Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरीपातील विमा परताव्यानंतर रब्बीच्या पीकविमा योजनेसाठी ‘अशी’ आहे प्रक्रिया

सध्या हवामान बदलाचा काही नियम नाही हे गेल्या वर्षभरात निदर्शनात आलेले आहेच. त्यामुळे अशा नैसर्गिक संकटापासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान पीकविमा योजना सुरु केली होती. आता रब्बी हंगामाची लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातही विमा रक्कम अदा करुन पिकांना संरक्षण कवच देता येणार आहे.

खरीपातील विमा परताव्यानंतर रब्बीच्या पीकविमा योजनेसाठी 'अशी' आहे प्रक्रिया
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 4:27 PM

लातूर : खरीप हंगामातील नुकसानीवरुन विम्याचे महत्व शेतकऱ्यांच्या लक्षात तर आलेच आहे. कारण ज्या शेतकऱ्यांनी खरीपात हंगामात ( Pradhan Mantri Pik vima Yojana) पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता त्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होऊ लागले आहेत. सध्या हवामान बदलाचा काही नियम नाही हे गेल्या वर्षभरात निदर्शनात आलेले आहेच. त्यामुळे अशा नैसर्गिक संकटापासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने (Central Government) केंद्र सरकारने पंतप्रधान पीकविमा योजना सुरु केली होती. आता रब्बी हंगामाची लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातही विमा रक्कम अदा करुन पिकांना संरक्षण कवच देता येणार आहे.

खरीपात शेतकऱ्यांचे पावसामुळे अतोनात नुकसान झालेले होते. मात्र, ज्या शेतकऱ्य़ांनी पीकांचा विमा काढलेला होता. त्यांना आता मदत मिळण्यास सुरवातही झाली आहे. ज्याप्रमाणे खरीपातील पिकांसाठी विमा योजना आहे अगदी त्याप्रमाणेच रब्बी हंगामातील पिकांसाठी त्यामुळे याची काय प्रक्रिया आहे आणि अंतिम मुदत काय याची माहिती असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत रब्बी हंगामाच्या पीकाकरीता विमा काढता येणार आहे.

काय आहेत योजनेची वैशिष्टे

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण आणि सुधारित शेती तंत्र आणि साहित्य वापरण्यास प्रोत्साहित करणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखणे आणि यामधून कृषी क्षेत्राला कर्ज देण्यामध्ये सातत्य राखणे. हा योजनेचा उद्देश आहे तर यंदा रब्बीतील रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकरी सहभाग घेऊ शकणार आहेत.

पिकनिहाय अंतिम मुदत अशी असणार आहे

* रब्बी ज्वारी 31 नोव्हेंबर 2021 *गहू, हरभरा, कांदा 15 डिसेंबर 2021 * उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग – 31 मार्च 2022 * सर्व पिकांसाठी जोखीम पातळी 70% आहे.

विमा संरक्षणाच्या बाबी व नुकसानीची सरासरी

आजही उंबरठ पध्दतीनेच पीक नुकसानीची सरासरी ठरवली जाते. पिकाच्या उत्पादनाच्या मागील 7 वर्षातील सरासरी उत्पादनाच्या अनुशंगाने जोखीम पातळीचा विचार करुन तीच निर्धारित नुकसान ठरवले जाते. तर पेरणीपासून काढणीपर्यंत पीक उत्पादनात घट प्रतिकूल हवामान, पूर, पाऊस, दुष्काळ इत्यादींमुळे शेतकऱ्यांचे अपेक्षित उत्पादन उंबरठ्यावरील उत्पादनाच्या 50 टक्क्यांहून अधिक घटणे अपेक्षित असल्यास विमा संरक्षण दिले जाते.

नुकसान भरपाई मिळवण्यासाठी

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अचानक नुकसान झाल्यास संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक, पीक विमा अॅपवर 72 तासांच्या आत माहिती द्यावी. याद्वारे संपूर्ण हंगामात विविध कारणांमुळे अधिसूचित क्षेत्रातील पिकाचे सरासरी उत्पन्न उंबरठ्याच्या खाली गेल्यास नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्यानुसार रक्कम जमा केली जाते.

विमा योजनेत सहभागी होण्यासाठी

अधिसूचित पिकांसाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठीही या विमा योजनेत सहभाग अनिवार्य नाही. मात्र, शेतकऱ्याने विमा योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम तारखेच्या किमान 7 दिवस आधी संबंधित बँकेला लेखी कळवणे आवश्यक आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांचा 7/12 उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पीक पेरणीची स्वयंघोषणा घेऊन अधिकृत बँकेकडे विमा अर्ज सादर करून प्रीमियम भरावा. शिवाय रक्कम भरलेल्या हप्त्याची पावती जवळ ठेवावी. (This is the final date for participation in the rabi season crop insurance scheme)

संबंधित बातम्या :

मत्स्यपालनाच्या सर्वोत्तम 5 टीप्स अन् जाणून घ्या सापळा लावण्याचे महत्वही

…यामुळे वाढली लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक, काय आहेत कारण?

सोयाबीनच्या दरासाठी आंदोलन करण्याची नामुष्की ; परळीत विम्यासाठी संघर्ष दिंडी

सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू.
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले.
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले.
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.