Watermelon: शेतकऱ्यांना बाजारपेठेचे गणित कळलं अन् बाजारभावाचं सूतही जुळलं, ठोक विक्रीपेक्षा किरकोळ विक्रीवर भर
बुलडाणा : लागवडीपासून तीन महिने मेहनत, योग्य ती निघराणी करुन पुन्हा कवडीमोल दरात कलिंगडची विक्री यामुळे फायदा उत्पादकांना की व्यापाऱ्यांना याचा विचार आता (Farmer) शेतकरी करु लागले आहेत. व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दरात (Watermelon) कलिंगडची खरेदी केली जाते आणि हेच कलिंगड बाजारपेठेत अधिकच्या दराने विकले जात आहे. त्यामुळे अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण स्वत:च्या शेतीमालावर (Traders) शेतकऱ्यांचाच […]
बुलडाणा : लागवडीपासून तीन महिने मेहनत, योग्य ती निघराणी करुन पुन्हा कवडीमोल दरात कलिंगडची विक्री यामुळे फायदा उत्पादकांना की व्यापाऱ्यांना याचा विचार आता (Farmer) शेतकरी करु लागले आहेत. व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दरात (Watermelon) कलिंगडची खरेदी केली जाते आणि हेच कलिंगड बाजारपेठेत अधिकच्या दराने विकले जात आहे. त्यामुळे अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण स्वत:च्या शेतीमालावर (Traders) शेतकऱ्यांचाच काही हक्क राहत नाही. बाजारपेठेतले सूत्र आता शेतकऱ्यांच्या लक्षात येत असल्याने ग्राहक ते शेतकरी यांच्यामधला दुवा असणारा व्यापारी बाजूला सारुन स्वत:च कलिंगडची विक्रीवर करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे अधिकचे चार पैसे तर पदरी पडतच आहे पण ग्राहकांचेही समाधान होत आहे. गेल्या दोन वर्षापासून झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदा लढवलेली शक्कल वाखण्याजोगी आहे.
दोन वर्षात केवळ नुकसानच
गेली दोन वर्ष कोरोनामुळे बंद असलेल्या बाजारपेठांचा परिणाम कलिंगड विक्रीवर झालेला होता. या दरम्यानच्या कालावधीत मार्केट तर बंद होतेच पण शेतकऱ्यांना थेट गल्ली-बोळात जाऊनही विक्रीला बंदी होता. उत्पादन वाढूनही काही उपयोग झाला नव्हता. अखेर शेतकऱ्यांनी कलिंगड ही सार्वजनिक कार्यक्रमात मोफत दिली. यंदा मात्र, परस्थिती बदलली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्याची संधी मिळाली असून शेतकरी आता थेट ग्राहकांनाच विक्री करीत असल्याचे चित्र आहे.दरवर्षी फळ उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील माल हा व्यापाऱ्यांना विकत असतो, मात्र यावर्षी शेतकरी स्वतः बाजारात जाऊन आपल्या फळांची चिल्लर विक्री करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांकडून कवडीमोल अन् ग्राहकांना अधिकचा दर
उन्हाळा सुरु होताच कलिंगड, खरबूजच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कलिंगड खरेदी करीत आहेत. मात्र प्रति किलो केवळ 6 ते 7 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात तर बाजार व्यापाऱ्यांकडून हेच कलिंगड 15 ते 20 रुपये किलोने विकले जात आहे. प्रति कोलोमागे 10 ते 12 रुपयांचे नुकसान होत असल्याने आता शेतकरीच व्यापाऱ्यांची भूमिका निभावत आहे. शहराक जागोजागी स्टॉल लावून योग्य त्या दरात कलिंगडची विक्री केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली शिवाय ग्राहकांनाही योग्य दरात कलिंगड मिळत आहे.
शेतकऱ्यांनीच थाटले स्टॉल
कलिंगड विक्रीसाठी व्यापाऱ्यांची जागा ही शेतकऱ्यांनीच घेतली आहे. बाजारपेठेतले सूत्र शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शहरासह ग्रामीण भागात कलिंगड विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामुळे तीन महिने केलेली मेहनत आणि आता मिळत असलेला मोबदला यामुळे शेतकरीही समाधानी आहे. गेल्या दोन वर्षात झालेले नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.
संबंधित बातम्या :
SINDHUDURG मध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पीकं जमीनदोस्त