अडथळे निर्माण होत आहेत. पाऊस अधिकच्या प्रमाणात झाला असला तरी एकदा गायब झालेला पाऊस पुन्ह फिरकलेला नाही त्यामुळे शेत जमिनी ह्या आवळून आल्या आहेत.

रब्बीचा 'श्रीगणेशा' केलाय, मग 'ही' काळजी घेतली तरच होईल पीकांचे उगवण..
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 11:43 AM

लातूर : राज्यातील सर्वच विभागात रब्बीच्या पेरणीला सुरवात झाली आहे. (Rabbi season) यंदा सरासरीपेक्षा अधिकचा (Rain) पाऊस झाल्याने सर्वकाही अलबेल आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण बांधावरची स्थिती ही वेगळी असून प्रत्यक्ष रब्बीच्या पेरणीला अडथळे निर्माण होत आहेत. (Advice Farmer) पाऊस अधिकच्या प्रमाणात झाला असला तरी एकदा गायब झालेला पाऊस पुन्ह फिरकलेला नाही त्यामुळे शेत जमिनी ह्या आवळून आल्या आहेत. (rainfall forecast) त्यामुळे पेरणीही मुश्किल झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी दरम्यान नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला दिलेला आहे.

खरीपात पावसामुळे पीके वाया गेली तर आता पावसाविना रब्बीच्या पेरण्याच धोक्यात अशी स्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील उत्पादन वाढवायचे असेल तर पेरणीपूर्वीची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली असली तरी ती धोक्याची आहे. योग्य ती खबरदारी घेऊनच पेरणी करणे आवश्यक आहे. अन्यथा खरीपाची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही.

काय आहे बांधावरचे चित्र?

समाधानकारक पावसामुळे रब्बीच्या उत्पादनात वाढ होणार हे जरी खरे असले तरी पेरणीच्या दरम्यान योग्य ती खबरदारी गरजेची आहे. 15 ऑक्टोंबरनंतर मराठवाड्यात पुन्हा पाऊस झालेला नाही. शिवाय ऑक्टोंबर हीटमुळे शेतजमिनी ह्या आवळून आल्या आहेत. त्यामुळे अशा अवस्थेत पेरणी केली तरी त्याची उगवण होणार की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीत ओल नसेल तर मशागत केल्यानंतर ओलवून पेरणी केली तरच फायद्याचे राहणार आहे. अन्यथा उगवणच चांगल्या प्रकारे झाली नाही तर उत्पादन कसे वाढणार?

रब्बी पेरणीला सुरवात

मराठावाड्यासह पुणे विभागात देखील पेरणीला सुरवात झाली आहे. पुणे विभागात रब्बीच्या पेरण्या 8 टक्के झाल्या आहेत. यंदा पोषक वातावरणामुळे हरभरा आणि गव्हावर शेतकऱ्यांचा भर आहे. तर मराठवाड्यात देखील यंदा हरभरा पिकाचेच क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जमिनीत ओल असतानाच पेरणी व्हावी या उद्देशाने शेतकरी हे ट्रॅक्टरच्या सहायाने पेरणी करीत आहेत. त्यामुळे अधिकचा खर्च होत असला तरी वेळेत पेरणी होणे महत्वाचे आहे.

मशागत, शेत ओलवूनच पेरणी फायद्याची

रब्बीच्या पेरणापूर्वी शेताची मशागत हा महत्वाचा मद्दा आहे. यापूर्वी शेतामध्ये ओल असल्याने हलकी मशागत करुन पेरणी कली तरी उगवण्याची चिंता नव्हती मात्र, गेल्या तीन आठवड्यात पावसाने उघडीप दिलेली आहे. शिवाय ऑक्टोंबर हीटमुळे जिरायत शेतीमधील ओल ही उडालेली आहे. त्यामुळे आता पेरणीसाठी उशीर तर झालेलाच आहे. मात्र, पेरलेले उगवून येण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरवातीला मशागत आणि नंतर शेत ओलवून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच पेरणी केली तर उगवण क्षमता योग्य राहणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितलेले आहे.

पावसाचा अंदाज खरा ठरावा

आगामी तीन दिवसांमध्ये मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यापुर्वी हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेले अंदाज तंतोतंत ठरलेले आहेत. तीन दिवस पावसाचा अंदाजही त्यांनीच वर्तवलेला आहे. त्यामुळे हा अंदाज देखील खरा ठरावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी अधिक सुलभ होणार आहे. (Take care to sow rabi only then the crop will grow)

संबंधित बातम्या :

पशुखाद्याच्या दरात वाढ, दूध दर घटल्याने शेतीचा मुख्य जोडव्यवसाय अडचणीत

दुष्काळात तेरावा : रासायनिक खताच्या दरात वाढ, शेतकरी चिंतेत

शेतकऱ्यांचा नादच खुळा : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 5 हजार ट्रॅक्टरची बुकींग

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.