Agricultural : चर्चा सोयाबीनची अन् क्षेत्र वाढणार कापसाचे, शेतकरीही होतोय कमर्शियल !
यंदा कृषी विभागाच्या दाव्यानुसार सोयाबीनच्या क्षेत्रात घट होणार असली तरी उत्पादकतेमध्ये सूतभरही कमी होणार नाही. सोयाबीनसाठी केवळ मध्य प्रदेशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातही पोषक वातावरण आहे. त्यामुळे सोयाबीनची उत्पादकता कमी होणार नाही. गतवर्षी सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये प्रति हेक्टर 1289 किलो सोयाबीनची वाढ झाली होती तर यंदा हीच वाढ 1463 किलोने होणार आहे.
मुंबई : सध्या (Kharif Season) खरीप हंगामाची लगबग सुरु असून चर्चा आहे ती पेरणीची. धान पीक हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. असे असले तरी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सोयाबीन आणि कपाशीच्या उत्पादन क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रातही (Soybean Crop) सोयाबीनचाच बोलबाला असला तरी यंदा कापूस आणि मक्याचे क्षेत्र वाढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पीक पध्दतीमध्ये असाच बदल होत नाही तर त्यामागे कारणेही तशीच आहेत. ज्या पिकातून अधिकचे उत्पन्न मिळणार त्याच पिकांवर शेतकरी भर देणार आहेत. बाजारपेठीतील मागणी शेतीमालाचे दर हे पाहून शेतकरी (Crop Change) पीक पध्दती ठरवित आहे. महाराष्ट्रात तब्बल 51 लाख हेक्टरावर सोयाबीनचे पीक घेतले जाते तर मध्य प्रदेशातील उज्जैन विभागात 19. लाख 14 हजार हेक्टरावर लागवड करण्यात आली आहे तर यंदा 3 लाख हेक्टाराने घट होऊ शकते.
उत्पादकतेमध्ये मात्र, सोयाबीनच भारी
यंदा कृषी विभागाच्या दाव्यानुसार सोयाबीनच्या क्षेत्रात घट होणार असली तरी उत्पादकतेमध्ये सूतभरही कमी होणार नाही. सोयाबीनसाठी केवळ मध्य प्रदेशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातही पोषक वातावरण आहे. त्यामुळे सोयाबीनची उत्पादकता कमी होणार नाही. गतवर्षी सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये प्रति हेक्टर 1289 किलो सोयाबीनची वाढ झाली होती तर यंदा हीच वाढ 1463 किलोने होणार आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे सिंचनाची सोय या हंगामात असते तर आता खरीप हंगामात पिके ही पावसाच्या पाण्यावर वाढत असतात. असे असले तरी अजूनही शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे.
कापूस पेरणीला सुरवात
सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला असला तरी अधिकतर क्षेत्रावर कपाशीचा पेरा झाला आहे. हंगामपूर्व काळातच शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा केला आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे ते शेतकरी कापसावरच भर देत आहेत. शिवाय गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाला होता.14 हजार रुपये क्विंटल दर मिळाला असे असूनही कापसाला मागणी कायम आहे. तर दुसरीकडे सोयाबीनचे दर हे 7 हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिक मिळाला नव्हता. दरातील या तफावतीमुळे कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.
खरीप हंगामाच्या क्षेत्रातच होणार वाढ
खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, मका, डाळींब या पिकांची लागवड करतात. या वेळी या भागातील एकूण खरीप पिकांच्या क्षेत्रात किरकोळ वाढ होऊ शकते असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. मध्यप्रदेशातील इंदोर विभागात 22 लाख 47 हेक्टरावर खरीप पिके घेतली जातात. तर एकट्या महाराष्ट्रात जवळपास 51 लाख हेक्टरावर सोयाबीन हे एक पीक घेतले जाते. शिवाय अर्थार्जनाच्या दृष्टीने खरीप हंगामाच महत्वाचे असल्याने क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज आहे.