सागवान शेतीमध्ये मुबलक पैसा, गरज आहे ‘ती’ अभिनव उपक्रमाची

केवळ उत्पादनातील अनिश्चितता आणि हेणारा खर्च यामुळे शेतकरी हा पारंपारिक पीकालाच महत्व देत आहे.(teak farming) सागवानची लागवड हा शेतकऱ्यांकडे उत्तम पर्याय असून या लागवडीचे धाडस तरुण शेतकऱ्यांनी (Farmer) केले तर मुबलक प्रमाणात पैसा कमावता येणार आहे शिवाय सागवन लागवडीने एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे.

सागवान शेतीमध्ये मुबलक पैसा, गरज आहे 'ती' अभिनव उपक्रमाची
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 4:51 PM

मुंबई : आजही भारतामधील ग्रामीण भागात पारंपारिक पध्दतीनेच शेती केली जाते. केवळ उत्पादनातील अनिश्चितता आणि हेणारा खर्च यामुळे शेतकरी हा पारंपारिक पीकालाच महत्व देत आहे.(teak farming) सागवानची लागवड हा शेतकऱ्यांकडे उत्तम पर्याय असून या लागवडीचे धाडस तरुण शेतकऱ्यांनी (Farmer) केले तर मुबलक प्रमाणात पैसा कमावता येणार आहे शिवाय सागवन लागवडीने एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. विविध ठिकाणी सागवाणचा उपयोग केला जात असून याला मोठ्या प्रमाणात मागणीही आहे. त्यामुळे मागणी असलेल्या या उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

सागवानचा उपयोग हा प्लायवूड, जहाज बनवण्यात, रेल्वेचे डबे बनदण्यात शिवाय यापेक्षा अधिक मौल्यवान वस्तू बनवण्यासाठी होत आहे. यापासून बनवलेल्या वस्तू ह्या टिकावू असतात त्यामुळेच अधिकच्या दराने त्याची विक्रीही केली जाते. या वनस्पतींचा उपयोग औषधे बनवण्यासाठीही केला जातो. सागवान लाकडात विविध प्रकारचे विशेष गुणधर्म असतात, म्हणूनच बाजारात त्याला नेहमीच मागणी असते. सागवान लाकडाला वाळवी कधीच दिसत नाही. तर सागवानाचे लाकूड हे तब्बल 200 वर्षे टिकून राहते असे सांगितले जात आहे.

सागवानला योग्य बाजारपेठ

मागणीच्या तुलनेत सागवानचा पुरवठा केवळ 5 टक्के एवढाच आहे. त्यामुळे यातील मार्केट हे पूर्णपणे मोकळे असून याचा लाभ उत्पा्दकांनाच होणार आहे. या पोषक बाजारपेठेमुळे चांगल्या कमाईसाठी मोठी संधी मिळू शकते. अनेक शेतकरी त्याची लागवड करून चांगला नफा कमवत आहेत. शिवाय जोपासना आणि लागवडीमध्ये नुकसान काहीच नसल्याने तरुण शेतकऱ्यांनी याची लागवड करुन उत्पादन घेणे सहज शक्य आहे.

अशा प्रकारे घ्या काळजी

सागवान वनस्पतींना वाढण्यासाठी कोणत्याही विशिष्ट मातीची आवश्यकता नसते तर त्याची झाडे ही सुपिक जमिनीत सहज वाढू शकतात. मात्र, ज्या ठिकाणी पाणी साचून राहिल त्या ठिकाणी या झाडांची लागवड करु नये. अन्यथा याची वाढ खुंटते तर विविध रोगांचाही प्रादुर्भाव होतो. सागवान वनस्पतींच्या चांगल्या वाढीसाठी कोरडे आणि दमट हवामान आवश्यक आहे. सागवान वनस्पती सामान्य तापमान असलेल्या भागात जोमात वाढतात.

हवामानानुसार बदलते वाण

वाढीव उत्पन्न मिळविण्यासाठी वनस्पतींच्या प्रगत जाती निवडणे आवश्यक आहे. याचे उत्पन्न सर्वत्र सरासरी हे सारखेच होते पण वेगवेगळ्या हवामानानुसार याच्या वेगवेगळे वाण आहे त्याचप्रमाणे त्याची लागवड होणे आवश्यक आहे. दक्षिण आणि मध्य अमेरिकेत सागक, पश्चिम आफ्रिकनमध्ये सागवान, आदिलाबाद येथे सागवान, निलंबर (मलबार) सागवान, गोदावरी सागरवान आणि कोन्नी सागवान. या सर्व प्रकारच्या झाडांची लांबी ही वेगळ्या स्वरुपात असते.

सागवान कसे जोपासावे

सागवानची लागवड करण्यापूर्वी शेत हे चांगले नांगरुन घ्यावे लागणार आहे. या शेतातील जुन्या पिकाचे अवशेष खोल नांगरणीने काढून टाकावे लागणार आहे. यानंतर शेतात दोन खड्यामध्ये 8 ते 10 फूट अंतर ठेवून 2 फूट रुंद आणि दीड फूट खोल असे खड्डे घ्यावे लागणार आहेत. या वनस्पातीला अधिक खताची गरज असते. त्यामुळे 500 जीएम एन.पी.के. 15 किलो जुने शेणखत लागवड करण्यापूर्वी एक महिना आगोदर शेतजमिनीवर टाकावे लागणार आहे. रोप लावण्याच्या एक महिना आगोदर खड्डे तयार करावे लागणार आहेत. सागवानच्या बिया आणि रोप अशा दोन्ही प्रकारे लागवड केली जाते. (The production of lakhs of rupees from the cultivation of sagavam, the need for a unique initiative)

संबंधित बातम्या :

गाळप सुरु होण्याच्या तोंडावर थकीत ‘एफआरपी’ रक्कम अदा, साखर आयुक्तालयाचा ‘कडू’ टोला झाला ‘गोड’

रुपडे बदललेला सातबारा थेट शेतकऱ्यांच्या दारी, कसा काढायचा डिजीटल सातबारा ?

शेतकरीही वर्तवणार आता पावसाचा अंदाज, हवामान तज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.