Monsoon : मान्सूनची सुरवात निराशाजनक, जुलैमध्येही केवळ चिंतेचे ढग? खरीप तरणार का?
यंदा कधी नव्हे ते देशात मान्सूनचे आगमन हे तीन दिवस आगोदर झाले होते. त्यामुळे सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा होती. मात्र, कोकणातून राज्यात पाऊस सक्रीयच झाला नाही. असे असले तरी जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत देशात 94 ते 106 टक्के पाऊस होईल असा अंदाज आहे.
मुंबई : देशात (Monsoon) मान्सून दाखल होऊन महिना उलटला आहे. महिनाभराच्या कालावधीत मान्सून सबंध देशात सक्रीय झाला असे नाही. मान्सूनने आपला लहरीपणा कायम ठेवला असल्याने याचा सर्वाधिक परिणाम हा (Kharif Season) खरीप हंगामातील पेरण्यावर झाला आहे. याबाबत (Agricultural Department) केंद्रिय कृषी विभागाने देखील चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात सरासरीच्या केवळ 35 टक्के खरिपातील पेरण्या झाल्या आहेत. शिवाय अनेक भागात अजून पेरणीयोग्यही पाऊस झालेला नाही. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये आता जुलैमध्ये काय होणार असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. जुलैमध्ये देखील पाऊस हा सामान्यच राहणार असल्याचे संकेत आहे. काही भागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाज आहे पण याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जून तर असातसाच गेला असून जुलैमध्ये काय होणार याची धास्ती कायम आहे. मात्र, खरिपातील पिकांकरिता हा पाऊस पोषक राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जुलै महिन्यात सरासरी एवढाच पाऊस
यंदा कधी नव्हे ते देशात मान्सूनचे आगमन हे तीन दिवस आगोदर झाले होते. त्यामुळे सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा होती. मात्र, कोकणातून राज्यात पाऊस सक्रीयच झाला नाही. असे असले तरी जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत देशात 94 ते 106 टक्के पाऊस होईल असा अंदाज आहे. उत्तर भारतातील काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या भागात सर्वसाधारण किंवा त्यापेक्षा कमी पाऊस होणार आहे. उर्वरित भागात सामान्य पर्जन्यमान राहणार असल्याचा अंदाज आहे.
Southwest Monsoon Rainfall Forecast for the Month of July, 2022 (English): Kindly find the detailed Press Release in the following link:https://t.co/5sFepwFMLk pic.twitter.com/fmSXtrybLr
— India Meteorological Department (@Indiametdept) July 1, 2022
पावसाळ्यातही तापमान कायम राहणार
यंदा पावसाबाबत जे अंदाज वर्तवले ते तंतोतंत खरे ठरले असे नाही. जून महिन्यात पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी राहिले शिवाय तापमानही कायम राहिले. तीच अवस्था जुलैमध्ये देखील राहणार आहे. तापमान काही बदल झाला नाही तर किमान पाऊस तरी पडावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पॅसिफिक आणि हिंदी महासागरांवरील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमानाचा परिणाम मान्सूनवर होतो. येथील परस्थितीनुसार अंदाज वर्तवला जात आहे.
खरिपाच्या पेऱ्यात घट, जुलैमध्ये भवितव्य
राज्यात आतापर्यंत केवळ 20 लाख हेक्टरावर खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात झालेल्या पावसाच्या जोरावर पेरणीचा टक्का वाढला आहे. आता कडधान्य नाहीतर सोयाबीन आणि कापसावरच शेतकऱ्यांचा भर राहणार आहे. जुलै महिन्यात सरासरी एवढा पाऊस राहणार असला तरी त्याचा फायदा पिकांना होणार आहे. शिवाय खरिपाचा पेरा हा 15 जुलैपर्यंत केला जातो. त्यामुळे जून महिन्यात झालेला पेरा आणि जुलैमध्ये काय चित्र राहणार यावरच खरिपाचे भवितव्य अवलंबून आहे.