Kharif Season : नांदेडच्या शेतकऱ्यांचे ‘टायमिंग’ हुकले, पावसाची उघडीप तरीही चाढ्यावर मूठ, कोणता संभाव्य धोका?

आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात केवळ 6.38 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी तो पेरणी योग्य पाऊस नाही. मात्र, खरिपातील सोयाबीन, तूर आणि मूग हे कमी पाण्यावरही तरली जाणारी पिके आहेत. त्यामुळे देगलूर भागातील शेतकऱ्यांनी कोणताही विचार न करता सोयाबीन, तूर आणि मुगाची पेरणी केली आहे.

Kharif Season : नांदेडच्या शेतकऱ्यांचे 'टायमिंग' हुकले, पावसाची उघडीप तरीही चाढ्यावर मूठ, कोणता संभाव्य धोका?
नांदेड जिल्ह्यातील देगलूर भागात अपेक्षित पाऊस नसतानाही पेरणीला सुरवात झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 10:43 AM

नांदेड : कृषी विभागासह राज्याच्या कृषी मंत्र्यांनी वेळोवेळी आवाहन केले आहे की, (Kharif Sowing) पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय बियाणे जमिनीत गाढू नका म्हणून असे असताना (Nanded Farmer) नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पेरण्या झाल्या आहेत. खरिपाची पेरणी करावी धावून अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. पण त्यासाठी पुरेशा प्रमाणात पाऊस होणही गरजेचे आहे. जिल्ह्यातील देगलूर भागात थोड्याबहुत प्रमाणात झालेल्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मुगाचा पेरा केला आहे. पणा (Rain) पावसाची अशीच उघडीप राहिली तर या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते शिवाय केलेला खर्च वाया जाण्याची भीती आता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. देगलूरसह इतर भागातही शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवण्याचे धाडस केले आहे.

अत्यल्प पावसावर तीन पिकांचा पेरा

आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात केवळ 6.38 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी तो पेरणी योग्य पाऊस नाही. मात्र, खरिपातील सोयाबीन, तूर आणि मूग हे कमी पाण्यावरही तरली जाणारी पिके आहेत. त्यामुळे देगलूर भागातील शेतकऱ्यांनी कोणताही विचार न करता सोयाबीन, तूर आणि मुगाची पेरणी केली आहे. आता पुरेशा प्रमाणात जमिनीत ओल असेल पिकांची उगवण होईल पण त्यानंतरच्या वाढीसाठी पावसाचीच आवश्यकता असते.

कृषी विभागाचे काय आहे आवाहन?

यंदा पावसाने उशीर केला असला तरी पेरण्या लांबणीवर पडल्या तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नाही. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. असे असले तरी 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करणे हे धोक्याचे आहे. यामुळे पीक जोमात वाढत तर नाहीच पण उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो. आता पिकांची उगवण झाली आणि वाढच झाली नाहीतर पुन्हा दुबार पेरणी ही ठरलेलीच आहे. त्यामुळे अधिकचा खर्च आणि अधिकचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेट अॅण्ड वॉच ची भूमिका घेणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

पेरणीमुळे नेमके नुकसान काय ?

खरीप हंगामातील पिके ही पावसावरच अवलंबून असतात. त्यामुळे पुरेशी ओल नसतानाही पेरणीचे धाडस केले तर पिकांची वाढ खुंटणार आहे. शिवाय ही पिके अल्पावधीची असतात. त्यामुळे प्रत्येक घटकाचा त्याच्यावर परिणाम हा होतोच. पावसाने अजून ओढ दिली तर एकरी 4 ते 5 हजाराचा खर्च करुन दुबार पेरणी करावीच लागणार आहे. त्यामुळे नांदेडच्या शेतकऱ्यांनी केलेली चूक इतरांनी करु नये एवढेच.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.