Sangli : सांगलीवाडीच्या शिवारात बैलगाडा शर्यतीचा धुरळा, शर्यतीमध्ये ना काठी-ना लाठी
बैलगाडा शर्यत हा केवळ मनोरंजनाचा विषय राहिलेला नाही तर राज्याची परंपरा आणि शर्यतीबद्दल सर्वसामान्यांना किती प्रेम आहे याचे दर्शन सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथील बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमादरम्यान घडून आले आहे. सांगलीवाडी लक्ष्मी फाटा येथे महालक्ष्मी यात्रे निमित्त विना काठी लाठी भव्य बैलगाडा शर्यती पार पडल्या. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्यातील यात्रा ह्या बंद होत्या.
सांगली : बैलगाडा शर्यत हा केवळ मनोरंजनाचा विषय राहिलेला नाही तर राज्याची परंपरा आणि शर्यतीबद्दल सर्वसामान्यांना किती प्रेम आहे याचे दर्शन (Sangli) सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथील (Bullock cart race) बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमादरम्यान घडून आले आहे. सांगलीवाडी लक्ष्मी फाटा येथे महालक्ष्मी (Yatra Festival) यात्रे निमित्त विना काठी लाठी भव्य बैलगाडा शर्यती पार पडल्या. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्यातील यात्रा ह्या बंद होत्या. यंदा मात्र कोरोना निर्बंधातून मुक्तता झाली असून न्यायालयाच्या नियम अटींचे पालन करीत ह्या शर्यती पार पडत आहेत. हिंदवी फेडरेशनच्या माध्यमातून या बैलगाडा शर्यती पार पडल्या असून यावेळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची देखील उपस्थिती होती.
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीच्या प्रेमाचे दर्शन : मंत्री जयंत पाटील
सांगलीवाडीच्या शिवारात बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजारोच्या संख्यने जनसमुदाय आला होता. शिवाय बैलजोड्यांची संख्याही लक्षणीय होती. येथील वातावरण आणि तरुणांचा उत्साह हा बैलगाडा शर्यतीबद्दलचे प्रेम सांगण्यापुरता पुरेसा असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. तर महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शर्यत किती लोकप्रिय आहे याचे मुर्तीमंद उदाहरण या शर्यती वरून दिसून आल्याचे ते म्हणाले. पण आता सर्व नियमांचे पालन करून शर्यत होत आहेत हे विशेष.
हजारोंची बक्षिसे अन् लाखों रुपये किंमतीच्या बैलजोड्या
गेल्या अनेक दिवसांपासून बैलगाड्या शर्यती ह्या पार पडलेल्या नव्हत्या त्यामुळे यंदाच्या बैलगाडी शर्यतीचे एक वेगळेपण होते. या दरम्यान मोठी गर्दी होणार याचा अंदाज वर्तवला जात होता. सांगलीच्या लक्ष्मी फाटा येथे महालक्ष्मी यात्रे निमित्त विना काठी लाठी भव्य बैलगाडी शर्यती पार पडल्या. या बैलगाडीच आयोजन हिंदवी फोउडेशन सांगलीवाडी यांच्या वतीने करण्यात आले होते. तर प्रथम क्रमांक ला 51 हजाराचे बक्षीस तर द्वितीय क्रमांकाला 31 हजाराचे बक्षीस तर तृतीय क्रमांक ला 21 हजाराचे बक्षीस देण्यात आले. या बैलगाडी शर्यती मध्ये तब्बल 35 लाखाच्या बैलाने सहभाग घेतला.
बैलगाडी शर्यतीमुळे ग्रामीण अर्थकारणावरही परिणाम
बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यापासून नियम-अटींची पूर्तता करीत या शर्यती पार पडल्या जात आहेत. या केवळ शर्यतीच नाही तर शर्यतीच्या आयोजनामुळे ग्रामीण अर्थकारणावर अनुकूल परिणाम झाला आहे. शर्यतीच्या ठिकाणी लाखोंची उलाढाल होत आहे तर बैलजोडीला पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे. शर्यतीसाठी खिलार बोल जोडीला मागणी असते. त्यामुळे खिलार बैलजोडीच्या किंमती ह्या लाखोंच्या घरात गेल्या आहेत. शिवाय जनावरांचे आठवडी बाजार भरत असून पुन्हा बैलजोडीला महत्व प्राप्त झाले आहे.
संबंधित बातम्या :
Gondia | गोंदियात Cycle Sunday Group ची अनोखी दिलदारी, पक्षांनाही मिळतेय थंडगार पाणी
Photo Gallery : वाढत्या उन्हामुळे विहिरींनी तळ गाठला, आता धरणातील पाण्याचा पिकांना आधार
Excess Sugarcane: आता शिल्लक उसाला अनुदान..! राज्य सरकारची घोषणा शेतकऱ्यांना प्रतीक्षा अंमलबजावणीची