पावसाची उसंत आता पंचनाम्यावर जोर, प्रशासन लागले कामाला

मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. शिवाय लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात आठ दिवसांमधून आज (बुधवारी) सुर्यदर्शनही झाले होते. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. आता जिल्हाधिकारी यांच्याकडून अतिवृष्टीचा अहवाल मागून घेतला जाणार आहे तर पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत.

पावसाची उसंत आता पंचनाम्यावर जोर, प्रशासन लागले कामाला
पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी कळंब तालुक्यातील शेती बांधावर असलेले कृषी अधिकारी,
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 10:30 AM

राजेंद्र खराडे : लातूर : गेल्या दोन दिवसामध्ये मराठवाड्यासह (Marathwada) राज्यभर पावसाने थैमान घातले होते. पिकाचे तर नुकसान झालेच आहे शिवाय पावसामुळे जी परस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे (State) राज्यातील 21 जणांचा बळी गेला आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. शिवाय लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात आठ दिवसांमधून आज (बुधवारी) सुर्यदर्शनही झाले होते. (Panchnama) पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. आता जिल्हाधिकारी यांच्याकडून अतिवृष्टीचा अहवाल मागून घेतला जाणार आहे तर पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत.

पावसामुळे खरीप हंगाम हा पाण्यात आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता प्रशासकीय स्तरावरही याची दखल घेतली जात आहे. त्याअनुशंगानेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अतिवृष्टीचा अहवाल प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडून मागवून घेण्याच्या सुचना दिल्या आहेत तर बाधित झालेल्या क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे करण्याच्या सुचनाही त्यांनी दिलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा कहर सुरु आहे.

आठही जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पंचनामे करण्यास सुरवात झाली होती. एवढेच नाही तर उस्मानाबाद, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाल्याचा अहवालही देण्यात आला होता. आता गेल्या सहाच दिवसामध्ये तब्बल नुकसानीचे क्षेत्र हे सहा लाखाने वाढलेले आहे. त्यामुळे वाढीव भागात पुन्हा पंचनामे करावे लागणार आहेत. मात्र, बुधवारी पावसाने लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, बीड या जिल्ह्यांमध्ये विश्रांती घेतली होती तर कृषी अधिकरी पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत होते.

पूरग्रस्त भागातील पिकांची पाहणी

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटीव यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये पीक नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे. यांच्याशीही मुख्यमंत्री यांनी चर्चा केली आहे. शिवाय विरोधी पक्षातील नेतेही शेतकऱ्यांबरोबर संवाद साधत आहेत. मात्र, पावसाची तीव्रता अधिक असल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. तुर्तास कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पंचनाम्याची कशी असते प्रक्रीया

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची तक्रार सर्वप्रथम शेतकऱ्यांना द्यावी लागते. नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागातील कृषी सहायक, मंडळ अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. शेतकऱ्याच्या पिकाच्या नोंदीनुसार पंचनामे केले जातात. तर प्रत्येक एकरावरची पाहणी न करता नुकसान झालेल्या पिकाचे निकष हे त्या गटाकरीता लागू केले जातात.

अशा प्रकारे ठरली जाते मदतीची रक्कम

पिकाच्या नोंदणीनुसार जर 33 टक्के पेक्षा अधिकचे नुकसान झाले असले तर त्या पिकाची नुकसानभरपाई ही शेतकरी हे पात्र होतात. कोरडवाहू आणि बागायत या करीता वेगवेगळे निकष लावण्यात आले आहेत. कोरडवाहू क्षेत्रावरील नुकसान असेल तर हेक्टरी 9 हजार रुपये हे दिले जातात. ही रक्कम केंद्र सरकार देऊ करते तर यामध्ये राज्य सरकारही मदत करते. बागायत क्षेत्रासाठी 18 हजार रुपये हेक्टरी मदत असे निकष लावण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्ती विभागाकडे पीक नुकसानीचे अहवाल हे पाठविले जातात. पण हे सर्व नुकसान जर 33 टक्के पेक्षा अधिकचे असेल तरच मदत शेतकऱ्यांने मिळणार आहे. (The administration’s focus is now on exposing the rain to panchnamas)

संबंधित बातम्या :

गुलाब चक्रीवादाळामुळे खरीपाची आशा मावळली, मराठवाड्यात 182 मंडळात अतिवृष्टीने पीकांचे नुकसान

Weather Alert | उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर, नाशिक शहराला महापुराचा इशारा, गोदाकाठच्या रहिवाशांना स्थलांतराच्या सूचना

शेतकऱ्यांसाठी नवी 35 पिके, पंतप्रधान मोदींनी दिला उत्पादन वाढीचा शेतकऱ्यांना ‘कानमंत्र’

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.