Sugarcane : अतिरिक्त ऊस फडातच त्यात वाढत्या ऊन्हाचा परिणाम, कृषी आयुक्तांच्या आश्वासनानंतरही समस्या कायमच..!
कधी नव्हे ते मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र आणि उत्पादन दोन्हीही वाढले आहे. ऊस म्हणलं की पश्चिम महाराष्ट्र ही परंपरा यावेळी मोडीत काढण्यात आली आहे. यंदा मराठवाड्यात आतापर्यंत 2 कोटी टन ऊसाचे गाळप झाले आहे. असे असले तरी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. मार्च महिना अंतिम टप्प्यात असतानाही मराठवाड्यातील 20 टक्के ऊस हा फडातच आहे. यासंदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आश्वासन दिले असले तरी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच आहेतच.
उस्मानाबाद : कधी नव्हे ते (Marathwada) मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र आणि उत्पादन दोन्हीही वाढले आहे. ऊस म्हणलं की पश्चिम महाराष्ट्र ही परंपरा यावेळी मोडीत काढण्यात आली आहे. यंदा मराठवाड्यात आतापर्यंत 2 कोटी टन (Sugarcane Sludge) ऊसाचे गाळप झाले आहे. असे असले तरी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. मार्च महिना अंतिम टप्प्यात असतानाही मराठवाड्यातील 20 टक्के ऊस हा फडातच आहे. यासंदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आश्वासन दिले असले तरी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच आहेतच. कारण गेल्या काही दिवसांपासून (Temperature Increase) ऊन्हाच्या झळा वाढत आहेत. यामुळे ऊस फडातच वाळत आहे तर वजनातही घटही होत आहे. शिवाय गेल्या चार महिन्यापासून शेतकऱ्यांनी ऊसाचे पाणीही बंद केले आहे. त्यामुळे आता ऊसतोड झाली तरी होणारे नुकसान हे टळणार नाही. राज्यात सर्वाधिक अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मराठवाड्यात निर्माण झाला आहे.
मे पर्यत सुरु राहणार गाळप हंगाम
ऑक्टोंबर महिन्यात सुरु झालेला गाळप हंगाम अद्यापही सुरु आहे. ऊसाचे क्षेत्र वाढल्यामुळे यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. काही काऱखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करुनही ही समस्या कायम राहिलेली आहे. त्यामुळे साखर आयुक्तांची परवानगी असल्याशिवाय गाळप हे बंद करता येणार नाहीत असे पत्र सर्वच साखर कारखान्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा पावसाळा सुरु होईपर्यंत साखर कारखाने हे सुरु राहणार असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात केवळ क्षेत्रच वाढले नाही तर उत्पादनातही वाढ झालेली आहे.
नेमके शेतकऱ्यांचे नुकसान काय ?
ऊस लागवड झाल्यापासून 12 महिन्यांमध्ये त्याची वाढ पूर्ण होते. त्यामुळे 12 किंवा 13 व्या महिन्यात त्याची तोड होणे गरजेचे असते. अन्यथा वजनात तर घट होतेच पण उत्पादनही घटते. सध्या लागवड करुन 16 महिने झालेला ऊस शेतामध्ये ऊभा आहे. त्याला तुरे लागले असून ऊस वाळलेला आहे. हे कमी म्हणून की काय गेल्या आठ दिवसांपासून ऊनाचा कडाका वाढला आहे. शिवाय गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांनी ऊसाचे पाणीही बंद केले आहे. सर्वकाही नुकसानीचे होत असून आता शेतकरी ऊसाची लागवड करणार का नाही अशी अवस्था झाली आहे.
तरीही गाळपाबाबत शंकाच
शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप पूर्ण झाल्याशिवाय साखर कारखाने हे बंद करणार नसल्याची भूमिका सरकार आणि प्रशासनाने घेतली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अधिवेशनात याचा उल्लेखही केला मात्र, प्रत्यक्षात अतिरिक्त ऊसाचे क्षेत्र अधिकचे आहे. त्यामुळे जून पर्यंतही याचे गाळप होणार की नाही प्रश्न आहे. जूनमध्ये तर पावसाला सुरवात होते. त्यानंतर ऊसाची वाहतूक शक्य नसल्याने यंदा गाळप होते की ऊस फडातच राहतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
Guarantee Price Centre : बाजार समित्या बंद, शेतकऱ्यांना आधार खरेदी केंद्राचा, जनजागृतीनंतर आवक वाढली
Summer Soybean : शेतकऱ्यांची मोहीम फत्ते, लेट पण थेट सोयाबीनचा विक्रमी पेरा, बियाणाचा प्रश्न मार्गी