शिवगामी तांदूळ, कटप्पा तांदूळ, बाहुबलीतील व्यक्तिरेखांची बियाण्यांना नावं, खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी
बाजारात आलेल्या धानाच्या बियाणांपैकी बाहुबली, कटप्पा, शिवगामीने जिल्ह्यातील शेतकरी आकर्षित होत आहेत. (New varieties of paddy will be available at Bhandara agriculture center)
भंडारा : बाहुबली, कटप्पा आणि शिवगामीदेवी भंडाऱ्यात दाखल झालं आहे. कृषी केंद्रात मिळणार नवीन बाहुबली, कटप्पा आणि शिवगामीदेवी नावाचे धानाचे वाण करणार आहे. त्यामुळे भंडारा जिल्हावासीय बाहुबली, कटप्पा आणि शिवगामीदेवी तांदूळ खाणार आहे. मात्र बियाणाचे भाव वाढले आहेत. (The new varieties of paddy will be available at Bhandara agriculture center)
बाहुबली, कटप्पा आणि शिवगामीदेवी भंडाऱ्याच्या बाजारात दाखल झाले. दक्षिण भारतातील ही सुप्रसिद्ध बाहुबली, कटप्पा आणि शिवगामीदेवी भंडारा जिल्ह्यात काय करतात? पण या खऱ्या अभिनेत्यांची नावे नसून भंडारा जिल्ह्यात दाखल झालेल्या नवीन धानाच्या वाणाची नावे आहेत.
बी-बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी
भंडारा जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाची चाहूल लागताच जिल्हाभरातील शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. बी-बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी करीत आहे. यावर्षी मात्र बाजारातील धानाच्या बियाणांची अफलातून आणि विचित्र नावे शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. बाजारात आलेल्या धानाच्या बियाणांपैकी बाहुबली, कटप्पा, शिवगामीने जिल्ह्यातील शेतकरी आकर्षित होत आहेत.
आता जिल्ह्यात या धानाच्या वाण (बियाणे) स्टॉक ही सांपला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी या अफलातून नावाच्या वाण पिकांच्या धानाची लागवड करत आहे. भंडारा जिल्ह्यावासीय बाहुबली, कटप्पा व शिवगामीदेवी नावाचा तांदूळ भविष्यात खाणार आहे.
बियाणांच्या दरात किंचित वाढ
धान्याची नावे जरी आकर्षक असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाणांचा किमतींमध्ये 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर काही वानांमध्ये ही वाढ जास्तही झालेली आहे. तसेच इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. यामुळे बियाणांच्या दरात किंचित वाढ झाली आहे. तरी बियाणांची अशी प्रसिद्ध आणि अफलातून नावे शेतकऱ्यांना असल्याने आकर्षित होत आहे. (The new varieties of paddy will be available at Bhandara agriculture center)
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांना मालामाल बनवेल ‘ही’ औषधी वनस्पती, एका एकरात 4 लाख रुपयांपर्यंत कमाईची संधी
गाव आणि शहरातील जमीन विक्रीवर कर द्यावा लागतो? जाणून घ्या काय असतात नियम?