Himalayan Keeda Jadi : या बुरशीला सोन्यापेक्षा जास्त भाव! एका किलोसाठी मोजावे लागतात 20 लाख

Himalayan Keeda Jadi : हिमालयातील या बुरशीला सोन्यापेक्षा जास्त भाव आहे. एक किलो बुरशीसाठी 20 लाख रुपये मोजावे लागतात, असं काय आहे बरं या बुरशीत...

Himalayan Keeda Jadi : या बुरशीला सोन्यापेक्षा जास्त भाव! एका किलोसाठी मोजावे लागतात 20 लाख
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 8:51 PM

नवी दिल्ली : हिमालय हा सोन्याची खाणच आहे. येथील प्रत्येक वस्तू, वृक्षवल्ली, पाणी हे सोन्यावाणीच आहेत. पण येथील एक बुरशी सोन्यापेक्षा कमी नाही. या बुरशीला (Fungus) सोन्यापेक्षा जास्त आहे. एक किलो बुरशीसाठी 20 लाख रुपये मोजावे लागतात. तुम्ही म्हणाल, आता हे काय आणिक! तर ही बुरशी काही साधी-सुधी बुरशी नाही. तिचा वापर खास पुरुषांसाठीच्या औषध निर्मिती करण्यासाठी होतो. आयुर्वेदिक औषधं तयार करणाऱ्या कंपन्यांकडून (Ayurvedic Medicine) या बुरशीला सर्वाधिक मागणी आहे. या बुरशीची तस्करी रोखण्यासाठी उत्तराखंड सरकारने खास योजना आखली आहे.

Keeda Jadi उत्तराखंड सरकारने (Uttarakhand Government) तस्करी रोखण्यासाठी वर्ष 2018 मध्ये विस्तृत योजना आखली होती. कीडा जडी (Keeda Jadi) या बुरशीचे तस्करांपासून संरक्षण आणि स्थानिकांना रोजगार उपलब्धतेसाठी ही योजना तयार करण्यात आली होती. कीडा जडीची साठवण, रॉयल्टी याविषयीचे नियम तयार करण्यात आले. असे असले तरी कीडा जडीच्या तस्करीला अद्यापही लगाम घालता आलेला नाही.

सॅटेलाईट मॅपिंग होणार आपल्या खास गुणधर्मामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये या मौल्यवान कीडा जडीचा वापर एकदम खास आहे. पण काळाबाजार होत असल्याने सरकारने तस्करांना लगाम घालण्यासाठी उपाय केले आहेत. धामी सरकारने तस्करीला आळा घालण्यासाठी नव्याने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याअंतर्गत उत्तराखंडात सॅटेलाईटच्या माध्यमातून रिसोर्स मॅपिंग आणि ग्राऊंड सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे कीडा जडीचा सविस्तर नकाशा तयार होईल. पुरुषी शक्ती वाढविण्यासाठी कीडा जडी खास वापर होतो. त्यामुळेच ही बेशकिंमती बुरशी ठरली आहे.

हे सुद्धा वाचा

आता नियमात होणार बदल प्रमुख वन संरक्षक अनुप मलिक यांनी कीडा जडीच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी योजना आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच शासना आदेश, नियमात सुधारणा, दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त केली. याविषयीचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला आहे. नियामात संशोधन झाल्यास, काळ्याबाजारातील विक्रीला अटकाव होईल. स्थानिकांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्नाला बळ मिळेल.

चीन आणि तिबेटमध्ये परंपरागत उपचार पद्धतीत या बुरशीचा वापर करण्यात येतो. फुफ्फुस आणि किडनीच्या उपचारांसाठी हे रामबाण औषध आहे. तर पुरुषांच्या कमजोरीसाठी या औषधाचा वापर होतो. श्वसन आणि किडनीच्या आजारांमध्ये शरिराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी हे औषध उपयोगी आहे.

एक किलोचा भाव 20 लाख रुपये कीडा जडी ही जगातील सर्वात महागडी बुरशी आहे. ही बुरशी अत्यंत दुर्मिळ असून आंतरराष्ट्रीय संघ आययूसीएनने या प्रजातिला लाल सूचीत टाकले आहे. या बुरशीची आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलोचा भाव 20 लाख रुपये आहे.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.