निर्णय झाला आता दरही ठरणार, द्राक्ष बागायत संघाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष

शेतकऱ्यांच्या एकजूटीपुढे झुकावे लागते हे कृषी कायद्यांचा निर्णय मागे घेण्यावरुन समोर आलेच आहे. अशीच एकजूट आता द्राक्ष बागायत शेतकऱ्यांची दिसून येत आहे. उत्पादनावरील खर्च, नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान आणि द्राक्षांचे घटते दर यामुळे आता उत्पादक ठरवतील तोच दर निश्चित केला जाणार असल्याची भूमिका द्राक्ष बागायत संघाने घेतलेली आहे.

निर्णय झाला आता दरही ठरणार, द्राक्ष बागायत संघाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 2:36 PM

नाशिक : शेतकऱ्यांच्या एकजूटीपुढे झुकावे लागते हे कृषी कायद्यांचा निर्णय मागे घेण्यावरुन समोर आलेच आहे. अशीच एकजूट आता ( Grape farmers) द्राक्ष बागायत शेतकऱ्यांची दिसून येत आहे. उत्पादनावरील खर्च, नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान आणि (Grape Rate) द्राक्षांचे घटते दर यामुळे आता उत्पादक ठरवतील तोच दर निश्चित केला जाणार असल्याची भुमिका द्राक्ष बागायत संघाने घेतलेली आहे. आतापर्यंत निर्णयावर ठाम होण्यासाठी बैठका पार पडल्या होत्या पण आता निर्णय तर झाला असून शनिवारी दरनिश्चितीसाठी अंतिम बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत जर द्राक्षाच्या दराबाबत निर्णय झाला तर त्याचा परिणाम इतर पीक उत्पादकांवर देखील होणार आहे.

द्राक्ष बागायत संघावर ही वेळ का आली?

अवकाळी पावसामुलळे दरवर्षी द्राक्ष बागांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. असे असताना शासनाच्यावतीने सुरक्षतेच्या अनुशंगाने अनुदानाचे वाटप होत नाही. क्रॅाप कव्हरसाठी अनुदान आहे. शिवाय याची पुर्तता करण्याची मागणी शेतकरी हे दरवर्षी करीत आहेत मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे निर्यातीवर शुल्क आणि द्राक्ष पॅकिंगसाठी होणारा खर्च ही उत्पादकांवरच लादला जात आहे. हा खर्च ग्राहकांवर किंवा बाजारपेठेतून काढण्याची मागणी हे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. यावर कोणताही निर्णय होत नसल्याने अखेर द्राक्ष उत्पादक हे एकत्र आले असून द्राक्षाला काय दर असावा त्याअनुशंगाने गेल्या दोन दिवसांपासून बैठका पार पडत आहेत. मात्र, दरावर शनिवारी शिक्कामोर्तब होणार आहे.

एका निर्णयाचा परिणाम अनेक घटकांवर

द्राक्ष उत्पादक संघाने जर एकच दर ठरवला तर आगामी काळात अनेक फळ उत्पादक किंवा वेगवेगळे पिकांचे उत्पादन घेणारे शेतकरीही असा निर्णय घेऊ शकतील. मात्र, हे दर ठरवताना उत्पादनावर झालेल्या खर्चाचा विचार करुनच ठरवला जाणार आहे. शिवाय एकदा दर ठरले तर मात्र, त्याच्या खालच्या दराने विक्री करता येणार नाही. महिन्याच्या प्रत्येक आठवड्यासाठी आणि द्राक्षाच्या वाणानुसार तपशीलनिहाय दर हे निश्चित केले जाणार आहेत.

काय आहे बागायतदार संघाचे अवाहन

हजारो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय होणार आहे. त्यामुळे सर्व गोष्टींबाबत वस्तुनिष्ठ अभ्यास करुनच हे दर ठरवले जाणार आहेत. या बैठकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना देखील आपली मते मांडता येणार आहेत. त्यामुळे शनिवारी दुपारी द्राक्ष भवन येथे शेतकऱ्यांनी तसेच संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी केले आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

तूर आयातीमुळे हमीभावापर्यंतही पोहचले नाहीत दर, काय राहणार खरिपातील शेवटच्या पिकाचे भवितव्य

अवकाळीची अवकृपा : अहवाल मागवला पण पंचनाम्यांशिवाय भरपाई मिळणार तरी कशी? शेतकरी चिंताग्रस्त

Marathwada : पैसेवारीचे महत्व काय असते ? शेतकऱ्यांचा फायदा अन् तोटा वाचा सविस्तर

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.