Solapur : खरीपात युरियाची टंचाई, कृषी विभागाचा पर्याय पडणार का शेतकऱ्यांच्या पचणी?
युरिया आणि नॅनो युरिया मध्ये नेमका फरक काय आहे याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत. मात्र, हीच गोष्ट कृषी विभागाकडून पटवून दिली जात आहे.केवळ उत्पादनासाठी नाही तर खर्चाच्या अनुशंगानेही हा युरिया चांगला ठरणार आहे. याचा कमी आकार आणि मोठी क्षमता असा हा नॅनो युरिया आहे.
करमाळा : शितलकुमार मोटे : (Kharif Season) हंगामाच्या सुरवातीपासूनच (urea) युरियाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मागणीच्या तुलनेत होणारा पुरवठा आणि कच्च्या मालाचे वाढते दर यामुळे ऐन हंगाम बहरात येताच युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. (Crop Increase) पीक वाढीसाठी युरिया महत्वाचा मानला जातो. पेरणी दरम्यान आणि पेरणीनंतरही पीक वाढीसाठी युरियाचा वापर केला जातो. यंदा कृषी विभागाकडून मात्र, नॅनो युरियाचा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे. नॅनो युरियाचा प्रभावही इतर युरियाप्रमाणेच आहे.मात्र, शेतकरी याला स्वीकारतात का नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. युरिया आणि नॅनो युरिया यामध्ये नेमका फरक काय आहे हे देखील शेतकऱ्यांना पटवून सांगितले जात आहे.
नॅनो युरिया म्हणजे काय?
युरिया आणि नॅनो युरिया मध्ये नेमका फरक काय आहे याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत. मात्र, हीच गोष्ट कृषी विभागाकडून पटवून दिली जात आहे.केवळ उत्पादनासाठी नाही तर खर्चाच्या अनुशंगानेही हा युरिया चांगला ठरणार आहे. याचा कमी आकार आणि मोठी क्षमता असा हा नॅनो युरिया आहे. या युरिया रोपांच्या पोषणासाठी प्रभावी आणि परिणामकारक राहणार आहे. यामुळे उत्पादनात तर वाढ होईलच पण पोषण तत्वांच्या गुणवत्तेमध्येही वाढ होणार आहे. शिवाय खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना याची माहिती व्हावी या दृष्टीने जनजागृती केली जात आहे.
पेरणीच्या दरम्यान युरियाची टंचाई
खरीप हंगामात युरियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो. शिवाय युरियाशिवाय पिकांची वाढ होणार नाही अशी शेतकऱ्यांची धारणा असते. त्याअनुशंगाने आता खरिपाच्या पेरण्या चालू असतानाच करमाळा तालुक्यात युरिया हा उपलब्ध होत नाही. त्यामुळे पेरण्या रखडत आहेत. आता पेरणीसाठी पोषक वातावरण असताना देखील केवळ युरियामुळे पेरण्या लांबणीवर न टाकता शेतकऱ्यांनी इतर पर्यायाचा अवलंब करणे महत्वाचे असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
योग्य वापरच महत्वाचा अन्यथा नुकसान
उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने युरियाचा वापर ठिक आहे. पण शेतकरी हे सरासरीपेक्षा अधिकचा वापर करीत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट तर होईलच पण शेत जमिनीचा दर्जाही यामुळे ढासळतो. असे असतानाही शेतकरी हे युरियाचा वापर करीत आहेत. याबाबत अनेकवेळा जनजागृती करुन देखील शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. खरीप हंगामात युरियाचा वापर वाढत असला तरी शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचा पर्यायी मार्ग अवलंबणे गरजेचे असल्याचे तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी सांगितले आहे.