स्ट्रॉबेरीचे आता उत्तर भारतामध्येच नव्हे.. योग्य नियोजन केले तर तुम्हीही घेऊ शकता उत्पादन, वाचा सविस्तर

भारतामध्ये स्ट्रॉबेरीची शेती ही उत्तर भारतामध्येच अधिकच्या क्षेत्रावर केली जाते. मात्र, काळाच्या ओघामध्ये आता उत्तर भारतामधील राज्यांव्यतिरीक्त महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह इतर अनेक राज्यांतील शेतकरी आता स्ट्रॉबेरीची लागवड करीत आहेत. स्ट्रॉबेरीची लागवड ही सर्वसाधारणपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये स्ट्रॉबेरीची केली जाते.

स्ट्रॉबेरीचे आता उत्तर भारतामध्येच नव्हे.. योग्य नियोजन केले तर तुम्हीही घेऊ शकता उत्पादन, वाचा सविस्तर
Strawberry
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 12:28 PM

मुंबई : स्ट्रॉबेरी हे थंड हवामानात घेतले जाणारे फळपिक असले तरी काळाच्या ओघात आवश्यक ते बदल करुन इतर भागातही (Nutritious Environment) पोषक वातावरण तयार करुन उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे पीक पध्दतीमध्ये तर बदल घडत आहेच पण उत्पादनात वाढ होण्याच्या अनुशंगानेही शेतकरी प्रयत्न करीत आहेत. भारतामध्ये (Strawberries) स्ट्रॉबेरीची शेती ही उत्तर भारतामध्येच अधिकच्या क्षेत्रावर केली जाते. मात्र, काळाच्या ओघामध्ये आता (North India) उत्तर भारतामधील राज्यांव्यतिरीक्त महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह इतर अनेक राज्यांतील शेतकरी आता स्ट्रॉबेरीची लागवड करीत आहेत. स्ट्रॉबेरीची लागवड ही सर्वसाधारणपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये स्ट्रॉबेरीची केली जाते. परंतु थंड ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्चमध्येही लागवड करता येते. काळाच्या ओघात सोई-सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पॉली हाऊसमध्ये संरक्षित पद्धतीने इतर महिन्यातही लागवड करता येते. मात्र, लागवडीपूर्वीची मशागत ही महत्वाची बाब आहे. उभी आणि आडवी पाळी घालून शेतजमिन ही भुशभूशीत करावी लागते. लागवड करण्यात येणाऱ्या एका बेडची रुंदी दीड मीटरच्या आसपास ठेवली जाते आणि लांबी सुमारे 3 मीटर ठेवली जाते.

अशी आहे लागवड पध्दत..

लागवडीसाठी बेडची उभारणी करताना हे बेड जमिनीपासून 15 सेंमी ऊंच असणे आवश्यक आहे. दोन्ही बेड आणि दोन्ही रोपांमधील अंतर हे 30 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. त्यानुसार एका ओळीत सुमारे 30 रोपांची लागवड करण्यात येणार येते. फळबाग ही फुलोऱ्यात आल्यानंतर मल्चिंग केलेच पाहिजे. याकरिता 50 मायक्रॉन जाडीचे काळ्या पॉलिथिलीनने मल्चिंगचा वापर करावा. यामुळे तणांचे नियंत्रण होते आणि फळांचे रोगराईपासून संरक्षणही. मल्चिंगमुळेही उत्पादन वाढते आणि जमिनीतील ओलावा थोडा जास्त काळ टिकून राहण्यास मदत मिळते. शेतकऱ्यांचे परिश्रम कमी होऊन उत्पादन वाढ करता येते.

डोंगराळ भागात पाऊस पडल्यावर स्ट्रॉबेरीच्या रोपांना पॉलिथिनने झाकून ठेवण्याचा सल्ला कृषी विभागाच्यादतीने देण्यात आला आहे. यामुळे फळांवर विपरीत परिणाम होणार नाही. स्ट्रॉबेरीची लागवड केली तर ती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

स्ट्रॉबेरीची लागवड करताना काय काळजी घ्यावी लागणार आहे

जगभरात स्ट्रॉबेरीच्या विविध 600 जाती आहेत. मात्र, भारतातील व्यापारी शेतकरी कामरोसा, चँडलर, ओफ्रा, ब्लॅक पिकॉक, स्वीडे चार्ली, एलिस्टा आणि फेअर फॉक्स या जातींचा वापर करतात. भारताच्या हवामानानुसार या जातींची निवड करण्यात आलेली आहे. स्ट्रॉबेरीची लागवड करण्यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी 3 ते 4 वेळा रोटरने नांगरणी करावी. मग शेणखत शेतामध्ये टाकल्याने उत्पादन वाढीसाठी त्याचा फायदा होणार आहे.

हे सर्व केल्यानंतर शेतात बेड तयार करावे लागतात. बेडची रुंदी 1 ते 2 फुटांच्या दरम्यान असून एकमेकांमधील अंतर समान असणे गरजेचे आहे. रोप लागवडीसाठी प्लास्टिक मल्चिंग केले जाते व त्यात ठराविक अंतरावर छिद्रे पाडली जातात. रोप लागवड केल्यानंतर ठिबक किंवा स्प्रिंकलरने पाणी दिल्यास त्याचा अधिकचा फायदा होतो. यानंतर आर्द्रतेचे भान ठेवून वेळोवेळी सिंचन करणे आवश्यक असते.

स्ट्रॉबेरीपासून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी कंपोस्ट खूप महत्वाचे आहे. स्ट्रॉबेरीच्या माती आणि विविधतेनुसार कंपोस्टचा वापर केल्यास अधिकचा फायदा होणार आहे. त्यासाठी कृषी शास्त्रज्ञाकडून सलाल घ्यावा. लागवडीनंतर दीड महिन्यानंतर स्ट्रॉबेरीला फळ येऊ लागते आणि ही प्रक्रिया चार महिने चालते. फळाचा रंग अर्ध्यापेक्षा जास्त लाल झाला तरच तोडणीला सुरवात करावी लागणार आहे. चार महिने लागवडीपासून तोडणीपर्यंतचे योग्य नियोजन केले तर शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

Import of Pulses: कडधान्य उत्पादकांच्या वाटेला निराशाच, केंद्र सरकारच्या निर्णय शेतकऱ्यांच्या हीताचा की नुकसानीचा?

Department of Agriculture : रब्बीत निसर्गाचा लहरीपणा, खरिपात भासणार खताचा तुटवडा, सांगा शेती करायची कशी?

थकबाकी शेतकऱ्यांकडे नव्हे महावितरणकडेच, आंदोलनानंतरची बैठकही निष्फळ, आता तोडगा काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.