…यामुळे वाढली लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक, काय आहेत कारण?

सोयाबीनच्या दरात घट झाल्याने गेल्या आठवड्यापासून आवकही कमी झाली होती. शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिला होता. मात्र, शनिवारी अचानक सोयाबीनची आवक वाढली होती. कारण सोमवारपासून नाशिकप्रमाणेच लातूरची बाजार समितीही दिवाळी सणामुळे पाच दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे दिवाळी सणामुळे शनिवारी आवक वाढणार हे अपेक्षितच होते तर सोयाबीनला दरही 5150 रुपयांचा मिळाला होता.

...यामुळे वाढली लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक, काय आहेत कारण?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 3:14 PM

लातूर : सोयाबीनच्या दरात घट झाल्याने गेल्या आठवड्यापासून आवकही कमी झाली होती. (Latur Market) शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिला होता. मात्र, शनिवारी अचानक सोयाबीनची आवक वाढली होती.  (soyabean arrivals increased) कारण सोमवारपासून नाशिकप्रमाणेच लातूरची बाजार समितीही दिवाळी सणामुळे पाच दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे दिवाळी सणामुळे शनिवारी आवक वाढणार हे अपेक्षितच होते तर सोयाबीनला दरही 5150 रुपयांचा मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत उडदाची आवक वाढत होती. शिवाय उडदाला चांगला दरही होता. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे उडीद पीक नाही त्यांनी आज मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री केली होती.

दिवाळी सणामुळे बाजार समित्या ह्या बंद असतात. पणन संचालनालयाच्या नियमानुसार केवळ तीन दिवस बाजार समित्या ह्या बंद ठेवता येतात. मात्र, व्यापारी स्थानिक पातळीवरच एकमत करुन बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतात. त्यानुसारच नाशिकच्या व्यापारी महसंघाने निर्णय घेतला असून तेथील बाजारपेठ ही 10 दिवस बंद राहणार आहे. तर लातूरची बाजार समिती ही सोमवारपासून पाच दिवस व्यवहार ठप्प ठेवणार आहे. त्यामुळेच आज (शनिवारी) तब्बल 35 हजार पोत्यांची सोयाबीनची आवक झाली होती. खराब सोयाबीनची शेतकऱ्यांनी यापूर्वीच विक्री केली असून चांगल्या प्रतिच्या सोयाबीनला 5150 चा दर मिळाला होता.

दुपटीने वाढली सोयाबीनची आवक

शेतीमालाच्या दरानुसार त्याची आवक ही ठरत असते. यंदा मात्र, सोयाबीनचे दर आणि शेतकऱ्यांवर ओढावलेली परस्थिती यामुळे जशी वेळ ओढावेल तशी दराची काळजी न करता सोयाबीनची आवक बाजारपेठेत राहिलेली आहे. हंगामाच्या सुरवातीला खराब सोयाबीन आणि आर्द्रतेचे प्रमाण असल्याने सोयाबीनची साठवणूक करण्यापेक्षा विक्रीवर शेतकऱ्यांनी भर दिला होता. तर आता दिवाळी सणामुलळे सोयाबीन विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली होती. त्यामुळे दर वाढल्यामुळे सोयाबीनची आवक वाढली असे यंदाच्या हंगामात झालेच नाही.

सोमवारपासून 5 दिवस व्यवहार बंद

नाशिकची कृषी उत्पन्न बाजार समिती ही 10 दिवस बंद राहणार असली तरी लातूर आणि अकोला या दोन प्रमुख बाजार समित्या ह्या पाच दिवसच बंद राहणार आहेत. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललीतभाई शहा यांनी सांगितले आहे. या दरम्यान, शेतकऱ्यांची मात्र गैरसोय होणार आहे. पणन संचालनालयाच्या नियमानुसार केवळ तीन दिवस बाजार समित्या ह्या बंद ठेवता येतात मात्र, दरवर्षी या नियमांची अंमलबजावणी होत नाही आणि कोणत्या बाजार समितीवर कारवाईही होत नाही ही वस्तूस्थिती आहे.

आवक वाढूनही सोयाबीनला चांगला दर

शनिवारी तब्बल 35 हजार पोत्यांची सोयाबीनची आवक बाजार समितीमध्ये झाली होती. त्यानुसार सोयाबीनला 5150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. किमान शेवटच्या दिवशी तरी माफक प्रमाणात दर मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे तर दुसरीकडे उडदालाही 7170 चा दर मिळाला होता.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर-6241 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6150 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6001 रुपये क्विंटल, जानकी चना 4850 रुपये क्विंटल, विजय चणा 5000, चना मिल 4800, सोयाबीन 5350, चमकी मूग 7126, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7170 एवढा राहिला होता. (The arrival of soyabean in latur’s market committee increased, what are the reasons?)

संबंधित बातम्या :

सोयाबीनच्या दरासाठी आंदोलन करण्याची नामुष्की ; परळीत विम्यासाठी संघर्ष दिंडी

ऊस बिलातून वीज बिलाची होणार, साखर आयुक्तांचे ‘या’ पाच जिल्ह्यातील कारखान्यांना पत्र

आंबे बहरातील मोसंबी फळाची ‘अशी’ घ्या काळजी ; संशोधकांचा काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.