कृषी आयुक्तांची एक सुचना अन् हळद लागवडीचे गुपीत आले बाहेर, उत्पादन वाढीबाबत काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला ?

प्रत्येक पिकाचे सरासरी क्षेत्र हे ठरलेले असते. त्यानुसारच उत्पादकता आणि लागवडीचे क्षेत्र हे ठरवले जाते. पण हळद पिका याबाबतीत अपवादात्मक होते. कारण आतापर्यंत ढोबळमानानेच हळदीचे सरासरी क्षेत्र ठरवले जात होते. मात्र, आयुक्तांच्या सुचनेनंतर आता कुठे बांधावर जाऊन लागवडीची नोंद घेण्यात आली तेव्हा वेगळेच गुपीत बाहेर पडले आहे. देशात हळद लागवडीत महाराष्ट्र हा अव्वल स्थानी असल्याचे समोर आले आहे.

कृषी आयुक्तांची एक सुचना अन् हळद लागवडीचे गुपीत आले बाहेर, उत्पादन वाढीबाबत काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 3:27 PM

नागपूर : प्रत्येक पिकाचे सरासरी क्षेत्र हे ठरलेले असते. त्यानुसारच उत्पादकता आणि लागवडीचे क्षेत्र हे ठरवले जाते. पण हळद पिका याबाबतीत अपवादात्मक होते. कारण आतापर्यंत ढोबळमानानेच (Turmeric Production) हळदीचे सरासरी क्षेत्र ठरवले जात होते. मात्र,  (agriculture commissioner) आयुक्तांच्या सुचनेनंतर आता कुठे बांधावर जाऊन लागवडीची नोंद घेण्यात आली तेव्हा वेगळेच गुपीत बाहेर पडले आहे. देशात हळद लागवडीत महाराष्ट्र हा अव्वल स्थानी असल्याचे समोर आले आहे. राज्यात 82 हजार हेक्टरावर हळदीची लागवड करण्यात आली आहे तर यापूर्वी तेलंगणा राज्यात सर्वाधिक लागवड असल्याची नोंद होती.

कमी उत्पादकतेमुळे दर तेजीत

लांबणीवर पडलेला पाऊस, हळद क्षेत्रामध्ये साचलेले पाणी शिवाय अंतिम टप्प्यात करपा रोगाचा प्रादुर्भाव यामुळे हळदीच्या उत्पादकतेमध्ये घट झाली आहे. त्यामुळे आता हळदीचे दर हे 10 हजार रुपये क्विंटलकडे वाटचाल करीत आहेत. यंदा 15 ते 20 उत्पादकतेमध्ये घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सांगली-सातारा या भागातील हळद ही फेब्रुवारीपर्यंत काढली जाते तर मराठवाड्यातील सांगली, परभणी, हिंगोली येथेही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हळदीच्या वैशिष्टानुसार हळदीचे दर हे ठरले जातात. सौदार्य प्रसाधनासाठी हिंगोली येथील हळदीला अधिकची मागणी आहे. यातच यंदा उत्पादकता घटल्याने दरात तेजी राहणार आहे.

अशाप्रकारे वाढवा हळदीचे उत्पादन

राज्यात सर्वाधिक क्षेत्र हे मराठवाड्यात आहे. यापूर्वी हळदीची लागवड ही वरंब्यावर केली जात होती. त्यामुळे उत्पादनात घट होत होती. काळाच्या ओघात गादी वाफा, फर्टिगेशन, ठिबक सिंचन अशा व्यवस्थापनेचा वापर वाढत गेला. त्यामुळे लागवड क्षेत्रामध्ये आणि उत्पादकतेमध्येही वाढ झाली आहे. बिहार नंतर महाराष्ट्रातच सर्वाधिक उत्पादकता असल्याचे वृत्त अॅग्रोवन ने प्रकाशित केले आहे. येथील वातावरण, शेतजमिन यामुळे उत्पादकता वाढत आहे. तर अधिकच्या दरामुळे शेतकऱ्यांचा कलही वाढत आहे. मराठवाड्यातील हिंगोली येथे मोठी बाजारपेठ असून येथील हळद परराज्यात निर्यात केली जाते. दिवसेंदिवस हळदीचे दर आणि क्षेत्रही वाढत आहे.

राज्यात सर्वाधिक लागवड हिंगोली जिल्ह्यात

हळदीची बाजारपेठ आणि लागवड क्षेत्र या दोन्ही बाबींमध्ये हिंगोली जिल्हा आघाडीवर आहे. येथील बाजारपेठेतून गुजरात, कर्नाटक या ठिकाणी हळदीची निर्यात केली जाते. तर राज्यातील 84 हजार लागवडी क्षेत्रापैकी एकट्या हिंगोली जिल्ह्यात 49 हजार हेक्टरावर हळदीची लागवड केली जात आहे. योग्य व्यवस्थापन येथील शेतजमिन यामुळे उत्पादकताही मोठ्या प्रमाणात आहे. एकंदरीत मराठवाड्यात हळद पिकाचे स्वरुप बदलताना दिसत आहे.

संबंधित बातम्या :

शासनाला जमले नाही ते नाम फाऊंडेशनने करुन दाखवले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना असा ‘हा’ मदतीचा हात

Latur Market : अखेर शेतकऱ्यांनी घेतला निर्णय, दोन दिवसांमध्ये सोयाबीन-कापसामुळे बदलले बाजारपेठेतले चित्र

तुरीच्या उत्पादनात विक्रमी वाढ, जालन्यातील उत्पादकता नागपूरच्या बरोबरीने, कशामुळे झाली ही क्रांती?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.