Onion Rate | कांद्याच्या दराचा लहरीपणा, आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत काय आहे चित्र?
कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले काय अन् घटले काय? पण दराचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. कारण कांद्याचे दर एका रात्रीतून कमी-जास्त होऊ शकतात हे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नविन नाही. पण गेल्या आठ दिवसांपासून आशिया खंडातील सर्वात मोठी असेलेल्या लासलगाव बाजारपेठेत दरात अशी काय घसरण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
लासलगाव : (Onion Crop) कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले काय अन् घटले काय? पण दराचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. कारण कांद्याचे दर एका रात्रीतून कमी-जास्त होऊ शकतात हे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नविन नाही. पण गेल्या आठ दिवसांपासून आशिया खंडातील सर्वात मोठी असेलेल्या (Lasalgaon) लासलगाव बाजारपेठेत दरात अशी काय घसरण झाली आहे त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. दरात चढ-उतार हे ठिक आहे. पण तब्ब्ल 900 रुपयांची घसरण. एवढ्या झपाट्याने होणारी घट शेतकरी कशी सहन करणार हा सवाल आहे. लाल कांद्याच्या बाजार भावात प्रति क्विंटल मागे नऊशे रुपयांची मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
उन्हाळी कांदा संपुष्टात तरी दर घसरलेलेच…
अधिकच्या दराच्या अनुशंगाने उन्हाळी कांद्याची शेतकऱ्यांनी साठवणूक केली होती. दरम्यानच्या काळात उन्हाळी कांद्यालाही चांगला दर मिळाला होता. मात्र, दर वाढत असल्याने केंद्र सरकारनेच साठवणूकीतला कांदा बाजारपेठेत दाखल केल्याने उन्हाळी कांद्याचे दर घसरले होते. आता तर उन्हाळी कांदा संपुष्टातच आला आहे. त्यामुळे लाल कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा होती. मात्र, कांद्याला बाजारपेठेत उठावच नसल्याने दरात घसरण झाली आहे. नाशिकसह देशभरातील बाजारपेठेत लाल कांद्याची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.
दरात अणखीन घसरण होणार..
लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. शिवाय आता खरीप हंगामातील कांद्याची काढणी कामे ही सुरु आहेत. अजून या खरीपातील कांद्याची आवक बाजारपेठेत झाली नसताना तब्बल 900 रुपयांची घसरण झालेली आहे. उद्या कांद्याची आवक वाढली तर दर घसरणार हे सांगायला कुण्या भविष्यकाराची गरज नाही. पण अवकाळीमुळे झालेले नुकसान, वातावरणामुळे कांद्याची रोपाची अवस्था पाहता यंदा दर तेजीच राहणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण कांदा आहे कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारच पण आताची वेळ शेतकऱ्यांची आहे.
असे घसरले कांद्याचे दर
लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सकाळच्या सत्रात 1 हजार वाहनातून लाल कांद्याची 18 हजारहुन अधिक क्विंटल आवक झाली होती. त्याला कमाल 2230 रुपये तर किमान 700 रुपये तर सर्वसाधारण 1700 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला आहे. तर गेल्या आठवड्यात लाल कांद्याची दिवसभरात 14 हजार क्विंटल आवक दाखल झाली होती त्याला कमाल 3100 रुपये, किमान 800 रुपये तर सर्वसाधारण 2525 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला होता. मोठ्या प्रमाणाात तफावत झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.