Summer Season: भर उन्हाळ्यात उद्भवला जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न, येवल्यात टॅंकरवरच भागतेय तहान

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होऊन देखील भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांची चारा आणि पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्फीभवन झाल्याने अनेक जलस्त्रोत हे तळाला गेल्याचे समोर आले आहे. शिवाय दरवर्षी येवला तालुक्यतील ममदापूर परिसरात इतर भागापेक्षा कमी पर्जन्यमान असते.

Summer Season: भर उन्हाळ्यात उद्भवला जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न, येवल्यात टॅंकरवरच भागतेय तहान
भर उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई बरोबर चारा टंचाईही निर्माण झाली आहे.
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 3:28 PM

येवला : गतवर्षी झालेला पाऊस आणि तुडूंब भरलेले जलस्त्रोत यामुळे यंदा पाणी टंचाई निर्माण होईल असे स्वप्नातही वाटत नव्हते. पण (Nashik District) नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात (Water Shortage) पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. (Summer Season) उन्हाळी हंगमात पीक पध्दतीमध्ये दबल करुन उत्पादन वाढीचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात पाणी टंचाईमुळे पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण आता जनावरांना पिण्यासाठी पाणीच नसल्याने भीषण स्थिती निर्माण झाल आहे. येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील ममदापूर परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून जनावरांना चारा मिळणे देखील कठीण झाले आहे. यामुळे जनावरांना शेतातील वाळलेल्या झाडाचा पाला खावा लागत आहे. पाणीटंचाईमुळे पाण्याच्या टँकरची संख्या वाढवून मिळावी अशी मागणी देखील स्थानिक शेतकरी करीत आहे.

पाणी पातळीत घट

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होऊन देखील भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांची चारा आणि पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्फीभवन झाल्याने अनेक जलस्त्रोत हे तळाला गेल्याचे समोर आले आहे. शिवाय दरवर्षी येवला तालुक्यतील ममदापूर परिसरात इतर भागापेक्षा कमी पर्जन्यमान असते. त्याचाच परिणम म्हणून आता ही स्थिती ओढावली आहे. पाणी पातळीत घट झाल्याने हिरवा चारा दुरापस्त झाला आहे. जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पाऊस कितीही झाला तरी वाढते ऊन आणि बाष्पीभवन यावरच पाणीपतळची गणिते ठरत आहेत.

जनावरांसाठी स्वतंत्र उपाययोजना राबवावी

येवला ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून तालुक्यात 22 गाव व 22 वाड्याना 15 टँकरद्वारे पिण्याचा पाणीपुरवठा सुरू आहेत. मात्र जनावरांना पिण्याचे पाणी व चारा कोठून आणावा हा भीषण प्रश्न सध्या ममदापूर परिसराला भेडसावत आहे. त्यामुळे ज्या पध्दतीने नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्याच पध्तीने जनवरांच्या पाण्याची सोय सरकारने करावी अन्यथा पशूधनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. जनावरांची संख्या तर घटू लागली आहेच पण उर्वरीत पिकांचे संकट टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

वाळलेल्या पाल्यावर जनावरांची जोपासणा

पाणीटंचाईमुळे उन्हाळी हंगामातील पिके जोपासणे तारेवरची कसरत झाली आहे.  विहिरींचे पाणी निघत असल्याने योग्य ते नियोजन करुनच पिके जोपासली जात आहेत.  जनावरांना तर झाडांचा वाळलेला पाला दावणीला येऊ लागला आहे. आता एकतर ज्वारीचा कडबा अन्यथा सरकारने चाऱ्याची सोय केली तरच त्याचा आधार मिळणार आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.