Cotton Export: कापसाचे दर वाढले पण निर्यात घटली, हे सर्व बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे घडले

बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळेच मराठवाड्यात कापसाचे क्षेत्र हे घटले आहे. खानदेशात केळीच्या बरोबरीने कापसाचे पीक घेतले जाते. एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये तब्बल 5 लाख 50 हजार हेक्टरावर कापसाची लागवड केली जाते. मात्र, त्याच तुलनेत बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकासनही होत आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.

Cotton Export: कापसाचे दर वाढले पण निर्यात घटली, हे सर्व बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे घडले
कापूस पीक
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 11:05 AM

जळगाव : कापूस हे (Kharif Season) खरिपातील हुकमी पीक होते मात्र, बोंडअळीमुळे कापसाच्या क्षेत्रातच नव्हे तर गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. गतवर्षा निसर्गाचा लहरीपणा आणि अंतिम टप्प्यात (Outbreak of bondage) बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात मोठी घट झाली होती. याचाच परिणाम म्हणून  (Cotton Rate) कापसाला विक्रमी दर मिळाला असला तरी जागतिक बाजारपेठेतील निर्यातदारांची पसंती असलेल्या खानदेशातील ‘महाकॉट’ या ब्रॅंण्डला यंदा अमेरिकन बोंडअळीने डंक माराला की काय अशी अवस्था झाली आहे. कापसाचे उत्पादन तर घटलेच पण गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा प्रथमच मराठवाडा आणि विदर्भातील कापसाची निर्यात झाली आहे. खानदेशातील कापूस निर्यातीमध्ये 80 टक्के घट झाली तर आतापर्यंत केवळ 2 लाख गाठींची निर्यात होऊ शकली आहे. त्यामुळे तब्बल 1 हजार कोटी घरात याचा परिणाम होणार आहे.

बोंडअळीच कापसावरील सर्वात मोठे संकट

बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळेच मराठवाड्यात कापसाचे क्षेत्र हे घटले आहे. खानदेशात केळीच्या बरोबरीने कापसाचे पीक घेतले जाते. एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये तब्बल 5 लाख 50 हजार हेक्टरावर कापसाची लागवड केली जाते. मात्र, त्याच तुलनेत बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकासनही होत आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापन करावे म्हणून कापूस लागवडीसाठी 1 जूननंतरची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

स्थानिक बाजारपेठेतही उठाव नाही

निसर्गाचा लहरीपणा आणि प्रमाणापेक्षा अधिकचा पाऊस यामुळे कापसाचे उत्पादन तर घटणारच होते पण अंतिम टप्प्यात पुन्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला होता. अशा प्रतिकूल परस्थितीमुळे उत्पादनात तर घट झालीच पण कापसाचा दर्जाही सुधारला नाही.बोंडअळीमुळे गुणवत्ता खराब झाल्याने निर्यातदारांनी खरेदी केलीच नाही तर स्थानिक बाजारपेठेतही दर्जाहीन कापसाला शेवटपर्यंत मागणीच झाली नाही. त्यामुळे उच्चांकी भाव मिळूनही शेतकऱ्यांना थेट फायदा झालेला नाही.

हे सुद्धा वाचा

लांबलेल्या हंगामाचा परिणाम

अधिकच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी मुख्य पिकांतून तर उत्पादन घेतलेच पण पुन्हा फरदडमधून उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. फरदड उत्पादन म्हणजे कापसाचा कालावधी संपूनही त्याला पाणी देऊन उत्पादन सुरुच ठेवणे. यामुळे थोड्याबहुत प्रमाणात उत्पन्न मिळाले असले तरी याच काळात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो. शिवाय फरदडचे उत्पादन न घेतल्यास बोंडअळीमध्ये खंड पडतो. पण फरदडमुळे हा खंडच पडला नाही. परिणामी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढतच गेल्याने उत्पादनात घट तर झालीच शिवाय कापसाच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.