AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangola : डाळिंब बागांचे अस्तित्व धोक्यात, पिन होल बोअरने घातला शेतकऱ्यांच्या काळजावरच ‘घाव’

वातावरणातील बदलाचा परिणाम हा डाळिंब बागावर होऊ लागाला आहे. गेल्या दोन वर्षापासून पीक बहरात असतानाच अवकाळी पाऊस अन् तोडणीच्या प्रसंगी वाढते ऊन. यामुळे डाळिंबाला पिन होल बोअरचा प्रादुर्भाव वाढत आहे. या खोड किडीमुळे डाळिंबाचे झाड हे पोखरले जाते. शिवाय त्याची वाढ तर खुंटतेच पण फळलागवडीवरही त्याचा परिणाम होतो.

Sangola : डाळिंब बागांचे अस्तित्व धोक्यात, पिन होल बोअरने घातला शेतकऱ्यांच्या काळजावरच 'घाव'
डाळिंब बाग
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 10:13 AM

सांगोला : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याच्या खडकाळ शिवारात गेल्या काही वर्षांपासून (Pomegranate garden) डाळिंब बागा बहरत आहेत. पोषक वातावरण आणि पाण्याचा पुरवठा यामुळे डाळिंब उत्पादनात या तालुक्याने देशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण ज्या वातावरणामुळे हे शक्य झाले त्या (Adverse environment) प्रतिकूल वातावरणामुळे आता डाळिंब बागांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या दोन वर्षापासून (Untimely Rain) अवकाळी पाऊस आणि पिन होल बोअरचा वाढता प्रादुर्भाव यामुळे बागा मोडल्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. पिन होल बोअरचा प्रादुर्भाव झालेले झाड काढले नाहीतर त्याचा परिणाम इतर झाडांवरही होत आहे. त्यामुळे तालुक्यातील निम्म्या पेक्षा अधिक क्षेत्र हे मोकळे झाले आहे. एवढेच नाही तर कामगारांनी आणि साध्या यंत्राच्या सहाय्याने ही तोड शक्य नसल्याने अत्याधुनिक मशीनही सांगोल्यात दाखल झाली आहे. गेल्या 20 वर्षापासून जोपासलेल्या बागा शेतकऱ्यांसमोर उध्वस्त केल्या जात आहेत.

काय आहे पिन होल बोअर?

वातावरणातील बदलाचा परिणाम हा डाळिंब बागावर होऊ लागाला आहे. गेल्या दोन वर्षापासून पीक बहरात असतानाच अवकाळी पाऊस अन् तोडणीच्या प्रसंगी वाढते ऊन. यामुळे डाळिंबाला पिन होल बोअरचा प्रादुर्भाव वाढत आहे. या खोड किडीमुळे डाळिंबाचे झाड हे पोखरले जाते. शिवाय त्याची वाढ तर खुंटतेच पण फळलागवडीवरही त्याचा परिणाम होतो. एवढेच नाही तर प्रादुर्भाव झालेले झाड उध्वस्त केले नाही तर पिन होल बोअरचा प्रादुर्भाव अधिक गतीने वाढतो. एवढे असतानाही त्यावर नियंत्रण करता येईल असे किडनाशक बाजारपेठेत उपलब्ध नाही. त्यामुळे आता बाग जोपासण्यापेक्षा काढून टाकण्यावरच अधिकचा भर आहे.

बाग काढण्यासाठी अत्याधुनिक मशीन सांगोल्यात

आतापर्यंत पीक संवर्धनासाठी वेगवेगळे उपाय राबवलेले पाहिले आहेत. पण सांगोल्यात मात्र, डाळिंब बाग हातावेगळी करण्यासाठी अत्याधुनिक मिशनरी दाखल होत आहेत. आता सांगोल्यातील दीपक चव्हाण यांनी हि कटिंग मशीन आणली असून तालुक्यातील शेकडो एकरावरील बागा त्यांनी तोडून त्यापासून बायोकोल बनविला आहे. आता या जळालेल्या बागा काढण्यासाठी पुन्हा हजारो रुपये खर्च करावा लागत असल्याने शेतकरी आता थेट मशीनच्या साहाय्याने बागा तोडू लागले आहेत. तोडलेली झाडे मशीनमध्ये घालून याचा भुगा केला जातो. या झाडांचा भुगा करून त्याच्या ब्रिकेट बनविण्यात येतात . या ब्रिकेटचा वापर उद्योग क्षेत्रातील बॉयलरला इंधन म्हणून केला जातो .

हे सुद्धा वाचा

युरोपच्या बाजारात अधिकची मागणी

महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या सांगोला तालुका हा डाळिंबासाठी देशभर प्रसिद्ध होता . सांगोल्याचे डाळिंबे थेट सातासमुद्रापार असलेल्या युरोपच्या बाजारात भाव खात असत . डाळिंबामुळे सांगोल्यातील शेतकऱ्याला समृद्धी तर आलीच शिवाय एकमेकांच्या स्पर्धेमुळे तालुक्याचे उत्पन्नही कितीतरी पटीत वाढत होते. पौष्टिकतेच्या दृष्टीकोनातून येथील डाळिंबाला वेगळे असे महत्व होते. पण डाळिंब बाग संशोधन परिषद, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे बागांच्या संरक्षणासाठी योग्य अशी पावले उचलली गेली नसल्याने आता बागांनी बहरलेला डोंगरमाथा उजाड माळरानाच्या स्वरुपात दिसत आहे.