ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : 2022 वर्ष ठरणार महिला शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी, कोणते विषय राज्य सरकारच्या अजेंड्यावर?

शेती व्यवसयात महिला शेतकऱ्यांचेही मोठे योगदान आहे. पुरुषांच्या खांद्याला-खांदा लावून महिला ह्या कष्टाची कामे करीत आहेत. तर काही महिला शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून उत्पादन वाढवले आहे. आता याच महिला शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचे काम ठाकरे सरकार करणार आहे. आगामी वर्ष हे महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : 2022 वर्ष ठरणार महिला शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी, कोणते विषय राज्य सरकारच्या अजेंड्यावर?
दादा भुसे, कृषीमंत्री
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 6:05 PM

मुंबई : शेती व्यवसयात महिला शेतकऱ्यांचेही मोठे योगदान आहे. पुरुषांच्या खांद्याला-खांदा लावून महिला ह्या कष्टाची कामे करीत आहेत. तर काही महिला शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून उत्पादन वाढवले आहे. आता याच महिला शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचे काम (State Government) ठाकरे सरकार करणार आहे. आगामी वर्ष हे (Women Farmers) महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. तसा निर्णयच राज्य सरकारने घेतला असल्याचे राज्य कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी सरकारची भूमिका काय असणार आहे हे देखील कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेती व्यवसयाचा अणखीन विकास होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

महिला शेतकऱ्यांसाठी 30 टक्के राखीव निधी

उत्पादन वाढीच्या अनुशंगाने राज्य सरकारच्यावतीने वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. आता यामध्येच महिला शेतकऱ्यांना अधिकची सुट देण्यात येणार आहे. कृषी योजना आणि अन्नधान्य प्रक्रिया उद्योगामध्ये महिला शेतकऱ्यांसाठी 30 टक्के निधी हा राखीव ठेवला जाणार आहे. यामुळे महिलांना त्यांच्या हक्काचे निधी तर मिळणारच आहे पण नविन उद्योगाची उभारणी केली जाणार आहे. आतापर्यंत महिला शेतकरी ह्या पुरुषांच्या बरोबरीने कष्ट करीत होत्या पण आता त्यांना स्वत:चे असे व्यवसाय उभे करता येणार आहेत. त्यासाठी राज्यसरकार प्रोत्साहन देणार आहे.

अडीच हजार कोटी विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला पिविमा रक्कम अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावद जमा होण्यास गतआठवड्यापासून सुरवात झाली आहे. आतापर्यंत 2 हजार 450 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. अजूनही काही शेतकऱ्यांचा विमा जमा होणे बाकी असून ही रक्कम प्रक्रियेत आहे. काही दिवसांमध्येच हा परतावा शेतकऱ्यांना मिळणार आहे. मध्यंतरी काही विमा कंपन्याच्या भूमिकेमुळे रक्कम अदा होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या पण कृषी विभाग आणि राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे अखेर पिकविमा रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.

शेतकऱ्यांच्या हीतासाठी केंद्र-राज्याचे मतभेद बाजूला

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काहीही मतभेद असले तरी मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीच्या दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार हे एकत्र येत आहे. आतापर्यंत अवकाळी, चक्रीवादळ यामुळे हंगामी पिकांसह फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या दरम्यान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे मिळूनच मदतीची भूमिका ठरवतात. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळेही मोठे नुकसान झाले आहे. कृषिविभागाकडून शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. त्याची पाहणी करुन लवकरच मदत जाहीर केली जाणार आहे. अवकाळीमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या :

पिकांवर किडीचा प्रादुर्भाव पण मावा की तांबोरा अगोदर ‘असा’ ओळखा फरक अन् मगच व्यस्थापन करा अन्यथा…

Latur Market | सोयाबीनच्या दराला उतरती कळा, साठवणूक केलेल्या सोयाबीनचे करायचे काय?

Onion Rate | कांद्याच्या दराचा लहरीपणा, आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत काय आहे चित्र?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.