Chickpea Crop : हरभऱ्याला हमीभावाचा ‘आधार’, उत्पादन वाढूनही दर नियंत्रणात, भविष्यात काय होणार बदल?
रब्बी हंगामात हरभऱ्याचे वाढलेले क्षेत्र आणि पोषक वातावरण यामुळे यंदा उत्पादन वाढणार हे निश्चित होते. केंद्र सरकारने तर यंदा देशात 131 लाख टन उत्पादन होईल असा अंदाजच वर्तवला होता. पण प्रत्यक्षात आता हरभरा काढणी अंतिम टप्प्यात असून 80 ते 90 लाख टनाचे उत्पादन झाले आहे. मध्यंतरी कोरोना काळात नाफेडच्या माध्यमातून हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. त्यामुळे राज्यभर नाफेडने हमीभाव केंद्र उभारली आहेत. केंद्रावरील दर आणि बाजारपेठेतील दर यामध्ये 400 रुपयांचा फरक राहिलेला आहे.
लातूर : (Rabi Season) रब्बी हंगामात हरभऱ्याचे वाढलेले क्षेत्र आणि पोषक वातावरण यामुळे यंदा उत्पादन वाढणार हे निश्चित होते. केंद्र सरकारने तर यंदा देशात 131 लाख टन उत्पादन होईल असा अंदाजच वर्तवला होता. पण प्रत्यक्षात आता (Chickpea Crop) हरभरा काढणी अंतिम टप्प्यात असून 80 ते 90 लाख टनाचे उत्पादन झाले आहे. मध्यंतरी कोरोना काळात नाफेडच्या माध्यमातून हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. त्यामुळे राज्यभर (NAFED) नाफेडने हमीभाव केंद्र उभारली आहेत. केंद्रावरील दर आणि बाजारपेठेतील दर यामध्ये 400 रुपयांचा फरक राहिलेला आहे. हमीभाव केंद्रावर 400 रुपये अधिकचे मिळत आहेत. असे असले तरी हमीभाव केंद्रामुळेच बाजारपेठेत हे दर टिकून आहेत. शिवाय केंद्राने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे उत्पादन झाले नसून भविष्यात मागणी वाढल्यास हरभऱ्याच्या दरातही वाढ होणार आहे.
नाफेडच्या माध्यमातून 3 लाख 71 हजार टन हरभऱ्याची खरेदी
राज्यात 1 फेब्रुवारीपासून हरभरा हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत. हंगामाच्या सुरवातीला केंद्रावरील नोंदणी, विक्रीसाठी होणारा विलंब यामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. पण आता शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. गेल्या दोन महिन्यात नाफेडकडे तब्बल 3 लाख 71 हजार टन हरभऱ्याची खरेदी झाली आहे. सध्या हे प्रमाण कमी आहे. मात्र, बाजारपेठेतील अवस्था पाहता शेतकरी आता खरेदी केंद्राचा आधार घेऊ लागले आहेत. शिवाय दरात तफावत असल्याने शेतकरी नोंदणी करुन विक्रीवर भर देत आहे. दरात असाच फरक राहिला तर शेतकरी आपली भूमिका बदलतील असा विश्वास कृषितज्ञांना आहे.
असे असतानाही शेतकऱ्यांचा विक्रीवर भर
यंदाच्या हंगामात उत्पादकता पाहून शेतकऱ्यांनी शेतीमालाची विक्री करायची की नाही याबाबत निर्णय घेतला आहे. सोयाबीन, कापसाचे उत्पादन घटल्यामुळे दर वाढणार हे निश्चित होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ ची भूमिका घेतली. त्यामुळेच हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना चित्र बदलले. पण रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे दरात मोठ्या प्रमाणात बदल होतील असे वातावरण नाही. त्यामुळे शेतकरी हरभरा विक्रीवर भर देत आहे. पण काही दिवस अशी परस्थिती राहणार असून भविष्यात खरेदी केंद्रापेक्षा बाजारपेठेत हरभऱ्याला अधिकचा दर राहिल असा अंदाज आहे.
खरेदी केंद्र आणि बाजारपेठेतील दर
नाफेडच्या माध्यमातून राज्यात हरभरा खरेदी केंद्रन सुरु करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रावर 5 हजार 230 असा दर ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सुरु होताच नोंदणीला सुरवात झाली होती. तर दुसरीकडे बाजारपेठेत हंगामाच्या सुरवातीला 4 हजार 500 असा दर होता. यामध्ये सुधारणा होत गेली असून बाजारपेठेत 4 हजार 700 पर्यंत दर गेले आहेत. 200 रुपयांपेक्षा अधिक तफावत असल्यास शेतकरी खरेदी केंद्राचा आधार घेतात. त्यामुळे भविष्यात बाजारपेठेतीलही दर वाढतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
संबंधित बातम्या :
Onion Market : उन्हाळी कांद्याचे उत्पादनही घटले अन् दरही, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय..!