Washim : निंबी सिंचन प्रकल्पाचं काम मागील 10 वर्षांपासून अर्धवट, 500 एकरहून अधिक शेत जमीन…

आम्ही आमच्या शेत जमिनी या सिंचन प्रकल्पासाठी दिल्यात, ज्यामुळं आमच्या इतर शेतीला पाणी मिळेल. मात्र तसं झालं नाही. अधिकाऱ्यांनी चालढकल केल्यानं...

Washim : निंबी सिंचन प्रकल्पाचं काम मागील 10 वर्षांपासून अर्धवट, 500 एकरहून अधिक शेत जमीन...
Washim farmer nibi irrigationImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 12:02 PM

वाशिमच्या : वाशिमच्या (Washim) मंगरुळपिर (mangarulpir) तालुक्यातील निंबी सिंचन (Nimbi irrigation) प्रकल्प मागील 10 वर्षांपासून लाल फित शाईत अडकल्यानं याचं काम अर्धवट अवस्थेत आहे. यामुळं शेकडो हेक्टर शेतीला पाणी मिळत नाही. अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित राहिल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप असून हा अर्धवट प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी चांगला प्रकल्प व्हावा म्हणून जागा दिली आहे. 2013 मध्ये सिंचन प्रकल्प निर्मितीला सुरुवात झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

वाशिमच्या निंबी परिसरातील 500 एकर हुन अधिक शेतीचं सिंचन होऊन माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघावा यासाठी 2013 मध्ये सिंचन प्रकल्प निर्मितीस सुरुवात झाली. काही दिवस या प्रकल्पाचं काम सुरू झालं, मात्र ते काम बंद पडलं. हे काम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी मृद व जलसंधारण विभागाकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र त्यांच्या मागणीला अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्यानं या प्रकल्पाचं काम रखडलं असल्याची खंत शेतकरी बोलून दाखवत आहेत.

निंबी सिंचन प्रकल्प मागील 10 वर्षांपासून अर्धवट आहे. हा सिंचन प्रकल्प जर वेळेत पूर्ण झाला असता तर आमची 500 एकरहून अधिक शेत जमीन सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना चांगली पिकं घेता आली असती. आम्ही अनेकदा अधिकाऱ्यांकडे मागणी केली. मात्र अद्याप या प्रकल्पाचं काम सुरू झालं नाही जर हे काम लवकर सुरू झालं नाही तर आम्ही शेतकरी तीव्र आंदोलन करणार असल्याचं पवन टोपले, शेतकरी यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

आम्ही आमच्या शेत जमिनी या सिंचन प्रकल्पासाठी दिल्यात, ज्यामुळं आमच्या इतर शेतीला पाणी मिळेल. मात्र तसं झालं नाही. अधिकाऱ्यांनी चालढकल केल्यानं हा प्रकल्प अपूर्ण असून लवकरात लवकर हा अर्धवट प्रकल्प शासनानं पूर्ण करावा असं शेतकरी डिगांबर टोपले यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.