PM Kisan Samman Nidhi | शेतकऱ्यांच्या खात्यात कधीही येऊ शकतात पीएम किसान सन्मान निधीचे पैसे
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. (The money of PM Kisan Sanman Fund can come in the account of the farmers at any time)
नवी दिल्ली : निवडणूक आचारसंहिता संपली आहे. आता पुढील एक आठवड्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे (पीएम किसान) पैसे येणे अपेक्षित आहे. शुक्रवारी पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनांच्या संदर्भात सल्लागार समितीची बैठक झाली. यात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्यमंत्री कैलास चौधरी आणि व्हर्चुअल माध्यमातून सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. परंतु, अद्याप कोणत्या तारखेला आठव्या हप्त्याचे पैसे हस्तांतरीत करायचे याचा निर्णय झालेला नाही. (The money of PM Kisan Sanman Fund can come in the account of the farmers at any time)
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. जे दर चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. यावेळी 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांचा हप्ता थकीत आहे. कारण आधी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आठवा हफ्ता लांबणीवर पडला होता आणि आता कोविड -19 मुळे सरकार त्यांच्या नियंत्रणामध्ये व्यस्त आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पेमेंट केले जाते. दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत 10.82 कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सुमारे 1,16,292.9 कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले आहेत.
एआयएफ म्हणजे काय?
बैठकीत कृषिमंत्री तोमर म्हणाले की, कृषी पायाभूत सुविधा निधीचे उद्दीष्ट हंगामानंतरची पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेती मालमत्ता तयार करणे आहे, जे त्यांच्या उत्पादनांना शेतकऱ्यांना अधिक चांगले मूल्य प्रदान करेल. त्यांचे उत्पन्न वाढेल. या योजनेंतर्गत प्राथमिक कृषी पत संस्था (पीएसीएस), विपणन सहकारी समित्या, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), बचत-गट (एसएचजी), शेतकरी, संयुक्त दायित्व गट (जेएलजी), बहुउद्देशीय सहकारी समित्या, कृषि-उद्योजक, स्टार्टअप्स आणि 1 लाख केंद्र / राज्य संस्था किंवा स्थानिक संस्था पुरस्कृत असलेल्या सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पांना कर्जाच्या स्वरूपात बँक आणि वित्तीय संस्थांकडून 1 कोटी रुपये प्रदान केले जाणार आहेत.
प्रथमच 3 कोटीहून अधिक शेतकर्यांना मिळाली होती ही रक्कम
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लोकसभा निवडणुका 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. तथापि, 1 डिसेंबर 2018 पासून प्रभावी मानले गेले. पहिल्यांदा 3 कोटी 16 लाख 05 हजार 539 शेतकर्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला होता. या योजने अंतर्गत आतापर्यंत 10 कोटीहून अधिक शेतकर्यांची नोंदणी झाली आहे. डिसेंबरमध्ये जाहीर केलेला हप्ता 10 कोटी 70 हजार 978 शेतकऱ्यांना देण्यात आला. आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जुलैच्या हप्त्यात जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. यावेळी केंद्र सरकारने 10 कोटी 48 लाख 95 हजार 545 शेतकर्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले होते. (The money of PM Kisan Sanman Fund can come in the account of the farmers at any time)
शिल्पा शेट्टीच्या घरात कोरोनाचा विस्फोट, चिमुकल्या समिशासह संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण#ShilpaShetty | #Corona | #bollywood https://t.co/8bwAprHnHd
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2021
इतर बातम्या