Kharif Season : खरिपातील शेतीमालाची आवक वाढली, आता दर्जानुसार मिळणार दर
खरीप हंगामात सोयाबीन आणि तुरीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असले तरी सध्या याच शेतीमालाची आवक वाढलेली आहे. अंतिम पीक असलेले तुरही बाजारात दाखल झाली आहे तर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या हळदीचीही आवक दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सरासरीप्रमाणे सर्वच शेतीमालाचा दर असला तरी मालाच्या दर्जानुसार भाव मिळत असल्याचे चित्र हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे.
हिंगोली : (Kharif Season) खरीप हंगामात सोयाबीन आणि तुरीचे (Heavy Rain) अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असले तरी सध्या याच शेतीमालाची आवक वाढलेली आहे. अंतिम पीक असलेले तुरही बाजारात दाखल झाली आहे तर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या हळदीचीही आवक दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सरासरीप्रमाणे सर्वच (Agricultural Goods) शेतीमालाचा दर असला तरी मालाच्या दर्जानुसार भाव मिळत असल्याचे चित्र हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सोयाबीनला तर बसलेलाच होता पण ऐन काढणीच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे तुरीचेही मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आता आवक तर सुरु झाली आहे पण चांगला तर हा चांगल्या प्रतीच्या शेतीमालालाच मिळत आहे. त्यामुळे बाजार समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, अधिकचा दर पाहिजे असेल तर चांगल्या प्रतीचा माल घेऊन यावा म्हणून. त्यामुळे शेतकऱ्यांना आता योग्य ती खबरदारी घेऊनच माल विक्रीस आणावा लागणार आहे.
कोणत्या शेतीमालाची आवक सुरुयं?
महाराष्ट्रात सर्वाधिक हळदीचे क्षेत्र हे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. शिवाय जिल्ह्यातील वसमत ही मोठी बाजारपेठ असून येथील चोख व्यवहारामुळे सध्या हळदीची आवक सुरु झाली आहे. तर सोयाबीनला अधिकचा दर मिळेल यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. आता अंतिम टप्यात शेतकरी सोयाबीनचीही विक्री करीत आहे शिवाय तुरीचीही आवक सुरु झाली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या हळद, तूर आणि सोयाबीनची आवक सुरु आहे. मात्र, चांगल्या प्रतीच्या शेतीमालाला अधिकचा दर हेच सूत्र ठरले आहे. मात्र, पावसामुळे व बदललेल्या वातावरणामुळे पिकांचा दर्जा ढासळलेला होता. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी दर मिळत आहे. शिवाय आर्द्रतेचे प्रमाणही अधिक असल्याने त्याचा परिणाम दरावर होत आहे.
कसे आहेत मुख्य पिकांचे दर?
गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 6 हजार 200 रुपयांवर स्थिरावलेले आहेत. असे असले तरी आवक मात्र, वाढलेली आहे. तुरीची आवकही दिवसेंदिवस वाढत आहे. हमीभाव केंद्रावर तुरीला 6 हजार 300 रुपये दर ठरवून दिला असताना आता खुल्या बाजारपेठेत 6 हजार 200 प्रमाणे सरासरी दर मिळत आहे. केंद्रावर तूर विक्री करताना अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव आणि पैशासाठी 15 दिवसांची वेटींग यामुळे शेतकरी थेट व्यापाऱ्याकडे विक्री करीत आहे. शिवाय तुरीचे दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. हळदीची काढणी कामे सुरु आहेत. हंगामाच्या सुरवातीला हळदीला 8 हजार 500 रुपये दर मिळत आहे. हा दर सरासरी एवढा असून भविष्यात यामध्ये वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.
शेतीमालाच्या दर्जानुसारच भाव
यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतीमालासाठी मागणी आहे. त्यामुळे कसल्याही प्रकारच्या शेतीमालाला अधिकची किंमत मिळेलच असे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा शेतीमाल आणला तरच अधिकची किंमतही मिळणार आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये माल आणण्यापूर्वीच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन सचिव नारायण पाटील यांनी केले आहे.
संबंधित बातम्या :
Untimely Rain: अवकाळीची अवकृपा सुरुच, आता थेट उत्पादनावर परिणाम
चोरट्यांनी हेही सोडलं नाही, रात्रीतून 20 टन टरबुज लंपास, 75 दिवसांची शेतकऱ्याची मेहनत मातीमोल