फळगतीचा धोका ; फळबागांची अशी घ्या काळजी, सोशल मिडीयातील मॅसेज हे फसवे
एकीकडे शेतकरी नैसर्गिक समस्यांना सामोरे जात असताना आता सोशल मिडीयावरील संदेशही शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. फळगळतीबाबत (orchard) चुकीचे मॅसेज दिले जात असल्याने संत्रा बागायतदरांची (orange garden) फसवणुक होऊ शकते त्यामुळे अशा व्हायरल मॅसेजकडे दुर्लक्ष करण्याचे अवाहन हे लिंबूवर्गीय संस्थेने केले आहे.
लातुर : सध्याचे वातावरण आणि फळांची अवस्था पाहता फळगळतीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशीच काहीशी अवस्था फळ बागायत शेतकऱ्यांची झाली आहे. एकीकडे शेतकरी नैसर्गिक समस्यांना सामोरे जात असताना आता सोशल मिडीयावरील संदेशही शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. फळगळतीबाबत (orchard) चुकीचे मॅसेज दिले जात असल्याने संत्रा बागायतदरांची (orange garden) फसवणुक होऊ शकते त्यामुळे अशा व्हायरल मॅसेजकडे दुर्लक्ष करण्याचे अवाहन हे लिंबूवर्गीय संस्थेने केले आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना केवळ खरिपातील पिकांनाच नाही तर फळबागायत शेतकऱ्यांना देखाल करावा लागला आहे. विदर्भात संत्र्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाचे प्रमाण हे वाढत आहे. त्यामुळे फळगळतीचा धोका हा वाढत आहे. त्यामुळे बागायतदार वर्ग हा चिंतेत असतानाच फळगळतीच्या उपाययोजनेबाबत सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चुकीचे मॅसेज हे व्हायरल होत आहेत.
या मॅसेजचा आणि केंद्रीय संशोधन संस्थेचा कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून फळगळती टाळायची कशी याबद्दल मार्गदर्शन सुरु करण्यात आले आहे. फळगळतीबाबत तांत्रिक माहिती ही शेतकऱ्यांना दिली जात आहे. संत्रा बरोबरच इतर फळ बांगासाठीही या संस्थेचे मार्गदर्शन उपयोगी ठरत आहे. मात्र, सोशल मिडीयावरील चुकीच्या मॅसेजकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करणे आवश्यक आहे.
अशी होते फळगळती
कळ्यांचे फळात रुपांतर होताना झालेला पाऊस, वारा यामुळे फळगळतीचा धोका निर्माण होतो. शिवाय बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढले की फळगतीला सुरवात होते. गेल्या काही दिवसांपासून विदर्भासह मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कळ्या किंवा फळ हे मध्यम अवस्थेत असतानाच गळून पडत आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने फळ बागायतदार हे चिंतेत आहेत.
योग्य खबरदारी घेणे गरजेचे
फळबागांची लागवड करताना मातीपरीक्षण, पाणी परीक्षण करणे आवश्यक आहे. मात्र शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. फळ हे प्राथमिक अवस्थेत असतानाच अधिक प्रमाणात गळती होते. फळबाग लागवडीपुर्वी जमिनीचा कस तपासणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात फळबाग तर बहरेल पण फळगळतीचा धोका कायम राहणार आहे.
मातीत आहे तेच फळपिकाच्या जातीत येणार
फळगळतीला ब्रेक द्यायचा असेल तर फळाची लागण होण्यापुर्वीच उपाय होणे गरजेचे आहे. सेंद्रीय शेतीचा, गांडूळ खताचा वापर करून जमिनीचा गर्क वाढविणे हे महत्वाचे राहणार आहे. सेंद्रीय कर्भ हा केवळ एक टक्याच्या आतमध्ये आहे. त्यामुळे खताचा वापर केला तरी त्याचा उपयोग हा थेट पिकाला न होता जमिनीलाच होत आहे. त्यामुळे मातीत जे आहे फळाच्या जातीत उतरते त्यामुळे योग्य काळजी घेण्याचे अवाहन कृषी अधिकारी संतोष घसिंग यांनी केले आहे.
संबंधित बातम्या :
फळ बागायतदारांना दिलासा : 72 तासानंतरही तक्रार केल्यावर शेतकऱ्यांना मिळाली मदत, लातुरातील प्रकार
सणासुदीच्या काळात मोहरी तेलाचे भाव वाढले, कंपन्या विक्रमी दराने करताहेत खरेदी
होय..! लातुरच्या डोंगराळ भागात काजूची बाग, अर्ध्या एकरात लाखोंचे उत्पन्न