Nagpur : पावसाची रिमझिम अन् शेतकऱ्यांचा उत्साह, खरिपातील कापूस, सोयाबीन ओक्केच..!

यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यानुसार मान्सून दाखल झालाही मात्र राज्यात सक्रीय होण्यासाठी महिन्याचा कालावधी लोटला गेला. विदर्भात जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत 30 टक्के पाऊस कमी झाला होता. त्यामुळे यंदा खरिपाचे काय होणार याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये होते. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी धूळपेरणीचा आधार घेतला होता.

Nagpur : पावसाची रिमझिम अन् शेतकऱ्यांचा उत्साह, खरिपातील कापूस, सोयाबीन ओक्केच..!
खरीप हंगामातील पिके बहरात आहेत. त्यामुळे विदर्भात कापूस मशागतीची कामे सुरु आहेत.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 9:31 AM

नागपूर : आठ दिवसाच्या (Rain) पावसाने खरिपातील चित्रच बदलून टाकले आहे. जिथे पेरण्या होतील की नाही अशी स्थिती झाली होती त्या भागात सरासरीपेक्षा अधिकचा पेरा तर झालाच आहे पण (A nurturing environment) पोषक वातावरणामुळे (Kharif Season) खरिपातील पिके बहरत आहेत. विदर्भात हवामान विभागाचा अंदाज अखेर खरा ठरला आहे. जुलै महिना उजाडताच सुरु झालेला पाऊस आजही कायम आहे. त्यामुळे पिकांची मशागत आणि रखडलेल्या पेरण्या अशी दोन्ही कामात बळीराजा व्यस्त आहे. गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाल्याने त्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे तर सध्याच्या पोषक वातावरणामुळे उत्पादनात भर पडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या पावसाचा फायदा खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर आणि धानपिकाला होत आहे. त्यामुळे यंदा खरिपाच्या बाबतीत सर्वकाही उशीराने घडले असले तरी सध्या शेत शिवरात ओक्केच..असे चित्र आहे.

पोषक वातावरण अन् शेतकऱ्यांचा उत्साह

खरीप हंगामासाठी सध्या पोषक वातावरण झाले आहे. जून महिन्यात पेरणी झालेल्या क्षेत्रात आता मशागतीची कामे सुरु आहेत. तर पावसाअभावी रखडलेल्या पेरणी कामांना आता गती येत आहे. पेरणीचा कालावधी निघून जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली. पावसाच्या भरवश्यावर बियाणे जमिनीत गाढली. त्याचा फायदा देखील आता होत आहे. पहिल्या पेऱ्यातील सोयाबीन आणि कापसाच्या मशागतीची कामे ही भर पावसात केली जात आहेत. पावसाने सर्व चित्र बदलून गेल्याने शेतकऱ्यांमध्येही कमालीचा उत्साह आहे. संपूर्ण विदर्भात पावसाने हजेरी लावली असून त्यामध्ये सातत्य राहिल असा अंदाज हवामान विभागाच्यावकीने वर्तवण्यात आला आहे.

जून महिन्यात निराशा, जुलैची दणक्यात सुरवात

यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यानुसार मान्सून दाखल झालाही मात्र राज्यात सक्रीय होण्यासाठी महिन्याचा कालावधी लोटला गेला. विदर्भात जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत 30 टक्के पाऊस कमी झाला होता. त्यामुळे यंदा खरिपाचे काय होणार याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये होते. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी धूळपेरणीचा आधार घेतला होता. मात्र, जुलै महिन्यात चित्र बदलले आहे. ऐन गरजेच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने रखडलेल्या पेरण्या तर मार्गी लागल्या आहेतच पण पेरणी झालेल्या क्षेत्रावर मशागतीची कामे सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

खरिपातील या पिकांना होणार अधिकचा फायदा

विदर्भात कापूस हे प्रमुख पीक असले तरी यंदा सोयाबीनचाही पेरा वाढला आहे. गतवर्षी कापसाला 12 हजार रुपये क्विंटल असा विक्रमी दर मिळाला होता. दराचा परिणाम यंदाच्या क्षेत्रावर होणारच होता. त्यानुसार कापसाचे क्षेत्र वाढले आहे. पावसाने मध्यंतरी दडी मारल्याने शेतकऱ्यांनी उडीद, मुगाकडे दुर्लक्ष केले असले तरी कापसू, सोयाबीन, तूर आणि धान पिकांच्या पेरण्या आता अंतिम टप्प्यात आहे. पावसामुळे या पिकांची वाढ जोमात होणार आहे. शेतकऱ्यांनी मशागतीवर लक्ष केद्रित करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...