Latur : पाटबंधारे विभागाचा असा ‘हा’ निर्णय, भर उन्हाळ्यातही लातुरातील शेतकरी सुखावला
आतापर्यंत उपलब्ध पाणीसाठ्यावर उन्हाळी हंगामातील पिकांचा सिंचनाचा प्रश्न मिटला होता. पण आता वाढते ऊन आणि त्यामुळे होणारे बाष्पीभवन यामुळे जलस्त्रोतांची पाणीपातळी झपाट्याने खलावत आहे. त्यामुळे पिकांसाठी रेणा प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती. पिकांची अवस्था आणि सध्याची गरज लक्षात घेता पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील घणसरगाव, रेणापूर आणि खरोळा या बॅरेजेसमध्ये प्रकल्पातून पाणी सोडले आहे. त्यामुळे प्रकल्पालगतच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
लातूर : आतापर्यंत उपलब्ध पाणीसाठ्यावर (Summer Crop) उन्हाळी हंगामातील पिकांचा सिंचनाचा प्रश्न मिटला होता. पण आता वाढते ऊन आणि त्यामुळे होणारे बाष्पीभवन यामुळे जलस्त्रोतांची पाणीपातळी झपाट्याने खलावत आहे. त्यामुळे पिकांसाठी (Rena Project) रेणा प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी (Irrigation Department) पाटबंधारे विभागाकडे केली होती. पिकांची अवस्था आणि सध्याची गरज लक्षात घेता पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील घणसरगाव, रेणापूर आणि खरोळा या बॅरेजेसमध्ये प्रकल्पातून पाणी सोडले आहे. त्यामुळे प्रकल्पालगतच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 140 हेक्टरावरील जमिन क्षेत्र हे सिंचनाखाली येणार असल्याने भर उन्हाळ्यात येथील शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे संभाव्य नुकसान तर टळले आहे पण आता उत्पादनात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
140 हेक्टर येणार ओलिताखाली
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मंगळवारी प्रकल्पातील पाणी बॅरेडेसमध्ये सोडण्यात आले आहे. मध्यम प्रकल्पाचे सहा दरवाजे हे 10 सेमीने उचलून नदी पात्रात 48.80 क्युमेक्स 1723 क्युसेसने घनतरगाव, रेणापूर व खरोळा बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या निर्णयामुळे 140 हेक्टरावरील क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लागलीच निर्णय झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
ऐन गरजेच्या वेळी निर्णयाची अंमलबजावणी
प्रकल्पांची उभारणी ही शेतीला पाणी मिळावे या उद्देशानेच झालेली आहे. पण काळाच्या ओघात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष झाल्याने अगोदर पिण्यासाठी आणि नंतर शेतीसाठी असे धोरण ठरवण्यात आले होते. पण गेल्या अनेक वर्षापासून या प्रकल्पांचा उद्देशच साध्य झाला नव्हता. गेल्या तीन वर्षापासून मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी आता शेतीसाठी देण्याचा निर्णय सर्वत्रच होत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. यामुळे उत्पादनातही भर पडेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीला पाटबंधारे विभागाचा प्रतिसाद
गेल्या काही दिवसांपासून उन्हामध्ये वाढ झाली असून जिल्ह्यातील पारा 40 वर पोहचला आहे. त्यामुळे बाष्पीभवन वाढल्याने जलस्त्रोतील पाण्याने तळ गाठला आहे. उन्हाळी पीके अंतिम टप्प्यात असतानाच पाणी टंचाई निर्माण झाली होती. म्हणूनच रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारपासून पाणी सोडण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
अतिरिक्त उसाची माहिती द्या, तरच होणार तोडीचे नियोजन, मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांसाठी विशेष मोहिम..!
Unseasonal Rain : द्राक्ष तोडणीनंतरही अवकाळीची अवकृपा सुरुच, वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट