कृषी विभागाचा सल्ला, शेतकऱ्यांकडून अंमलबजावणी अन् उन्हाळी हंगामात झाली ‘ही’ क्रांती

पीक पध्दतीमध्ये बदल काय असतो याचा प्रत्यय यंदाच्या उन्हाळी हंगामात आला आहे. शेतकऱ्यांनी मुख्य बाजूला करीत बिगरहंगामी पिकांवर भर दिला आहे. उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने हा अमूलाग्र बदल शेती व्यवसयात पाहवयास मिळत आहे. मात्र, याबदलामध्ये केवळ शेतकऱ्यांची भूमिकाच महत्वाची नाही तर कृषी विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे पीक पध्दतीमध्ये बदल झालेला आहे.

कृषी विभागाचा सल्ला, शेतकऱ्यांकडून अंमलबजावणी अन् उन्हाळी हंगामात झाली 'ही' क्रांती
उन्हाळी हंगामातील सोयाबीन पीक
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 11:50 AM

नांदेड : पीक पध्दतीमध्ये बदल काय असतो याचा प्रत्यय यंदाच्या (Summer Season) उन्हाळी हंगामात आला आहे. शेतकऱ्यांनी मुख्य बाजूला करीत बिगरहंगामी पिकांवर भर दिला आहे. उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने हा अमूलाग्र बदल शेती व्यवसयात पाहवयास मिळत आहे. मात्र, याबदलामध्ये केवळ शेतकऱ्यांची भूमिकाच महत्वाची नाही तर (Agricultural Deparment) कृषी विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे पीक पध्दतीमध्ये बदल झालेला आहे. उन्हाळी (Soybean Crop) सोयाबीनमुळे आता खरिपात बियाणाचा तर तुटवडा भासणारच नाही पण यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे. कारण एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये तब्बल 5 हजार हेक्टरावर उन्हाळी सोयाबीनचा पेरा झाला आहे. केवळ पेराच नाही तर सध्याच्या अवस्थेत ही पीक योग्य स्थितीत असल्याचा अहवाल कृषी विभागानेच दिला आहे. त्यामुळे उत्पन्न आणि भविष्यातील बियाणाचा प्रश्न मार्गी असा दुहेरी उद्देश शेतकऱ्यांना साधता आलेला आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात बियाणांबाबत शेतकरी हा आत्मनिर्भर होणार आहे.

आतापर्यंत विकतच्या बियाणाचा आधार

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात सर्वाधिक उन्हाळी सोयाबीनचा पेरा झाला आहे. भविष्यात बियाणांचा तुटवडा भासू नये म्हणूनच शेतकऱ्यांनी सोयाबीनवर भर दिला आहे. दरवर्षी विकतचे बियाणे घेऊनच जमिनीत गाढावे लागत होते. त्यामुळे कधी शेतकऱ्यांची फसवणूक तर कधी उत्पादनात घट अशा समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता घरच्य़ा बियाणांचा आधार शेतकऱ्यांना मिळणार आहे. यंदा बियाणांचा तुटवडा होणारच नाही असा विश्वास आताच व्यक्त केला जात आहे. शिवाय दिवसेंदिवस बियाणांचे दर हे वाढत असल्याने आर्थिक झळही अधिक बसत असल्याने शेतकऱ्यांचा निर्णय फायद्याचा ठरणार आहे.

कृषी विभागाकडून पीक पाहणी

कृषी विभागाच्या पुढाकारानेच पीक पध्दतीमध्ये बदल झाला आहे. पोषक वातावरण मुबलक पाणी यामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढीचे प्रयत्न करणे गरजेचे होते. त्याअनुशंगाने जनजागृतीही करण्यात आली होती. आता सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. बियाणांसाठी सोयाबीनची योग्य पध्दतीने वाढ होणे गरजेचे आहे. शिवारातील सोयाबीनची आवस्था काय याची पाहणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. सध्या पिकाची वाढ योग्य असून शेतकऱ्यांना बियाणे म्हणून याचा वापर करता येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

शेतकऱ्या्ंच्या उत्पादनातही भर

केवळ बियाणांसाठीच नाही तर खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी हा अनोखा प्रयोग केला आहे. सध्या सोयाबीनला 6 हजार रुपये दर मिळत आहे. हेच दर भविष्यात कायम राहिले तर खरिपात झालेले नुकसान भरुन निघणार आहे. उत्पादनवाढीच्या अनुशंगाने सध्या शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

संबंधित बातम्या  :

Rabi Season : सकाळी थंडी अन् दुपारी उन्हाचा चटका, पिकांसाठी पोषक की हानिकारक..! काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

काय सांगता? महावितरणच देणार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, एकाच मोर्चात अनेक प्रश्न मार्गी..!

कृषी पंपासाठी चार तासच वीज पुरवठा, खरिपात निसर्गाचा लहरीपणा अन् रब्बीत महावितरणचा मनमानी कारभार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.