Rice : बासमतीच मुंबईकरांच्या पसंतीला, पैशांची कुठे चिंता कुणाला?
रोजच्या जेवणात भात हा अनिवार्य आहेच पण त्यापेक्षा कोणत्या प्रकारचा तांदूळ यावरच अधिकचा वेळ आणि पैसाही खर्ची होतो. मात्र, जीभेची हौस पुरवण्यासाठी कुठे पैशाचा विचार करता असेच काहीसे म्हणत मुंबईकर हे वाढत्या दराची तमा न बाळगता बासमतीलाच अधिकची पसंती देत आहेत. परराज्यातून आवक होत असलेला 100 रुपये किलोचा बासमती आता घरोघरी दिसत आहे.
मुंबई : रोजच्या जेवणात भात हा अनिवार्य आहेच पण त्यापेक्षा कोणत्या प्रकारचा तांदूळ यावरच अधिकचा वेळ आणि पैसाही खर्ची होतो. मात्र, जीभेची हौस पुरवण्यासाठी कुठे पैशाचा विचार करता असेच काहीसे म्हणत (Mumbai) मुंबईकर हे वाढत्या दराची तमा न बाळगता (Basmati rice) बासमती तांदळालाच अधिकची पसंती देत आहेत. (Import) परराज्यातून आवक होत असलेला 100 रुपये किलोचा बासमती आता घरोघरी दिसत आहे. यापूर्वी जिल्ह्यात जो तांदूळ पिकला जातो त्यालाच अधिकचे महत्व दिले जात होते. पण काळाच्या ओघात मिळतो त्याला नाही तर आवडी-निवडीनुसारच तांदूळ निवडला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुंबई लगतच्या जिल्ह्यात पिकत असलेला आंबेमहोर आता हद्दपार होत असून त्याची जागा परराज्यातील बासमती तांदळाने घेतलेली आहे.
काय आहेत बासमती तांदळाची वैशिष्ट्ये?
बासमंती तांदूळ हा सुगंधी, मोठा आकार, चवीला रुचकर आहे. शिवाय इतर तांदळापेक्षा शिजण्यासाठी याला वेळ खूप कमी लागतो. इतर तांदळाच्या तुलनेत याची किंमत अधिक असली तरी वाढत्या दराची तमा न करता ग्राहक हे बासमती तांदळाचीच खरेदी करीत आहेत. केवळ चवीसाठीच नाहीतर फिटनेस जपणारे नागरिकही बासमतीचीच निवड करीत आहेत. ब्राऊन राईस, ब्लॅक राईसला अधिकची मागणी असल्याचे ‘लोकमत’ वृत्तातून समोर आले आहे.
रेशनचा तांदूळ आता मर्यादीतच
यापूर्वी रेशनचा तांदूळ हा घरोघरी भात बनवण्यासाठी वापरला जात होता. पण आता हा तांदूळ आता खिचडी, पापड तसेच तांदळाच्या भाकरी बनवण्यापूरताच मर्यादित राहिलेला आहे. यापासून पुलाव, बिर्याणी यासारखे पदार्थ आता क्वचितच केले जात आहेत. 100 रुपये किलो असणारा बासमतीच तांदूळ मुंबईकरांच्या पसंतीमध्ये उतरत आहे.
या दोन राज्यातून देशभर बासमतीची निर्यात
बासमती तांदूळाचे उत्पादन हे पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या दोन राज्यांमधूनच देशभरात सर्वत्र निर्यात केली जाते. मात्र, येथे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने वेगवेगळे ब्रॅंड निर्माण होत आहेत. बाजारपेठेत कितीही ब्रॅंड आले तरी नागरिकांची पसंती ही बासमती तांदळालाच आहे. वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी या तांदळाचा सर्वाधिक उपयोग केला जात आहे.