सोयाबीनला माफक दर तरीही साठवणूकीवरच ‘भर’, शेतकऱ्यांचा दराबाबत आशा उंचावल्या
दिवाळीनंतर साठवणूकीतले सोयाबीन विक्रीसाठी काढले जाईल अशी अपेक्षा होती मात्र, अद्यापही शेतकऱ्यांचा साठवणूकीवरच भर आहे. बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कमी आहे तर बुधवारच्या तुलनेत आज (गुरुवारी) दरात सुधारणा झाली होती. मात्र, बाजारपेठेत कमालीचा शुकशुकाट पाहवयास मिळत आहे.
लातूर : गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात सध्या 1 हजार रुपयांनी दर वाढलेले आहेत. मात्र, असे असतानाही शेतकऱ्यांची (Soybean) सोयाबीन विक्रीची (Farmer) मानसिकता नाही. दिवाळीनंतर साठवणूकीतले सोयाबीन विक्रीसाठी काढले जाईल अशी अपेक्षा होती मात्र, अद्यापही शेतकऱ्यांचा साठवणूकीवरच भर आहे. बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कमी आहे तर बुधवारच्या तुलनेत आज (गुरुवारी) दरात सुधारणा झाली होती. मात्र, बाजारपेठेत कमालीचा शुकशुकाट पाहवयास मिळत आहे.
हंगामाच्या सुरवातीला मुहूर्ताच्या सोयाबीनला 11 हजाराचा दर मिळाला होतो. पण तो मुहूर्ताच्या सोयाबीनला होता. हा दर काही कायम टिकून राहत नाही. याची कल्पनाही शेतकऱ्यांना असतेच पण त्यानंतर सोयाबीनच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम आजही जाणवत आहे. झपाट्याने सोयाबीनचे दर घसरले त्या पध्दतीने ते वाढतीव अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे विकण्याऐवजी सोयाबीनच्या साठवणूकीवर भर दिला जात आहे.
गतवर्षी सोयाबीनला 4500 चा दर
सोयाबीन हे खरिपातील नगदी पिक आहे. शिवाय मराठवाड्यातच नव्हे तर सबंध राज्यात सोयाबीनचे क्षेत्र हे वाढलेले आहे. उत्पादनाच्या दृष्टीने सोयाबीन बाबत शेतकऱ्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत. त्यामुळेच गतवर्षी सोयाबीनला सरासरी 4500 चा दर होता तरी लातूरच्या बाजार समितीमध्ये 40 ते 50 हजार क्विंटलची आवक होती. आता सोयाबीनला 5200 चा सरासरी दर आहे. मात्र, आवक ही 12 ते 14 हजार क्विंटलची होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत 1000 रुपयांनी वाढ झालेली असतानाही सोयाबीन विक्रीची शेतकऱ्यांची मानसिकता नाही.
साठवणूक करा पण योग्य काळजी घ्या
यंदा सोयाबीन काढणीनंतरही आणि मळणीनंतरही पावसात भिजलेले आहे. त्यामुळे त्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे. असे असतनाही शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूकीवरच भर दिलेला आहे. मात्र, साठवणूक केलेल्या सोयाबीनला वाळवणेही गरजेचे आहे. एकाच ठिकाणी अधिकचा काळ सोयाबीन थप्पी लावून ठेवले तर बुरशी लागण्याचा धोकी आहे. सोयाबीन ओले असतानाच काढणी आणि कापणी ही झालेली आहे. त्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण हे वाढलेले आहे. त्याचे प्रमाण हे 10 ते 12 पर्यंत येणे आवश्यक आहे. शिवाय हे प्रमाण मोजण्याचे यंत्रही बाजार पेठेत आहे.
पुन्हा उडीद वधारला
बुधवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाचे दर हे घटले होते. हंगामात क्वचितच उडदाचे दर हे घसरलेले आहेत. बुधवारी उडदाला 7 हजाराचा दर मिळाला होता. आतापर्यंत किमान 7200 दर उडदाला राहिलेला आहे. मात्र, बुधवारी यामध्ये घसरण झाली होती. तर गुरुवारी पुन्हा उडदाच्या दरात वाढ झाली आहे. गुरुवारी उडदाला 7300 चा दर मिळाला आहे. त्यामुळे उडदानेच शेतकऱ्यांना यंदा तारलेले आहे. मात्र, आता उडीद शिल्लक नाही तर शेतकरी हे सोयाबीनच्या साठवणूकीवर लक्ष केंद्रीत करीत आहेत.
इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरुवारी लाल तूर- 6200 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6000 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6050 रुपये क्विंटल, जानकी चना 5000 रुपये क्विंटल, विजय चणा 50000, चना मिल 4900, सोयाबीन 5411, चमकी मूग 7200, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7300एवढा राहिला होता.
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांना दिलासा : नविन तुरीला मिळणार योग्य दर, मात्र, संवर्धनाची घ्यावी लागणार काळजी
कामगंध सापळ्यातून कीडीचे व्यवस्थापन नेमके होते कसे? व्यवस्थापनात सापळ्यांची भूमिका काय?
नुकसानभरपाई मिळण्यास आणेवारीचा अडसर, कशी ठरवली जाते आणेवारी ?
https://www.youtube.com/c/TV9MarathiLive/videos