इंधन दरवाढीची झळ बांधावर, शेतकऱ्यांना फटका, मशागतीचा खर्च वाढला

डिझेलच्या वाढत्या दरामुळे शेती मशागतीच्या खर्चात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. | Petrol and diesel price hike increased the cost of farming

इंधन दरवाढीची झळ बांधावर, शेतकऱ्यांना फटका, मशागतीचा खर्च वाढला
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 11:59 AM

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या (Diesel Rate Hike) दरात सातत्याने वाढ होत आहे. शेतात यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला असून ट्रॅक्टरच्या साहाय्याने अनेक कामे कली जातात. डिझेलच्या वाढत्या दरामुळे मशागतीच्या खर्चात 25 टक्क्यांनी वाढ (increased the cost of farming) झाली आहे. (The impact of petrol and diesel price hike on farmers has increased the cost of farming)

या इंधन दरवाढीचा थेट फटका शेतकऱ्यालाही बसू लागलाय. नांदेड जिल्ह्यात शेतीतील मशागतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. अलीकडच्या काळात अल्पभूधारक शेतकरीही ट्रॅक्टर वापरू लागले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरची संख्या आहे. नांगर करण्यापासून ते पालाकुट्टी आणि विविध पिकात फवारणी करण्यासाठीही भाव वाढले आहेत.

शेतकऱ्यांच्या खिशाला अधिक भार…!

एक पीक काढले की कमी कालावधीत शेतीची मशागत करून, शेतकरी दुसऱ्या पिकाची तयारी सुरू करतो. यासाठी विविध अवजारे व साहित्य साधनाचा वापर होतो. यंत्रामुळे शेतकऱ्याच्या वेळेच्या बचतीसह परिश्रम वाचले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरच्या संख्येत भर पडत आहे . जिल्ह्यात प्रत्येक गावानुसार मशागतीचे दर वेगळे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला अधिक भार पडत आहे.शेतीमाल वाहतूकदेखील खर्चिक….!

इंधनाचे दर गगनाला, भाजीपाल्यांना मात्र कवडीमोल भाव

एकाबाजूला इंधनाचे वाढते दर तर दुसऱ्या बाजूला भाजीपाल्यासह अन्य पिकांना अपेक्षित दर मिळत नाहीये. त्यातच इंधनवाढीमुळे शेतीमाल वाहतूकदेखील खर्चिक झाली आहे . याची सांगड घालणे शेतकऱ्यांना कठीण बनले आहे. गेल्या वर्षी एकरी 7 हजार 500 ते 8 हजार रुपये येणारा खर्च आता 12 हजार ते 13 हजार 500 रुपयांवर गेला आहे. गेल्या महिनाभरापासून डिझेल आणि पेट्रोलच्या दरात दररोज पंचवीस ते तीस पैशांनी वाढ होत आहे. सध्या डिझेलचा प्रति लिटर 90 रुपये पर्यंत आहे. ऑक्टोबर ते मार्च महिन्यापर्यत सातत्याने वाढ झाली आहे.

असे वाढलेत दर…!

मशागत प्रकार       वर्ष     2020     वर्ष       2021 1)नांगरणी                  2000             2500 2)रोटर मारणे             2000             2500 3)खुरटणी                  1000             1500 4)पेरणी                      1300             1500 5)पालकुट्टी                 2000            2500 6)हळद काढणी         1600            2000

(The impact of petrol and diesel price hike on farmers has increased the cost of farming)

हे ही वाचा :

PM Kisan | पीएम किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्ता लवकरच, तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी पाहिली का?

पीएम कुसुम योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा? सौर पंप मिळवण्यासाठी कुठे अर्ज करायचा?

PM Kisan | पीएम किसान सन्मान योजनेसाठी कोण पात्र ठरतं? कुणाला लाभ मिळत नाही?

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.