Sugarcane Sludge : ऊस फडातच, गाळप बंद, सांगलीत साखर आयुक्तांच्या आदेशालाही केराची टोपली
यंदा ऊस गाळप हंगाम लांबलेला आहे. वाढत्या क्षेत्रामुळे ही अवस्था झाली आहे. आतापर्यंत मराठवाड्यातीलच अतिरिक्त उसाचा प्रश्न समोर आला होता. पण पण पश्चिम महाराष्ट्रातमध्ये अजूनही ऊस हा फडातच उभा आहे. अतिरिक्त उसाचे गाळप झाल्याशिवाय उसाचे गाळप हे बंद करु नये असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले होते. शिवाय कारखान्याचे गाळप बंद करण्यापूर्वी साखर आयुक्त कार्यालयाची परवानगी ही बंधनकारक करण्यात आली आहे.
सांगली : यंदा (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगाम लांबलेला आहे. वाढत्या क्षेत्रामुळे ही अवस्था झाली आहे. आतापर्यंत मराठवाड्यातीलच (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न समोर आला होता. पण पण पश्चिम महाराष्ट्रातमध्ये अजूनही ऊस हा फडातच उभा आहे. अतिरिक्त उसाचे गाळप झाल्याशिवाय उसाचे गाळप हे बंद करु नये असे आदेश (Sugarcane Commissioner) साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले होते. शिवाय कारखान्याचे गाळप बंद करण्यापूर्वी साखर आयुक्त कार्यालयाची परवानगी ही बंधनकारक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये अजूनही दीड हजार हेक्टरावरील उसाची तोड बाकी आहे असे असतानाच जिल्ह्यातील 18 पैकी 7 साखर कारखान्यांचे गाळप हे बंद झाले आहे. तर उर्वरित तीन ते चार साखर कारखानेही आवराआवरीच्या तयारीत आहेत. त्यामुळे या अतिरिक्त उसाचे करायचे काय असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.
सांगली जिल्ह्यातील अतिरिक्त उसाची अवस्था काय?
सांगली जिल्ह्यात आजअखेर उपलब्ध उसापैकी 95 हजार हेक्टरमधील उसाचे गाळप झाले आहे. असे असतानाही अजून किमान 1600 ते 1700 हेक्टरमधील ऊस तोडीच्या प्रतीक्षेत उभा आहे. गेल्या चार हंगामात प्रथमच जिल्ह्यात साखरेच्या उत्पादनाने एक कोटी क्विंटलचा टप्पा पार केला आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय कारखाने बंद करु नयेत असे आदेश आहेत. जिल्ह्यात आता फक्त हुतात्मा, सोनहिरा, उदगिरी आणि निनाई दालमिया हे कारखाने सुरू आहेत. जिल्ह्यात अठरांपैकी सात कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे.
साखर उत्पादनात वाढ
यंदाच्या हंगामात सांगली जिल्ह्यात 14 साखर कारखाने हो सुरु होते. या माध्यमातून 11 एप्रिलपर्यंत 90 लाख 12 हजार 476 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. साखरेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. आजअखेर 1 कोटी 2 लाख 57 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपात दत्त शुगर इंडिया सांगली कारखान्याने उच्चांकी नोंद केली आहे. चालू गळित हंगाम साखर कारखाने, ऊसउत्पादक शेतकरी आणि तोडणी मजूर या सर्वच घटकांसाठी विलक्षण कसोटी पाहणारा ठरत आहे. गेल्या अनेक वर्षात प्रथमच ऊसउत्पादकाला तोडीसाठी कमालीची धावपळ करावी लागली.
निसर्गाच्या लहरीपणाचाही तोडीवर परिणाम
जिल्ह्यात उसाचे क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा 22 हजार 340 हेक्टरावर उसाची लागण करण्यात आली होती. यातील एक लाख 20 हजारहून अधिक हेक्टरमधील उसाचे गाळप झाले आहे.अद्यापही किमान 1600 हेक्टरमधील उसाचे गाळप बाकी आहे.मात्र वाढू लागलेला उन्हाचा तडाखा, कारखान्यांची अपुरी यंत्रणा आणि आता रोज सायंकाळी होणारा वादळी पावसाचा तडाका यामुळे ऊस तोडीची गती कमालीची मंदावली आहे. अनेक ठिकाणी तोडणी मजूर परत गेले आहे. यंत्रणा उभारणीसाठी कारखाना प्रशासनाची आणि तोडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे.
संबंधित बातम्या :
Photo Gallery : अवकाळीने द्राक्ष उत्पादनात घट, वादळी वाऱ्याने तर फळबागाच हिरावल्या
Nanded : पीक विम्याचा प्रश्न चिघळला, कृषिमंत्र्यांचे भाकीत अखेर खरे ठरले, नांदेडमध्ये असे काय घडले?