Cotton: कापसाचे उत्पादन घटले मात्र, वाढीव दराने शेतकऱ्यांना सावरले, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे स्थिती?
खरीप हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पादनात घट झाली असली तरी बाजारपेठेतील दराने यंदा शेतकऱ्यांना चांगलेच सावरलेले आहे. उत्पादन घटूनही सुरवातीला सोयाबीन, कापसाचे दर हे कमीच होते. मात्र, यंदा शेतकऱ्यांनाच बाजारपेठेचे गणित कळाले होते. त्यामुळेच वाढीव दर मिळाल्याशिवाय शेतीमालाची विक्रीच नाही असा निर्धार केला होता.
नंदुरबार : खरीप हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पादनात घट झाली असली तरी बाजारपेठेतील दराने यंदा शेतकऱ्यांना चांगलेच सावरलेले आहे. उत्पादन घटूनही सुरवातीला सोयाबीन, कापसाचे दर (Cotton Rate) हे कमीच होते. मात्र, यंदा शेतकऱ्यांनाच (Market) बाजारपेठेचे गणित कळाले होते. त्यामुळेच वाढीव दर मिळाल्याशिवाय शेतीमालाची विक्रीच नाही असा निर्धार केला होता. शेतकऱ्यांचा तो निर्णय आता फायदेशीर ठरत असून हंगामाच्या अंतिम टप्प्यात (Agricultural Produce Market Committee) नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 11 हजाराचा दर मिळाला आहे. गेल्या 10 वर्षातील हा विक्रमी दर असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली असली तरी वाढीव दरामुळे उत्पन्नात मात्र, वाढ झाली आहे. सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. असे असताना कापसासह सोयाबीन आणि तुरीच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे हंगामाचा शेवट हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने गोड होतानाचे चित्र आहे. नंदुरबार येथील स्वर्गीय राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर दररोज 1 हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. कापसाला 9 ते 11 हजार 400 पर्यंत दर मिळत आहे.
50 हजार क्विंटल कापसाची खरेदी
शेतकऱ्यांनी तारेवरची कसरत करीत खरिपातील पिकांची जोपासणा केली होती. मात्र, सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात घट झाली होती. असे असतानाही स्वर्गीय राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर दररोज 1हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. तर आजपर्यंत बाजार समितीतील परवानाधारक कापूस व्यापाऱ्यांनी 50 हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. तर दुसरीकडे कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला विक्रमी दर मिळतील असे चित्र होते. अखेर बाजारपेठेतील वाढती मागणी आणि शेतकऱ्यांनी घेतलेले निर्णय यामुळे हे शक्य झाले आहे.
असे वाढत गेले हंगामात कापसाचे दर
मुळात कापूस लागवडीच्या क्षेत्रातच घट झालेली आहे. असे असताना पुन्हा निसर्गाची अवकृपा यामुळे उत्पादन घटले होते. एवढे सर्व होऊनही हंगामाच्या सुरवातीला कापसाच्या दरात अपेक्षित वाढ झालेली नव्हती. शिवाय खरेदी केंद्रही उभारली गेली नव्हती. सुरवातीला कापसाला 8 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत होता. मात्र, उत्पादनात घट होऊनही ही अवस्था म्हणून शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता. शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे 8 हजारावरील कापूस आज 11 हजार रुपये क्विंटल या प्रमाणे विकला जात आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली तरी त्याची कसर ही वाढीव दरातून निघाली असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.
हंगामाच्या अंतिम टप्प्यात आवक घटली
गेल्या चार महिन्यापासून कापसाचा हंगाम सुरु आहे. दिवसेंदिवस कापसाच्या दरात सुधारणाच होत गेली. नागपूरमध्ये तर गेल्या 50 वर्षात जो दर मिळाला नाही तो यंदा शेतकऱ्यांच्या पदरी पडला होता. हीच अवस्था सर्वत्र आहे. आता हंगाम अंतिम टप्प्यात आहे. वाढीव दराच्या अपेक्षेने ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक करुन ठेवली त्यांची चांदी होत आहे. वाढीव दरामुळे शेतकऱ्यांनी फरदडचे उत्पादन घेतले होते. पण गेल्या 8 दिवसांपासून कापसाचीही आवक कमी होताना पाहवयास मिळत आहे.
संबंधित बातम्या :
Chilly Rate: लाल मिरचीचा ठसका 25 हजार रुपये क्विंटल पार, ‘तेजा’ चीही तेजी कायम..!
कोरफडची एकदा लागवड बारमाही उत्पन्न, शेतकऱ्यांना व्यवसयाचीही संधी, जाणून घ्या सर्वकाही