अवकाळीची अवकृपा : अहवाल मागवला पण पंचनाम्यांशिवाय भरपाई मिळणार तरी कशी? शेतकरी चिंताग्रस्त

मध्यंतरीच्या अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीची तीव्रता लक्षात घेता कृषि मंत्री दादा भुसे यांनी केवळ कागदावर नुकसानीची आकडेवारी देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते तर आठ दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण होतील असेही सांगितले होते. पण आता अवकाळी पावसाने उघडीप देऊन 15 दिवसांचा कालावधी लोटलेला आहे.

अवकाळीची अवकृपा : अहवाल मागवला पण पंचनाम्यांशिवाय भरपाई मिळणार तरी कशी? शेतकरी चिंताग्रस्त
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 1:10 PM

सोलापूर : मध्यंतरीच्या (Untimely rains) अवकाळी पावसामुळे (crop damage) फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीची तीव्रता लक्षात घेता कृषि मंत्री दादा भुसे यांनी केवळ कागदावर नुकसानीची आकडेवारी देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते तर आठ दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण होतील असेही सांगितले होते. पण आता अवकाळी पावसाने उघडीप देऊन 15 दिवसांचा कालावधी लोटलेला आहे. मात्र, अद्यापही (Solapur)  सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामेच करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भरपाई मिळणार तरी कशी असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत. जिल्ह्यात 40 हजार हेक्टरावरील पिकांना अवकाळीचा फटका बसलेला आहे तर 21 हजार 356 हजार हेक्टरावरील फळबागा ह्या उध्वस्त झाल्या आहेत.

1 लाख 36 हजार हेक्टरावरील पिकांना अवकाळीचा तडाका

नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील तब्बल 1 लाख 36 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर वगळता सर्वच जिल्ह्यातील नुकसनीचे पंचनामे करुन अहवाल प्रशासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातीलच हा अहवाल पंचनाम्यांशिवायच पाठविण्यात आल्याने नेमकी नुकसानभरपाई दिली तरी कशी जाणार हा सवाल आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा द्राक्ष बागांना बसलेला आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा येथील बागांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करुन मदतीची मागणी शेतकरी करीत आहेत.

पालकमंत्र्याकडेही पाठपुरावा

सोलापूर जिल्ह्यात हजारो एकर द्राक्ष, डाळिंब बागांसह कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे. कृषीमंत्र्यांच्या आदेशानंतर का होईना पंचनामे करणे अपेक्षित होते. मात्र, महसूल आणि कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. इतर जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन अहवाल सादर करण्यात आला आहे तर सोलापूर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामेच झालेले नाहीत. त्यामुळे तातडीने पंचनामे पूर्ण करुन प्रशासनाकडे पुन्हा अहवाल सादर करण्याची मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.

शासन दरबारी मदतीची मागणी

अवकाळीचा फटका सर्वच पिकांना बसलेला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे ते द्राक्ष आणि आंबा पिकाचे. द्राक्ष तोडणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती. याच दरम्यान, सबंध राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे घडकुज झाली आहे. त्यामुळे बागायत शेतकऱ्यांना येणारा खर्च व त्या तुलनेत न मिळणाऱ्या उत्पादनाची सांगड घालून शासनाकडे मदतीची मागणी केली जाणार असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Marathwada : पैसेवारीचे महत्व काय असते ? शेतकऱ्यांचा फायदा अन् तोटा वाचा सविस्तर

Rabi Season | शेतकऱ्यांनो स्पर्धेत भाग घ्या अन् हजारोंची बक्षीसे मिळवा, जाणून घ्या सर्वकाही

Positve News | रब्बीवरील संकटाची मालिका संपुष्टात, थंडीच्या कडाक्यात बहरतोय हरभरा

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.