ही आहे जगातील सर्वात तिखट लाल मिरची, ७ हजार रुपये किलो आहे भाव

नागालँडच्या पहाडी भागात या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. भूत जोलोकिया तिखटपणासाठी जगात ओळखली जाते.

ही आहे जगातील सर्वात तिखट लाल मिरची, ७ हजार रुपये किलो आहे भाव
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 5:19 PM

नवी दिल्ली : महागाईने हाहाकार माजला आहे. दूध, हदी, गव्हू, तांदळाचा पिठ, डाळीसह इतर खाद्य पदार्थ महाग होत आहेत. सामान्य जनतेला मसाल्याच्या किमती भाव खाऊन जात आहेत. गेल्या काही महिन्यात मसाले दुप्पट किमतीत वाढलेत. जीरा १२०० वरून १४०० रुपये किलो झाला. अशाप्रकारे लाल मिरची जास्त महाग झाली आहे. लाल मिरची ४०० रुपये किलो झाली आहे. गेल्या वर्षी लाल मिरचीची किंमत १०० रुपये किलो होती. आता आम्ही तुम्हाला अशा लाल मिरचीबद्दल सांगत आहोत जी जगात सर्वात तिखट आहे. या तिखट मिरचीचे भावही खूप आहेत.

ही आहे जगातील सर्वात तिखट मिरची

भूत जोलोकिया ही जगातील सर्वात तिखट मिरची आहे. एकदा खाल्ल्यास कानातून गरम वाफ निघते. या मिरचीची किंमत सात हजार रुपये किलो आहे. विशेष म्हणजे भूत जोलोकिया या मिरचीचे उत्पादन फक्त भारतात होते. नागालँडच्या पहाडी भागात या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. भूत जोलोकिया तिखटपणासाठी जगात ओळखली जाते. याचं नावही गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं आहे.

मिरचीची लांबी तीन सेंटीमीटर असते. लाल मिरचीची ही प्रजाती आहे. कमी वेळात ही मिरची तयार होते. ९० दिवसांत ही मिरची तयार होते. भूत जोलोकियाच्या रोपापासून लाल मिरची तोडू शकता. सामान्य मिरचीच्या तुलनेत लांबी कमी असते. या मिरचीची लांबी तीन सेंटीमीटरपर्यंत असते. चौडाई १ ते १.२ सेंटीमीटर असते.

तिखटपणा १० हजार एसएचयू सापडला

भूत जोलोकियापासून पेपर स्प्रे तयार केला जातो. हा पेपर स्प्रे महिला आपल्या सुरक्षेसाठी वापरतात. धोका असल्यास महिला पेपर स्प्रे वापरतात. यामुळे गळा आणि डोळ्यांत जळण होते. नागालँडमध्ये शेतकरी या मिरचीची लागवड करतात. घरी कुंडीतही ही मिरची लावता येते. घोस्ट चिली किंवा नागा झोलकिया किंवा घोस्ट पेपर म्हणूनही ओळखले जाते.

एक किलो भूत जोलोकियाची किंमत किती

२००८ मध्ये भूत जोलोकियाला जीआय टॅगने मानांकित केले. २०२१ मध्ये जोलोकिया मिरची भारतातून लंडनला निर्यात केली गेली. इतर मिरचीच्या तुलनेत ही मिरची महाग विकते. ऑनलाईन अॅमेझॉन शॉपिंगवर १०० ग्राम भूत जोलिकिया मिरचीची किंमत ६९८ रुपये आहे. याचा अर्थ एक किलो भूत जोलिकिया मिरचीची किंमत ६ हजार ९८० रुपये आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.