मुंबई : वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम यंदा फळबाग क्षेत्रांवर झालेला आहे. यामध्ये ( Grape fruit) द्राक्ष आणि आंबा फळबागांचा प्रकर्षाने सहभाग होतो. (Climate Change) सद्यः परिस्थिती पाहता वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण वाढले आहे. वाढलेली थंडी आणि सकाळी पडणारे दवामुळे द्राक्ष बागेत भुरी रोगास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आगोदर द्राक्षांच्या उबदार ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून रात्र पाळीने शेकोट्या पेटवल्या जात आहेत. ढगाळ हवामान, कमी ते मध्यम तापमान व दमट वातावरण या बाबी भुरी रोगासाठी अनुकूल आहेत. दिवसातील कोरडे वातावरण आणि कमी तापमान अशा अनुकूल परिस्थितीमध्ये (brown disease) भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. यावर्षी सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे बागेत एकाच वेळी डाऊनी मिल्ड्यू प्रमाणेच भुरी रोगामुळे देखील द्राक्ष उत्पादनात मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी भुरी रोगाची लक्षणे अचूक ओळखता येणे आवश्यक आहे.
* प्रतिकूल वातावरणामुळे इरिसिफे निकेटर या रोगकारक बुरशीचा प्रादुर्भाव द्राक्ष बागेवर होतो. या रोगाचा प्रादुर्भामुळे वेलीच्या सर्व हिरव्या भागावर होतो. मात्र बुरशीचे धागे प्रत्यक्ष वेलीच्या भागात प्रवेश न करता पृष्ठभागावरच वाढतात.
* पानांच्या खालील बाजूस काळसर रंगाचे डाग दिसून येतात. सुरुवातीला पानावर पांढरट ठिपके व नंतर ते भुरकट होऊन संपूर्ण पान काळपट दिसते. वाढत्या प्रसारासोबत हे डाग मोठे व भुरकट रंगाचे होत जातात.
* फुलोरा अवस्थेत रोगाची लागण झाल्यास फलधारणा होत नाही. फळ धारणेच्या वेळी प्रादुर्भाव असल्यास मणी लहान आकाराचे होतात. काही मणी अपरिपक्वच राहतात. पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा थर मण्यांवर येऊन मणी तडकतात व फुटतात
* पावसाळ्याच्या दिवसांत कमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामध्ये वाऱ्यामार्फत भुरी रोगाचा प्रसार अधिक प्रमाणात होतो.
(संबंधित माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे येथील डॉ. सुजोय साहा यांच्या लेखातील आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसारच शेतकऱ्यांनी व्यवस्थापन करावे)
Kharif Season : सोयाबीन, कापसानंतर आता तुरीवर मदार, आवक सुरु दराचे काय?
Natural Farming: देशभरात 43 लाखांहून अधिक शेतकरी करतात सेंद्रिय शेती, ‘हे’ राज्य आहे आघाडीवर
निवड झाली आता अंमलबजावणी करा अन् योजनेचा लाभ घ्या, पशूसंवर्धन विभागाचे काय आहे आवाहन?