निवड झाली आता अंमलबजावणी करा अन् योजनेचा लाभ घ्या, पशूसंवर्धन विभागाचे काय आहे आवाहन?

पशूसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या योजनांचा आता प्रत्यक्षात लाभ घेण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी 4 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान गाई-म्हशी वाटप योजनेसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. याची पहिली स्टेप पार पडली असून या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची निवडही करण्यात आलेली आहे.

निवड झाली आता अंमलबजावणी करा अन् योजनेचा लाभ घ्या, पशूसंवर्धन विभागाचे काय आहे आवाहन?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 2:38 PM

परभणी : शेती या मुख्य व्यवसायाला पशूपालनाची जोड दिली जात आहे. (Farmer) शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी याकरिता वेगवेगळ्या योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून रबवल्या जात आहेत. त्यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जोडव्यवसयातून शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक वाढत आहे. त्याच अनुशंगाने (Animal Husbandry Department) पशूसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या (Benefits of scheme) योजनांचा आता प्रत्यक्षात लाभ घेण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी 4 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान गाई-म्हशी वाटप योजनेसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. याची पहिली स्टेप पार पडली असून या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची निवडही करण्यात आलेली आहे. या निवड झालेल्या लाभार्थ्यांना आता आवश्यक ती कागदपत्रे संबंधित विभागाकडे जमा करणे आवश्यक आहे. शिवाय प्रतिक्षेत असणाऱ्यांनीही ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ.पी.पी. नेमाडे यांनी केले आहे.

ही आहे अधिकृत वेबसाईट

https//ah.mahabms.com या पशूसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईट ओपन केल्यास योजनेची माहिती आणि लाभर्थ्याने भरावयाची माहिती ही समोर असणार आहे. विचारण्यात आलेली माहिती भरल्यानंतर त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून हा अर्ज पशूसंवर्धन विभागाकडे द्यावा लागणार आहे.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

लाभर्थ्यास स्वताचा फोटो, आधारकार्ड, रेशन कार्ड नंबर, सातबारा, 8 अ, अपत्य दाखला, अनुसूचित जाती जमाती जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, रहिवाशी प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाण पत्र, बँक खाते पासबुक सत्यप्रत, रेशनकार्ड याशिवाय शैक्षणिक कागदपत्रेही अदा करावी लागणार आहेत.

याचा मिळणार लाभ

पशूसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनांअतर्गत शेतकऱ्यांना दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढीचे गट वाटप करणे, कुक्कुटपालनासाठी शेड उभारणीस अर्थसहाय्य करणे याकरिता निवड झालेल्या शेतकऱ्यांना ही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.

संबंधित बातम्या :

Hailstorm : आता एवढंच बाकी होतं, ढगाळ वातावरणाने पिकांचे अन् गारपिटीने भाजीपाल्याचे नुकसान

Grape Rate: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महिन्याभरापूर्वीच झाला होता द्राक्ष बागायत संघाचा निर्णय

farmer loan : शेतकऱ्यांना कर्ज प्राप्तीचा मार्ग अधिक सुखकर, नाबार्डचा मोठा निर्णय

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.