Washim : निर्णय झाला पण दिलासा नाही, शेती सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यावर टांगती तलवार
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी रब्बी हंगामात याचा फायदा होणार होता. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्प हे तुडुंब भरलेले होते. यामुळे शेती सिंचनासाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पांचा यंदा खऱ्या अर्थाने उद्देश साध्य होणार होता. आणि टंचाई निर्माण झाल्यास पाटबंधारे विभागाने प्रकल्पातील पाणी रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्याचा निर्णयही घेतला.
वाशिम : अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी (Rabi Season) रब्बी हंगामात याचा फायदा होणार होता. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने (Washim) जिल्ह्यातील प्रकल्प हे तुडुंब भरलेले होते. यामुळे (Farming Drip) शेती सिंचनासाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पांचा यंदा खऱ्या अर्थाने उद्देश साध्य होणार होता. आणि टंचाई निर्माण झाल्यास पाटबंधारे विभागाने प्रकल्पातील पाणी रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्याचा निर्णयही घेतला. पण गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. गेल्या महिन्याभरातच जिल्ह्यातील प्रकल्पातील 17 टक्के पाणीसाठा हा घटला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग शेती सिंचनासाठी सोडलेल्या पाण्याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. विभागाच्या या निर्णयावरच रब्बी हंगामातील पिकांचे भविष्य अवलंबून आहे.
प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट
सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच लघु-मध्यम प्रकल्प हे तुडुंब भरले होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्नच मिटला असून शेती सिंचनासाठीही पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, महिन्याभरात वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात झाले आहे तर दुसरीकडे रब्बी हंगामातील पिकेही पाण्याला आली असल्याने मोठ्या प्रमाणात उपसा सुरु आहे. शिवाय एप्रिल महिन्यातही वाढत्या उन्हामुळे पाणीपातळी घटण्याचा धोका कायम आहे. पाटबंधारे विभगाने पिण्यासाठी राखीव पाणी ठेवले असले तरी संभाव्य धोका लक्षात घेता शेती सिंचनासाठी सोडलेल्या पाण्याबाबत काय निर्णय होणार हे महत्वाचे आहे.
शेतीसाठीही पाण्याची आवश्यकता
ज्याप्रमाणे प्रकल्पातील पाणी पातळीत घट झाली आहे त्याचप्रमाणे विहिरी आणि बोअरवेलनेही तळ गाठला आहे. जिल्ह्यातील अधिकतर क्षेत्रावरील पिके ही प्रकल्पातील पाण्यावर अवलंबून आहेत. अशातच रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आहेत. आता जर पाणीपुरवठा कमी झाला तर थेट उत्पादनावरच परिणाम होणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाचा निर्णय महत्वाचा राहणार आहे. अद्यापपर्यंत विभागाने कोणत्या सूचना केलेल्या नाहीत पण घटत्या पाणीपातळीवर निर्णय घेतला जाणार आहे.
वाशिमला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जीची काय आहे स्थिती?
वाशिम शहराला वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणाची पाणी पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. महिनाभरातच 17 टक्के पाणी साठा घटला असून, सध्या केवळ 31.58 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.त्यातच आता एप्रिल महिन्यात उन्हाच्या अधिक तीव्रतेमुळे पाणी पातळी खालावण्याची गती आणखी वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पाणी पातळी कमी होणार असल्याने वाशिमकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याचे संकेत आहेत.
संबंधित बातम्या :
Onion Market : कांदा दराला उतरती कळा, उन्हाळी हंगामात उत्पादन वाढलं पण दरामुळे नाही साधलं
Summer Season : खरिपात पावसाने पिकांचे नुकसान, रब्बी हंगामात वाढत्या उन्हाचा धोका
Success Story : मुख्य पिकांचे उत्पादन घटलं, महिला शेतकऱ्याने हंगामी कलिंगड विक्रमी उत्पन्न मिळवलं!