उलटी गणती सुरु…! आवक घटूनही कांद्याचे दर कोसळलेच

कांदा हे नगदी (onion cash crop ) पीक असून त्याच्या दरात कायम चढ-उतार हा राहिलेला आहे. आठवड्याभरापूर्वीच कांद्याचे दर गगणाला भिडले होते. त्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली होती तर आता कांदा उत्पादकांच्या. एका रात्रीतून कांद्याचे दर (Onion prices fall) कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे

उलटी गणती सुरु...! आवक घटूनही कांद्याचे दर कोसळलेच
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 6:57 PM

नाशिक : कांदा हे नगदी (onion cash crop ) पीक असून त्याच्या दरात कायम चढ-उतार हा राहिलेला आहे. आठवड्याभरापूर्वीच कांद्याचे दर गगणाला भिडले होते. त्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली होती तर आता कांदा उत्पादकांच्या. एका रात्रीतून कांद्याचे दर (Onion prices fall) कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. (Manmad Market Committee ) जिल्ह्यातील मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये क्विंटलमागे तब्बल 800 रुपयांनी दर कमी झाले आहेत. शिवाय कांद्याची आवक कमी असताना ही परस्थिती बाजार समितीमध्ये पाहवयास मिळाली आहे. गेल्या काही दिवासांपासून प्रति क्विेंटलला 3000 चा दर स्थिर होता. त्यामुळे शेतकऱ्यांनाही हा दर माफक होता. मात्र, पुन्हा दरात झपाट्याने घसरण होत आहे.

कांद्याच्या खरेदद-विक्रीत नाशिक जिल्ह्याची बाजारपेठ केवळ राज्यातच नाही तर देशात प्रसिध्द आहे. येथील दरावरच इतर बाजाक समित्यांचे दर हे अवलंबून असतात. सध्या केवळ उन्हाळ कांद्याची आवक सुरु झाली आहे. शेतकऱ्यांनी दर वाढलेत या आशेने साठवणूकीतला कांदा विक्रीसाठी काढला असून दर घसरल्याने निराशा होत आहे. खरीपातील पीकांचे पावसाने नुकसान झालेले आहे. किमान साठवणुकीतल्या कांद्याचा आधार मिळेल अशी आशा असताना कांदा दराची उलटी गणती सुरु झाली आहे.

218 ट्रॅक्टर कांद्याची आवक

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर हे वाढले होते. मात्र, कांद्या व्यापऱ्यांवर कारवाई झाल्यापासून दरात घसरण होत आहे. मात्र, मनमाडच्या बाजार समितीमध्ये चक्क 800 रुपयांची घसरण झाली आहे. तर 218 ट्रॅक्टरची आवक ही झाली होती. 2200 रुपे क्विंटल प्रमाणे सरासरी भाव कांद्याला मिळालेला आहे. मागणीपेक्षा आवक ही कमी असताना हे चित्र निर्माण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे कांदा साठवणूक करुन अधिकचे पैसे मिळतील ही आशा शेतकऱ्यांची फोल ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच उन्हाळी कांद्याचे दर हे 3000 हजारांवर गेले होते.

साठवणूक करुनही नुकसानच

अपेक्षित दर नव्हता म्हणून रब्बी हंगामातील कांद्याची साठवणूक शेतकऱ्यांनी केली होती. तब्बल 6 महिने कांदा चाळीत साठवणूक व योग्य देखभाल करुनही आता 2000 चा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यात वाहतूकीचा खर्च हा वाढलेला आहे. डिझेलचे दर वाढल्याने वाहतूकही वाढली आहे. मात्र, अचानक 800 रुपयांची घसरण झाल्याने मनमाडच्या बाजारात दाखल झालेल्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी कारवाई?

अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे शेतात लागवड केलेल्या कांद्याची रोपे खराब झाली आहेत. बदलत्या हवामानाचा फटका हा चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्यालाही बसल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. यामुळे देशांतर्गत मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्यामुळे देशांतर्गत कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्यात वाढ होत कांद्याचे बाजार भाव लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमध्ये चार हजार रुपयांच्यावर गेले होते. त्यामुळे किरकोळ बाजारात दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावाचा भडका उडाला आणि ऐन सणासुदीच्या काळात भाव वाढली त्यामुळे आयकर विभागातर्फे 13 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामुळे बाजार साध्य नियंत्रणात आली आहे. यामध्ये असे दिसून येत आहे की कांदा व्यपारी कांदा साठवणूक करुन भाव वाढवले जात होते. (The prices fell despite the decline in onion arrivals in the Manmad Market Committee, )

संबंधित बातम्या :

जनावरांचे प्रजनन व्यवस्थापन केल्यास वर्षाला वासरू, काय घ्यावी काळजी पशूप्रजनन शास्त्रज्ञांचा सल्ला

सफरचंदाच्या शेतीला आता केंद्र सरकारचेही प्रोत्साहन, उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत

शेतकऱ्यांची दिवाळी उडदावरच, दर घसरल्याने सोयाबीनच्या साठवणूकीवर भर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.