घरच्याच सोयाबीन बियाणाची उगवण चांगली, काय आहे कृषी विभागाचा उपक्रम ?

ऐन पेरणीच्या तोंडावर हजारो रुपये खर्च करुन घेतलेल्या बियाणांच्या उगवणीपेक्षा घरच्याच सोयाबीन बियाणांची उगवण चांगली आहे. यासंदर्भात कृषी विभागाने तसा सर्व्हे केला असून घरगुती बियाणे घेऊन ज्यांनी पेरणी केली होती त्यांच्या पिक उगवणीबाबतच्या तक्रारी ह्या कमी आहेत. तर बाजारातून विकतचे बियाणे घेऊन ज्या शेतकऱ्यांनी खरिपात पेरणी केली होती त्यांच्या तक्रारी अधिक आहेत.

घरच्याच सोयाबीन बियाणाची उगवण चांगली, काय आहे कृषी विभागाचा उपक्रम ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 3:32 PM

लातूर : ऐन पेरणीच्या तोंडावर हजारो रुपये खर्च करुन घेतलेल्या बियाणांच्या उगवणीपेक्षा घरच्याच (Soybean Seeds) सोयाबीन बियाणांची उगवण चांगली आहे. यासंदर्भात (Latur Agriculture Department) कृषी विभागाने तसा सर्व्हे केला असून घरगुती बियाणे घेऊन ज्यांनी पेरणी केली होती त्यांच्या पिक उगवणीबाबतच्या तक्रारी ह्या कमी आहेत. तर बाजारातून विकतचे बियाणे घेऊन ज्या शेतकऱ्यांनी खरिपात पेरणी केली होती त्यांच्या तक्रारी अधिक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी हंगामातही घरच्याच बियाणांचा वापर करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

उत्पादनात वाढ व्हावी या दृष्टीने शेतकरी महागडे बियाणे घेऊन चाढ्यावर मूठ धरतो खरा मात्र, या बियाणांची उगवणच होत नाही. आता खरीप हंगाम संपल्यानंतर लातूर कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरले त्यांची उगवण क्षमता चांगली होती शिवाय ज्या शेतकऱ्यांनी विकतचे बियाणे जमिनीत गाढले त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी ह्या जास्त आहेत. त्यामुळे घरच्याच बियाणावर भर देण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

सोयाबीन मुख्य पिक, विकतेचे बियाणे परवडतही नाही

लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात सोयाबीन हे खरिपातील मुख्य पिक आहे. त्यामुळे याचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. तर दुसरीकडे विकतचे सोयाबीनचे बियाणे हे महागडे असून पुन्हा उगवण होते की नाही यावरुन शंका निर्माण होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आगामी काळातही घरचेच बियाणे वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्पादनावरही चांगला परिणाम होणार आहे.

काय आहे कृषी विभागाचे नियोजन

जिल्हयात सोयाबीन पिकाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र त्यासाठी लागणारे बियाणे बाजार महाग असतात. त्याची खरेदी शेतकऱ्यांना परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे राखून ठेवले पाहिजे. सोयाबीन ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत खरीप हंगाम 2022 करीता जिल्हयात 446.475 लाख क्विंटल बियाणे राखून ठेवण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार कृषी विभाग कामालाही लागलेला आहे. शेतकऱ्यांनीही त्यांच्या योगदानातून हे बियाणे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

बीजप्रक्रिया महत्वाचीच

बीजप्रक्रिया ही अत्यंत साधा आणि सोपी पध्दत पण तेवढीच महत्वाची आहे. कारण यावरचे पीकाची उगवणक्षमता अवलंबून असते. तर पेरणीपूर्वी अवघ्या एक ते दोन तास आगोदर शेतकऱ्यांनी जे बियाणेची पेरणी करायची आहे त्या एक किलो प्रति बियाणाला 3 ग्रॅम थायराम किंवा कॅप्टन अन्यथा बाविस्टीन यापैकी एकाने ते बियाणात मिसळयाचे आहे. त्यानंतर रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची 10 मिली प्रति 1 किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रीया करुन हे बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी लागणार आहे. मात्र, वरती सांगितल्याप्रमाणेच शेतकऱ्यांनी प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

बीजप्रक्रियेचे फायदे काय आहेत ?

बीजप्रक्रिया करुन योग्य अंतरावर पेरणी केली तर उगवण क्षमता ही चांगली होणार आहे. शिवाय उगवून आलेल्या झाडांची मर होत नाही. एवढेच नाही तर भविष्यात रब्बी हंगामातील पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.

संबंधित बातम्या :

सकारात्मक : लातूरमध्ये सोयाबीनची आवकही वाढली अन् दरही, आता शेतकऱ्यांचीच भूमिकाच महत्वाची

डाळिंबाच्या दरात घट, फळबागायत शेतकऱ्यांचा साठवणुकीवरच भर

कृषीपंपाचे नुकसान टाळण्यासाठी ‘हे’ आहेत पर्याय, शेतकऱ्यांसाठी महत्वाचे

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.