PM Modi : पंतप्रधान मोदींनी मानले शेतकऱ्यांचे आभारही अन् एका ट्विटने दिले ‘पीएम किसान सन्मान योजने’बद्दल महत्वाचे संकेत
शेतकऱ्यांचे जीवन समृध्द व्हावे आणि त्यांना दुप्पट उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या रब्बी हंगामातील कामांची लगबग सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करुन शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. इतकेच नाही तर शेतकरी समृध्द असेल तरच देश सशक्त बनेल असे म्हणत शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरवही केला आहे. एवढेच नाही तर केंद्र सरकारची महत्वाची असलेली पीएम किसान योजनेची माहितीही त्यांनी या माध्यमातून दिली आहे.
मुंबई : शेतकऱ्यांचे जीवन समृध्द व्हावे आणि त्यांना दुप्पट उत्पन्न मिळावे यासाठी (Central Government) केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या रब्बी हंगामातील कामांची लगबग सुरु असतानाच (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करुन शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. इतकेच नाही तर शेतकरी समृध्द असेल तरच देश सशक्त बनेल असे म्हणत शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरवही केला आहे. एवढेच नाही तर केंद्र सरकारची महत्वाची असलेली (PM Kisan Yojna) पीएम किसान योजनेची माहितीही त्यांनी या माध्यमातून दिली आहे. देशातील किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतो आणि याकिरिता किती खर्चही येतो हे सांगितले आहे. सध्या पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची चर्चा सुरु असतानाच त्यांनी हे केलेले ट्विट 11 वा हप्ता जमा होण्याचे तर संकेत देत नाहीत ना असा सवाल उपस्थित करीत आहे. कारण 10 हप्ता जमा होऊन तीन महिने उलटले आहेत.
काय आहे पंतप्रधानांच्या ट्विटमध्ये?
रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे आभार मानत देशाचा शेतकरी जितका मजबूत असेल तितका नवा भारत समृद्ध होईल.पीएम आणि शेतीशी संबंधित इतर योजना देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना नवऊर्जा देत आहे. देशाचा शेतकरी जेवढा सक्षम असेल तेवढा नवा भारत समृद्ध होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. शेतकऱ्यांना उपयोगी पडतील अशाच योजना केंद्राच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. ह्या योजना शेतकऱ्यांना बळ देत आहेत याचा मला आनंद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
11 व्या हप्त्याबद्दलचे संकेत
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता जमा होऊन तीन महिने उलटले आहेत. 11 व्या हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरु झाली आहे. शिवाय गतवेळच्या हप्त्याप्रमाणे आता उशिर होणार नसल्याचे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. असे असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान योजनेची माहिती देणारे ट्विट केले आहे. त्यामुळे काही दिवसांमध्येच 11 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले तरी आश्चर्य वाटू देऊ नकात.एवढेच नाही तर देशात किती शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत याची आकडेवारीही त्यांनी दिली आहे.
सरकारच्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा
पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत 11 कोटी 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 1.82 लाख कोटी रुपये वर्ग करण्यात येत आहेत. सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे.त्याचबरोबर ई-नाम (नॅशनल अॅग्रिकल्चरल मार्केट) चा संदर्भ देत देशभरातील मंडयांचे डिजिटल एकीकरण केले जात असल्याचे ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. ई-नामवर 1 कोटी 73 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून या माध्यमातून 1.87 लाख कोटी रुपयांचा व्यापार करण्यात आला आहे.
हमारे किसान भाई-बहनों पर देश को गर्व है। ये जितना सशक्त होंगे, नया भारत भी उतना ही समृद्ध होगा। मुझे खुशी है कि पीएम किसान सम्मान निधि और कृषि से जुड़ी अन्य योजनाएं देश के करोड़ों किसानों को नई ताकत दे रही हैं। pic.twitter.com/xMSrBrbLT5
— Narendra Modi (@narendramodi) April 10, 2022
संबंधित बातम्या :
कृषी विभागाचे वरातीमागून घोडे, डाळिंब बागाचे नुकसान अन् हंगाम संपल्यानंतर आता कीड नियंत्रणाचे धडे
Gondia | गोंदियात Cycle Sunday Group ची अनोखी दिलदारी, पक्षांनाही मिळतेय थंडगार पाणी