अतिरिक्त ऊसावर रामबाण उपाय, ऊसतोड कामगारांचा सत्कार अन् वाजत-गाजत स्वागत, नेमका प्रकार काय?

सध्या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सबंध राज्यात गाजत आहे. गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही ऊस अजून फडातच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून साखर कारखाना प्रशासन आणि ऊसतोड कामगारांवर रोष व्यक्त करीत आहेत. असे असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील नायगाव येथे मात्र, ऊसतोड कामगार दाखल होताच त्यांचे वाजत-गाजत स्वागत अन् सत्कार करण्यात आला. एकीकडे सध्याचे वास्तव आणि दुसरीकडे नेमका हा प्रकार हे जरी अवास्तव वाटत असले तरी खरे आहे.

अतिरिक्त ऊसावर रामबाण उपाय, ऊसतोड कामगारांचा सत्कार अन् वाजत-गाजत स्वागत, नेमका प्रकार काय?
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 9:37 AM

उस्मानाबाद : सध्या अतिरिक्त (Sugarcane) ऊसाचा प्रश्न सबंध राज्यात गाजत आहे. (Sludge Season) गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही ऊस अजून फडातच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून साखर कारखाना प्रशासन आणि ऊसतोड कामगारांवर रोष व्यक्त करीत आहेत. असे असताना (Osmanabad) उस्मानाबाद जिल्ह्यातील नायगाव येथे मात्र, ऊसतोड कामगार दाखल होताच त्यांचे वाजत-गाजत स्वागत अन् सत्कार करण्यात आला. एकीकडे सध्याचे वास्तव आणि दुसरीकडे नेमका हा प्रकार हे जरी अवास्तव वाटत असले तरी खरे आहे. कारण याच ऊसतोड कामगारांमुळे तब्बल 20 ट्रक ऊसाचे गाळप शक्य झाले आहे. शिवाय कारखाना क्षेत्र नसतानाही सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ शुगर्सने उस्मानाबाद जिल्ह्यातील नायगावच्या शेतकऱ्यांचे गऱ्हाणे ऐकूण ऊसतोडीचा निर्णय घेतला. कारखान्याने घेतलेली दखल आणि ऊस कामगारांचे परिश्रम यामुळे शेतकऱ्यांनी वाहनचालक, ऊसतोड कामगारांचे वाजत-गाजत स्वागत तर केलेच पण तोडणीसाठी त्यांना मदतही केली. असेच उपाय काढले तर ऊस गाळप लवकर होणार आहे.

गेटकेनच्या ऊसाची तोडणी कशी झाली शक्य

नायगाव हे कळंब तालुक्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील गाव आहे. मात्र, परिसरातील कारखान्याकडून ऊसतोडणीकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे ऊसाला तुरे येऊन उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला होता. शेतकऱ्यांच्या समस्यांच्या पाढा शेतकरी बालाजी शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांच्याजवळ वाचला. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन दत्ता शिंदे यांनी एकाच वेळी 20 ट्रक आणि ऊसतोड कामगार पाठवून अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये येथील शिवारातील ऊसतोडणीचा प्रश्न मिटणार आहे.

शेतकऱ्यांचा आनंद गगणात मावेना

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या एकच प्रश्न आहे तो म्हणजे ऊसतोड. कालावधी पूर्ण होऊनही ऊसाची तोड होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे गेटकेनचा ऊस असतानाही गोकुळ साखर कारखान्याने तत्परता दाखवून शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढला आहे. गाव शिवारात तब्बल 20 ट्रक आणि ऊसतोड कामगार येताच शेतकऱ्यांचा आनंद गगणात मावेना असेच चित्र झाले होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी ऊसतोड कामगारांचे हलगी वाजत आणि गुलालाची उधळण करीत स्वागत केले. एवढेच नाही वाहनचालक, कामगार यांना हार, तुरे, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.

ऊस कारखान्याकडे रवाना

सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ शुगर्सने ऊसतोडणीसाठी 20 ट्रक पाठवल्या होत्या. दरम्यान, ऊसतोड कामगारांनी 10 ट्रक ऊसाची तोडणी करुन गाळपासाठी साखर कारखान्याकडे पाठविला आहे. शिवाय उर्वरीत ऊसही लागलीच तोडला जाणार असल्याचे कामगारांनी सांगितले आहे. कळंब तालुक्यात 30 हजार एकरावर ऊसाची लागवड केली होती. ऊसाचे क्षेत्र वाढल्याने तोडणीची समस्या निर्माण झाली आहे. पण ऊसतोडणीचा बाऊ करणाऱ्यांसाठी यावर कसा तोडगा काढला जाऊ शकतो याचे चांगले उदाहरण सर्वांसमोर ठेवलेले आहे.

संबंधित बातम्या :

Red Cabbage: भारतामध्ये लाल कोबीची वाढती मागणी, जाणून घ्या लागवड पध्दती अन् फायदे

Onion : कांदा दराचा लहरीपणा, एका रात्रीतून असे काय दर घसरले की, व्यापारीही चक्रावले

पश्चिम विदर्भात यंदाही पाणी टंचाईची शक्यता, धरणात उरलंय फक्त एवढंच पाणी…

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.