Monsoon : मान्सूनचे आगमन की केवळ घोषणाच..! तज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने संभ्रम
वामान विभागाने निकष पूर्ण झाले म्हणून घोषणा केल्याचे सांगितले असले तरी सलग दोन दिवस ते निकष टिकून राहणे गरजेचे होते. ते राहिले नाहीत. त्यामुळे हवामान विभागाच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.कालच्या रविवारपर्यंत हे निकष पूर्ण झाले नव्हते.
मुंबई : यंदा (Monsoon) मान्सूनचे वेळेपूर्वीच आगमन होणार असल्याचे एप्रिल महिन्यातच घोषित करण्यात आले होते. त्यानुसार 29 मे रोजी म्हणजेच 3 दिवस मान्सून केरळात दाखल झाल्याची घोषणाही करण्यात आली होती. पण (Meteorological Department) हवामान विभागाच्या घोषणेनंतर आता काही तज्ञांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मान्सूनचे आगमन हे असेच होत नाहीतर त्याबाबत काही निकष आहेत जे हवामान विभागानेच यापूर्वी घोषित केले आहेत. मात्र, या निकषांचीच पूर्तता झाली नसल्याचा दावा (Weather Experts) तज्ञांनी केला आहे. त्यामुळे देशात मान्सूनचे खरोखरच आगमन झाले आहे का असा सवाल कायम आहे.मान्सून दाखल होण्याची घोषणा करण्यापूर्वी केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटकातील 8 स्टेशनवर दोन दिवस किमान अडीच मिलिमीटर पाऊस हा पडतोच. त्यानंतरच मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली जाते. मात्र, ज्यावेळी हवामान विभागाने मान्सून आल्याची घोषणा केली तेव्हा केवळ 5 ठिकाणीच 2.5 मिमी पावसाची नोंद झाली होती.
या आधारावर हवामान विभागाने केली घोषणा
मान्सूनचे आगमन तसे एका रात्रीतून होत नाहीतर त्यासाठी अगोदरपासूनच अभ्यास केला जातो. 10 मे नंतर प्रेक्षेपणाच्या घोषणेनंतर 14 स्थानापैकी मिनीकॉय, अमिनी, तिरुवनंतपुरम, पुनलूर, कोल्लम, अल्लाप्पुझा, कोट्टायम, कोची, त्रिशूर, कोझीकोड, थलासेरी, कन्नूर, कुडुलू आणि मंगलोर या ठिकाणी 2.5 पाऊस झाला होता. वाऱ्याचा प्रवाह हा पश्चिम नैऋत्य असा होता. शिवाय या काळात ढग किती दाट होते यावर हवामान विभागाने घोषणा केली होती. मान्सूनचे आगमन झाले यासाठी ज्या गोष्टी पोषक आहेत त्या 29 मे दरम्यान झाल्या त्यामुळे हवामान विभागाने मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली.
तरीही हवामान विभागावर प्रश्नचिन्ह का?
हवामान विभागाने निकष पूर्ण झाले म्हणून घोषणा केल्याचे सांगितले असले तरी सलग दोन दिवस ते निकष टिकून राहणे गरजेचे होते. ते राहिले नाहीत. त्यामुळे हवामान विभागाच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.कालच्या रविवारपर्यंत हे निकष पूर्ण झाले नव्हते. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार कोट्टायम, कोल्लम, अलाप्पुझा, वायनाड आणि एर्नाकुलममध्ये काही ठिकाणी पाऊस पडला. मात्र, किती प्रमाणात पडला याची सर्वकश माहिती उपलब्ध झालेली नव्हती. सलग दोन दिवस पावसाची हजेरी लागल्यावरच मान्सून आल्याचे मानले जाते असे स्कायमेटचेही म्हणणे आहे.
चुकीच्या घोषणेमुळे काय होते नुकसान?
मान्सूनच्या आगमनाची सर्वाधिक आस ही शेतकऱ्यालाच असते. कारण या मान्सूनवरच भारतीय शेती अवलंबून आहे. केवळ आंदाजावर शेतकरी हा हंगामपूर्व मशागतीच्या कामापासून उत्पादन वाढीपर्यंतचे नियोजन करीत असतो. अशा प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित होत राहिले तर देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांनी पावसाची वाट पाहायची की नाही हा मोठा प्रश्न आहे. शिवाय अंदाज फेल ठरले तर पुन्हा दुबार पेरणीसारख्या खर्चिक बाजू शेतकऱ्यांना कराव्या लागतात. त्यामुळे हवामान विभागाचा अंदाज शेती व्यवसयाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. याबाबत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम. राजीवन यांनी सांगितले आहे की, केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली असली तरी मान्सून हा कमकुवत झाला असून मान्सूनची आगेकूच मंदावू शकते. एक आठवड्यानंतर मान्सून पूर्णपणे सक्रीय होईल असे ते म्हणाले.
काय आहे हवामान खात्याचा अंदाज?
सुरवातीपासूनच यंदा सरासरीऐवढा मान्सून बरसणार असल्याचा हवामान विभागाचा दावा राहिला आहे. संपूर्ण हंगामात 103 पावसाची शक्यता आहे तर एप्रिल महिन्यामध्ये 99 टक्के पाऊस होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. आयएमडीच्या अहवालानंतर भारतामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. कारण यावरच भारतीय शेती ही अवलंबून आहे.