Kharif Season : लागवडीपूर्वीच कापूस उत्पादकांना धास्ती कशाची..? बाजारपेठेतील चित्र काय ?

गतवर्षी संपूर्ण बाजारपेठ ही कापसाच्या दराभोवती होती. वाढीव दर असतानाही अनेक व्यापाऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. जागतिक पातळीवर उद्योगाकडे कापसाचा साठा आहे. त्यामुळे सध्या मागणी कमी असल्याने दरात फारशी वाढ झालेली नाही. हंगामात कापसाचे दर हे 14 हजार 500 रुपये क्विंटवलर येऊन ठेपले होते. त्यामुळे भविष्यातही हेच दर कायम राहतील अशी आशा शेतकऱ्यांनाच नव्हे तर व्यापाऱ्यांना देखील होती.

Kharif Season : लागवडीपूर्वीच कापूस उत्पादकांना धास्ती कशाची..? बाजारपेठेतील चित्र काय ?
कापूस पीक
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 4:09 PM

पुणे : यंदा कधी नव्हे ते (Cotton Rate) कापसाला विक्रमी दर मिळाला होता शिवाय सध्याही तो टिकून आहे. त्यामुळे (Kharif Season) खरीप हंगामात पुन्हा कापसाच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज (Agricultural Department) कृषी विभागाने वर्तवला आहे. मात्र, कापूस लागवडीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे आगामी काळात कापसाचे दर टिकूनच राहतील असे काही नाही. कारण उद्योगांकडून कापसाच्या मागणीत घट झाली आहे. शिवाय जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीची स्थिती ओढावली आहे. त्यामुळे कापसाच्या बाबतीमध्ये सर्वकाही अलबेल असे नाही. सुताला मागणी नसल्यानेन किलोमागे 30 ते 40 रुपयांनी दर हे घसरले आहेत.

साठा अधिक मागणी कमी

गतवर्षी संपूर्ण बाजारपेठ ही कापसाच्या दराभोवती होती. वाढीव दर असतानाही अनेक व्यापाऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. जागतिक पातळीवर उद्योगाकडे कापसाचा साठा आहे. त्यामुळे सध्या मागणी कमी असल्याने दरात फारशी वाढ झालेली नाही. हंगामात कापसाचे दर हे 14 हजार 500 रुपये क्विंटवलर येऊन ठेपले होते. त्यामुळे भविष्यातही हेच दर कायम राहतील अशी आशा शेतकऱ्यांनाच नव्हे तर व्यापाऱ्यांना देखील होती. मात्र, जागतिक पातळीवरील समीकरणे बदलल्याने कापूस दारमध्येही फरक होणार आहे.

यंदाही उत्पादनात होणार वाढ

गतवर्षीच्या वाढत्या दराचा परिणाम हा यंदाच्या लागवडीवर होणार हे साहजिकच आहे. भारताबरोबर अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि ब्राझीलमध्ये कापूल लागवड ही वाढणार असल्याचा अंदाज आहे. पोषक वातावरण आणि गतवर्षी मिळालेला दर यामुळे लागवडीत वाढ ही निश्चित मानली जात आहे. भारतामध्ये लागवड ही लांबणीवर पडलेली असली तरी इतर देशातील कापूस हा ऑगस्टमध्येच बाजारपेठेत दाखल होणार आहे. तेव्हा दराचे काय चित्र राहणार हे लक्षात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

कापूस आयातीचा परिणामही दरावर

केवळ एकाच घटकाचा परिणाम कापसाच्या दरावर होणार असे नाही तर देशात कापसाची आयातही वाढली आहे. त्याचादेखील परिणाम दरावर होणार आहे. देशात गेल्या वर्षभरात 9.5 लाख टन कापसाची आयात झाली आहे. त्यामुळे यंदाचे उत्पादन क्षेत्र आणि भारतामध्ये झालेली आयात यामुळे तीन ते चार महिन्यांमध्ये कापसाच्या दरात घट होणार असल्याचे अंदाज आहेत. त्यामुळे कापूस लागवडीपूर्वीच शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.